पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७२ सार्थ श्रीज्ञानेश्वरी तैसें शरीर होये । जे वेळी कुंडलिनी चंद्र पिये । मग देहाती विहे | कृतांतु गा ॥ ५९ ॥ वार्धक्य तरी बहुडे । तारुण्याची गांठी विघडे । लोपली उघडे | वाळदशा ॥ २६० ॥ वयसा तरी येतुलेवरी । एन्हवीं वाळाचा वळार्थ करी । धैर्याची थोरी | निरुपम् ॥ ६१ ॥ कनकडुमाच्या पालवीं । रत्नकळिका नित्य नवी । नखें तैसीं वरवीं । नवीं निघती ॥ ६२ ॥ दांतही आन होती । परि अपाडें सानेजती । जैसी दुवाहीं वैसे पांती | हिरेयांची ॥ ६३ ॥ माणिकुलियांचिया कणिया । सावियाचि अनुमानिया । तैसिया सर्वांगीं उधवती अणिया । रोमांचिया ॥ ६४ ॥ करचरणतळें | जैसी कां रातोत्पळें । पाखाळीव होती डोळे । काय सांगों ॥ ६५ ॥ निडोराचेनि कोंदाटें। मोतियें नावरती संपुटें । मग शिवणी जैसी उतटे । शुक्तिपलवांची ॥ ६६ ॥ तैसी पातियांचिये कवळिये न समाये । दिठी जाळोनि निघों पाहे । ऑलिचि परी होये । गगना कवळिती ॥ ६७ ॥ आईके देह होय सोनियाचें । परि लांघ ये वा । जे आप आणि पृथ्वीचे । अंश नाहीं ॥ ६८ ॥ मग समुद्रापलीकडील देखे । स्वर्गीचा आलोचुँ आइके । मनोगत वोळखे । मुंगियेचें ॥ ६९ ॥ पवनाचां वारिकां वळवे । चाले तरी उदकीं पाउल न जेव्हां कुंडलिनी सत्रावीचें अमृत पिते, तेव्हां शरीर असें होतें, मग त्या देहाला प्रत्यक्ष काळही भितो ! ५९ मग म्हातारपणाची कळा लोपते, व तारुण्याची ज्वानीही मावळते, आणि अगदीं पहिली बाळदशा पुन्हां प्राप्त होते. २६० नुसत्या वयाचा विचार केला तर तो बाळासारखा दिसतो, परंतु त्याच्या सामर्थ्याची थोरवी इतकी विनतोड असते, कीं ' वाळ' शब्दाचा अर्थ 'वळ' असाच करावा लागेल ! ६१ सोनरुखाच्या पालवींत कधींही न कोमेजणारी अशी रत्नाची कळी फुटावी, तशींच तेजस्वी नवीन नसें त्याला फुटतात. ६२ नवीन दांत येतात, ते फारच बारीक असतात, जणूं काय जबड्याच्या दोन्ही अंगांना हिरकण्यांच्या रांगाच बसविल्या आहेत ! ६३ मूळच्याच अगदी बारीक अशा माणकांच्या कण्यासारखींच केशांचीं अग्रें शरीरावर उधळलेली दिसतात. ६४ हातापायांचे तळवे तांबड्या कमलाप्रमाणं शोभतात, आणि धुऊन निर्मळ झालेल्या त्याडो ळ्यांचें वर्णन कोण बरें करूं शकेल ? ६५ पक्क दशेला आल्यामुळे मोत्ये शिंपल्यांत समावत नाहींत, आणि मग त्या शिंपल्याची शिवण जशी उखळते, ६६ त्याप्रमाणेच डोळ्यांच्या पात्यांच्या कवेंत आतां दृष्टि समावत नसल्यामुळें, ती आवेशानं बाहेर येऊ पाहते, आणि जरी ती अर्धवटच उमलली असते तरी त्या स्थितीतही ती सर्व गगनाला गवसणी घालूं शकते. ६७ अर्जुना, लक्षांत घे, कीं, हें योग्याचें शरीर कांतीनें सोन्याचें असतं, पण वजनाने वायूचें असतें, कारण त्यांत पृथ्वीचा जडांश व जळाचा द्रवांश मुळींच नसतो. ६८ मग त्या योग्याला समुद्रापलीकडचेही दिसतें, स्वगींचे नादही ऐकू येतात, आणि मुंगीचं मनोगतही तो जाणू शकतो. ६९ तो वाऱ्याच्या घोड्यावर स्वार होतो; तो पाण्यावरून १ भटकतें, परागंदा होते. २ परिपकतेच्या ३ व्यापून. ४ अर्धवट उघडलेली. ५ हळुवारपणा, ६ नाद. ७ घोड्यावर,