पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सहावा १७१ तेणें नाळकें रस भरे । तो सर्वांगामाजी संचरे । जेथींचा तेथ मुरे । प्राणपवनु ॥ ४८ ॥ तातलिये मुसे । मेण निघोनि जाय जैसें । मग कोंदली राहे रसें । वोलेनि ॥ ४९ ॥ तैसी पिंडाचेनि आकारें । ते कळाचि का अवतरे । वरी त्वचेचेनि पदरें | पांघरली असे ॥ २५० ॥ जैसी आभाळाची बुंथी । करूनि राहे गस्ती | मग फिटेलिया दीप्ति । धरून ये ॥ ५१ ॥ तैसा आहचवरि कोरडा | त्वचेचा असे पातोडा । तो झडोनि जाय कोंडा । जैसा होय ॥ ५२ ॥ मग काश्मीरीचें स्वयंभ । कां रत्नवीजा निघाले कोंभ | अवयवकांतीची भांव । तैसी दिसे ॥ ५३ ॥ ना तरी संध्यारागींचे रंग । काहनि वळिलें तें आंग । कीं अंतज्योतीचे लिंग । निर्वाळिलें ॥ ५४ ॥ कुंकुमाचें भरींव | सिद्धरसाचें वोतींव । मज पाहतां सावेव । शांतिचि ते ॥ ५५ ॥ तें आनंदचित्रींचे लेप | ना तरी महासुखाचें रूप । कीं संतोपतरूचें रोप | थांबलें जैसें ॥ ५६ ॥ तो कनकचंपकाचा कळा । कीं अमृताचा पुतळा । नाना सांसिनला मळा | कोवळिकेचा ॥ ५७ ॥ हो कां जे शारदियेचेनि वोलें । चंद्रबिंब पाल्हेलें । कां तेजचि मूर्त बैसलें । आसनावरी ॥ ५८ ॥ वांकडे होते. आणि कुंडलिनीच्या तोंडाला लागते. ४७ मग या कुंडलिनी नळींत जो अमृतरस भरतो, तो सर्व अंगांत खेळतो, आणि प्राणवायूसह प्रत्येक गात्रांत जेथल्या तेथें मुरून जातो. ४८ मूस सडकून तापल्यामुळे मेण जसें उडून जातें, आणि मग ती मूस जशी निव्वळ धातुरसानें भरून राहाते. ४९ त्याप्रमाणं या शरीराच्या रूपानें चंद्राची सत्रावी कळाच जणूं काय अवतरते, मात्र तिच्या भोंवतीं कातडीचें अवगुंठण असतें. २५० सूर्य ढगांचा बुरखा घेऊन झांकून जातो, परंतु तो बुरखा दूर झाला म्हणजे जसा पुन्हां आपल्या झगझगीत प्रभेनें प्रकट होतो, ५१ त्याप्रमाणेच या सत्राच्या तेजस्वी रूपावर ही कातडीची कोरडी खोळ केवळ वरती असते, पण तीही आतां तुसाप्रमाणं झडून जाते. ५२ मग शुद्ध स्फटिकाचं निर्दोष स्वरूप जसे असावें, किंवा रत्नाचें बीज रुजून त्याला जणूं काय कांच फुटावा, त्याप्रमाणें अवयवांच्या कांतीची प्रभा दिमूं लागते. ५३ अथवा, संध्याकाळचे रंग घेऊनच हें शरीर घडविलें आहे कीं काय, किंवा हें काय अंतःस्थ चैतन्याच्या तेजाची निर्मळ प्रतिमा आहे, असें वाटू लागतें. ५४ हें शरीर काय कुंकुमानें भरलेलें आहे, की चैतन्यरसाने ओतलेले आहे, असें भासतें. हें शरीर म्हणजे मूर्तिमंत शांतीच आहे, अशी माझी कल्पना होते. ५५ हें शरीर म्हणजे जणूं काय आनंदचित्रांतील रंगाचें काम, किंवा आत्मसुखाचं स्वरूप, दिसतं किंवा संतोषवृक्षाचें रोपडेच जणूं काय बळावलेलें आहे ! ५६ किंवा हा सोनचाफ्याचा कळा, अथवा अमृताचा पुतळा, किंवा कोमलतेचा भरास आलेला मळाच आहे ! ५७ किंवा शरद ऋतूच्या ओलाव्याने जणूं काय हें चंद्रबिंत्रच पालवलें आहे, अथवा हें मूर्तिमंत तेजच आसनावर बसलें आहे कीं काय, अशी कल्पना होते. ५८ १ तापलेल्या मुशीतून २ बुरखा ३ बुरखा निघाला म्हणजे ४ वरच्यावर ५ पापुदरा, पातळ पदर. ६ स्फटिकाचें. ७ मूळरूप. ८ रंग, ९ स्थिरावले. १० किंवा ११ तरारला.