पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७० सार्थ श्रीज्ञानेश्वरी -हवीं तरी दोन्ही तेव्हांचि मिळती । परी कुंडलिनी नावे दुश्चित्त होती । ते तयांतें म्हणे परौती | तुम्हीच कायसे एथें || ३८ || आयकें पार्थिव धातु आघवी । आरोगितां कांहीं नुरवी । आणि आपातें तंब ठेवी । पुसोनियां ॥ ३९ ॥ ऐसीं दोनी भूतें खाये । ते वेळीं संपूर्ण धाये । मग सौम्य होऊनि राहे । सुषुम्नेपाशीं ॥ २४० ॥ तेथ तृप्तीचेनि संतोखें । गरळ जें वमी मुखें । तेणें तियेचेनि पीयूखें । प्राणु जिये ॥ ४१ ॥ तो अग्निआंतूनि निघे । परि सवाह्य निक्यूंचि लागे । ते वेळीं कसु बांधिती आंगें । सांडिला पुढती ॥ ४२ ॥ मार्ग मोडिती नाडीचे । नवविधपण वायूचें । जाय म्हणऊनि शरीराचे । धर्मु नाहीं ॥ ४३ ॥ इडा पिंगळा एकवटती । गांठी तिन्ही सुटती । साही पदर फुटती । चक्रांचे हे ॥ ४४ ॥ मग शशी आणि भानु । ऐसा कल्पिजे जो अनुमानु । तो वातीवरी पवनु । विसितां न दिसे ॥४५॥ बुद्धीची फुलिकों विरे । परिमळु प्राणी उरे । तोही शक्तीसवें संचरे । मध्यमेमाजीं ॥ ४६ ॥ तंव वरिलेकडोनि ढाळे | चंद्रामृताचें तळें । कानवडोनि मिळे । शक्तिमुखीं ॥ ४७ ॥ नाहींतर हे दोन्ही वायु तेव्हांच एकवटते. परंतु ती कुंडलिनी क्षणमात्र कष्टी होऊन त्यांना म्हणते, ' यापलीकडे आतां तुम्हीच का काय ते उरलां ? ' ३८ अर्जुना, यांतलें इंगित असें आहे, कीं, ती कुंडलिनी शरीरांतील पृथ्वीचा अंश खाऊन फन्ना करते, आणि जलाच्या अंशाचें तर नांवही राहू देत नाहीं. ३९ अशीं शरीरांतील पृथ्वी व आप हीं दोन भूतें खाऊन टाकल्यावर, त्या कुंडलिनीची पूर्ण तृप्ति होते, आणि मग ती जरा शांत होऊन सुषुम्ना नाडीजवळ राहाते. २४० तेथें समाधानाच्या संतोषानें ती गरळ ओकते, पण हे तिचें गरळच प्राणवायूला अमृतासारखं होऊन, तो वांचतो ४१ तो प्राणवायु त्या गरळाच्या आगीतून निघतो, परंतु शरीराच्या आंत व बाहेर शीतळाई करितो; आणि मग प्रत्येक गात्रांत पूर्वीचें हरपलेलें सामर्थ्य पुन्हां भरूं लागतं. ४२ परंतु नाड्यांचं वाहणें खुंटल्यामुळे आणि 'अपान ' ' व्यान' उदान ' ' समान ' 'नाग' ' कूर्म, ' ' कुकर,' 'देवदत्त, ' आणि ' धनंजय, ' हे शरीरांतील वायूचे नऊ प्रकार न होऊन एकच प्राणवायु उरल्यामुळे, शरीरधर्म नाहींसे झालेले असतात. ४३ मग डाव्या व उजव्या नाकपुडींतील नाड्या म्हणजे 'इडा' व 'पिंगळा' या एकवटून, तीन्ही गांठी सुटतात, आणि शरीरांतील साही चक्रांचे पदर फाटून जातात, ४४ असें झालें म्हणजे, नाकपुड्यांतून वाहणाऱ्या ज्या वायूला चंद्र आणि सूर्य यांची उपमा देतात, तो तेवत्या दिव्याच्या ज्योतीलाही डळमळवू शकणार नाहीं, असा लोपून जातो. ४५ बुद्धीची चुळबूळ नाहींशी होते; घ्राणेंद्रियांत जो गंध उरलेला असतो, तोही कुंडलिनी शक्तीबरोबर मध्यमनाडींत म्हणजे सुषुम्नेत शिरतो. ४६ इतक्यांत वरच्या बाजूस असलेलें चंद्राच्या सत्राव्या कळेचें, अमृताचें, तळें हळूहळू कलंडून १ पूर्वी. २ बंद होतात. ३ इडा नाडी, ४ पिंगळा नाडी. ५ स्फुरण, विकास. ६ कलाटणी खाऊन, कलंडून.