पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सहावा १६९ जैसें उलंडलें । कीं सूर्याचें आसन मोडलें । तेजाचें बीज विरूढलें । अंकुरेशीं ॥ २६ ॥ तैसी वेढेयांतें सोडिती । कवतिकें आंग मोडिती । कंदावरी शक्ति । उठिली दिसे ॥ २७ ॥ सहजें बहुतां दिवसांची भूक | वरि 1 विली तें होय मीख मग आवेशें पसरी मुख | ऊर्ध्व उजू ॥ २८ ॥ तेथ हृदयकोशातळवटीं । जो पवन भरे किरीटी । तया सगळेयाचि मिठी । देऊनि घाली ॥ २९ ॥ मुखींच्या ज्वाळीं । तळी वरी कवळी । मांसाची वडवाळी | आरोगूं लागे ॥ २३० ॥ जे जे ठाय समांस । तेथ आंहाच जोडे घाउस | पाठी एकदोनी घांस । हियाही भरी ॥ ३१ ॥ मग तळवे तळहात शोधी । उवींचे खंड भेदी | झाडा घे संधी | प्रत्यंगाचा ॥ ३२ ॥ अधोभाग तरी न संडी । परि खींचेंही सत्त्व काढी | त्वचा धुवूनि जडी । पांजरेशीं ॥ ३३ ॥ अस्थींचे नळे निरपे । शिरांचे हीरें बोरपे । तंव बाहेरी विरुद्धी करपे । रोमवीजांची ॥ ३४ ॥ मग सप्तधातूंच्या सागरी । ताहानेली घोंट भरी । आणि सवेंचि उन्हाळा करी | खडखडीत ॥ ३४ ॥ नासापुटौनि वारा | जो जातसे अंगुळे बारा । तो गच धरूनि माघारा । आंतु घाली || ३६ || तेथ अंध वरौतें आकुंचे । ऊर्ध्व तळौतें खांचे । तया वामाजीं चक्राचे । पदर उरती ||३७|| मोडावें, किंवा प्रत्यक्ष तेजाचें बीं रुजून त्यास कोंभ फुटावा, २६ त्याप्रमाणे ती कुंडलिनी आपले वेढे सोडते, सहज अंगाला आटेपिटे देते, आणि नाभिकंदावर उभी राहाते. २७ तिला स्वाभाविकच पुष्कळ दिवसांची भूक लागलेली असते, तशांत चिमटून जागी केल्याचे निमित्त झालेलें असतें, त्यामुळे ती आपले तोंड मोठ्या आवेशानं उघडून सरळ वर करते. २८ तोंच हृदयकोशाच्या तळाशी येऊन ठेपलेला अपानवायु तिच्या तावडीत येतो, आणि ती त्या सगळ्याच वायूला आपल्या मिठींत कळते. २९ 'आपल्या तांडांतील ज्वाळांनी ती त्याला खालीं वर, सर्व बाजूंनीं व्यापून टाकते, आणि मांसाचे घांस खाऊं लागते. २३० जेथे जेथे मांस असतें, त्या त्या भागांचे ती भराभर लचके घेते, आणि शेवटीं हृदयाचेही एकदोन घांस चट्ट करते, ३१ मग पायाचे तळवे व तळहात यांचाही समाचार ती घेते, मग वरचे भागही फोडते, आणि सांध्यासांध्याचा व अंगाअंगाचा झाडा घेतल्यावांचून राहात नाहीं. ३२ खालच्या भागांनाही ती कांहीं सोडीत नाहीं. नखांतलेंही सार शोषून घेते, कातडीला पिळून काढते, आणि मग ही कुंडलिनी हाडांना भिडते. ३३ हाडांच्या नळ्या ओरपून काढते, शिरांच्या काड्या कोरून काढते, आणि असें झालें म्हणजे बाहेरच्या बाजूची केसांची रूज होरपळून जाते. ३४ मग या कुंडलिनीला फार तहान लागल्यामुळे ती रुधिरादि सप्त धातूंचा एकच घोट करते, आणि सर्व शरीरांत नीरसपणामुळें नुसता खडखडीत उन्हाळाच होतो ! ३५ मग नाकपुड्यांतून बारा आंगळें शिरणारा वाराही ती गच्च धरून परत आंतल्या बाजूला खंचते. ३६ अशा स्थितीत खालचा वायु वर चेपला जातो, आणि वरचा खालीं दावला जातो, आणि या दोहोंच्या भेटीच्या आड फक्त मधले चक्राचे पडदे तेवढेच उरतात. ३७ १ लचके, २ खाऊं, ३ आयताच घांस सांपडतो. ४ काड्या. ५ अपानवायु. ६ वा. २२