पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६८ सार्थ श्रीज्ञानेश्वरी जो मूळबंधें कोंडला । अपानु माघौता मुरडला । तो सवेंचि वरी सांकेंडला | धरी फुगू ॥ १४ ॥ क्षोभलेपणें माजे । उवाइला ठायीं गाजे । मणिपूरेंसी झुंजे । राहोनियां ॥ १५ ॥ मग थावलिये वाटुळी | सैंघ घेऊनि घर डहुळी | बाळपणींची कुहीटुळी | बाहेर घाली ॥ १६ ॥ भीतरी वळी न धरे । कोठ्यामाजी संचरे । कफपित्ताचे थारे । उरों नेदी ॥ १७॥ धातूंचे समुद्र उलंडी | मेदाचे पर्वत फोडी | आंतील मज्जा काढी । अस्थिगत ॥ १८ ॥ नाडीतें सोडवी । गात्रांतें विघडवी । साधकातें भेडसावी । परि विहावें ना ॥ १९ ॥ व्याधीतें दावी । सवेंचि हरवी । आप पृथ्वी कालवी । एकवाट ॥ २२० ॥ तंव येरीकडे धनुर्धरा । आसनाचा उवारा । शक्ति कैरी उजंगरा । कुंडलिनी ते ॥ २१ ॥ नागिणीचें पिलें । कुंकुमें नाहलें । वळण घेऊनि आलें । सेजे जैसें ॥ २२ ॥ तैसी ते कुंडलिनी । मोटकी औ वळणी । अधोमुख सर्पिणी | निदेली असे || २३ || विद्युल्लतेची विडी । वहिज्वाळांची घडी । पंधरेयांची चोखडी | घोंटीव जैशी ॥ २४ ॥ तैसी सुबंध आटली । पुटीं होती दाटली । ते वज्रासनें चिर्मुटली | सावधु होय ॥ २५ ॥ तेथ नक्षत्र अर्जुना, नुकत्याच वर्णिलेल्या 'मूळ बंधानें' किंवा 'वज्रासनाने कोंडमारा झाल्यामुळे अपान वायु शरीरांत माघारा उलटतो, आणि दाव वसल्यामुळे त्याला फुगवटी येते. १४ नंतर त्याचा प्रकोप होऊन तो मस्त होतो, त्या कोंडलेल्या जागेत गुरगुरूं लागतो, आणि नाभिस्थानांती' 'मणिपूर' नांवाच्या चक्राला मधून मधून धक्के देतो. १५ यावर हें त्याचें वादळ शांत झाले, म्हणजे तो सारे शरीररूपी घर ढवळून काढतो आणि अगदीं बाळपणापासून सांठत आलेली सर्व घाण शरीराबाहेर लावून देतो. १६ मग या अपान वायूची लाट आंतल्या आंत समावणें शक्य नसल्यामुळें, ती कोट्यामध्ये शिरून कफपित्तांचें ठाणें उठविते. १७ मग हा उसळलेला अपान वायु रुधिरादि सप्त धातूंचे समुद्र उलथून टाकतो, मेदाचे डोंगर चूर करतो, आणि हाडांच्या गाभ्यांतली मज्जासुद्धां बाहेर काढतो. १८ वायुमार्गाची नाडी मोकळी करतो, अवयवांना सैल करतो, आणि या चिन्हांनीं योगाची साधना करणाऱ्या नवशिक्याला भेडसावून सोडतो. परंतु त्यानें मुळींच भिऊं नये. १९ कारण तो अपानवायु या व्यापारानं जरी व्याधि उत्पन्न करितो, तरी तो तिचा लागलाच परिहारही करितो, आणि तो शरीरांतील कफपित्तादि जलाचे अंश आणि मांसमज्जादि पृथ्वीचे अंश कालवून एकवटतो. २२० मध्यंतरीं, अर्जुना, आसनाच्या उचाऱ्याने कुंडलिनी नामक शक्ति जागी होते. २१ नागिणीचें कुंकवासारखें लाल पिलें जसें वेटाळें करून बसावं, २२ तशी ती कुंडलिनी नाडी लहानशी, साडेतीन फेऱ्यांचें वेटोळे घालून, व खालीं तोंड करून, एकाद्या नागिणीसारखी निजलेली असते. २३ विजेची सुरळी, किंवा अग्निज्वाळांची वळी, किंवा सोन्याची चोख घोंटलेली लगडी, जशी असावी, २४ तशी ती कुंडलिनी नाभिस्थानीं लहानशा पुडांत नीट बंधांनी जखडलेली असते. तिला वज्रासनाने चिमटा वसतो, आणि ती जागी होते. २५ मग जसा एकादा तारा तुटून पडावा, किंवा सूर्याचें आसन १ अडचणीत सापडला. २ कोंडल्या ठिकाणी ३ जागी होते. ४ साडेतीन. ५ सोन्याची. ६ चिवळली, चेपली.