पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सहावा १६७ कवाडें । लागूं पाहती ॥२॥ वरचिलें पातीं ढळती । तळींचीं तळीं पुंजोळती । तेथ अर्धोन्मीलित स्थिति । उपजे तया ॥ ३ ॥ दिठी राहोनि आंतुलेकडे । बाहेर पाउल घाली कोडें । ते ठायीं ठावो पैडे । नासाग्रपीठीं ॥ ४ ॥ ऐसें आंतुच्या आंतुचि रचे । बाहेरी मागुतें न वचे । म्हणोनि राहणें आधिये दिठीचें । तेथेंचि होय ॥ ५ ॥ आतां दिशांची भेटी घ्यावी । कां रूपाची वास पहावी । हे चाड सरे आघवी । आपसया || ६ || मग कंठनाळ आटे । हनुवटी ती दाटे । ते गाठी होऊनि नेर्हेटे । वक्षस्थळीं ॥ ७ ॥ माजीं घंटिका लोपे । वरी बंधु जो आरोपे । तो जाळंधरु म्हणिपे । पांडुकुमरा ॥ ८ ॥ नाभी वरी पोखे । उदर हैं थोके । अंतरी फांके । हृदयकोशु ॥९॥ स्वाधिष्ठानावारीचिले कांठीं । नाभिस्थानातळटीं । बंधु पडे किरीटी | वोढियाणा तो ॥ २१० ।। ऐसी शरीराबाहेरलीकडे । अभ्यासाची पाखर पडे । प्रशान्तात्मा विगतभीर्ब्रह्मचारिव्रते स्थितः । मनः संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः ॥ १४ ॥ सम० - मन निर्भय जो शांत ब्रह्मचारिव्रतस्थ जो । मद्रूपीं लावुनी चित्त वसे मध्पर होउनी ॥ १४ ॥ आर्या - मजवरि मन ज्याचें त्या शांतात्म्याचे समूळ भय परतो । सब्रह्मचर्य रत जो युक्त असो मन दमूनि मत्पर तो १४ ओवी - निर्मल मनेंकरूनी । निर्भय मम होऊनी । ब्रह्मचर्य आचरोनी । मज सान्निध्य होइजे ॥ १४ ॥ तंव आंतु त्राये मोडे । मनोधर्माची ॥ ११ ॥ कल्पना निमे । प्रवृत्ति शमे । आंग मन विरमे । सावियाचि ॥ १२ ॥ क्षुधा काय जाहाली । निद्रा केउती गेली । हे आठवणही हारपली | न दिसे वेगां ॥ १३ ॥ झापड येऊ लागते. २ डोळ्यांचीं वरलीं पातीं मिटतात, परंतु खालचीं विकास पावतात; त्यामुळें डोळे अर्धवट उघडे राहतात. ३ मग दृष्टि आंतल्या बाजूला सरून जराशी बाहेर डोकावते, तों ती नेमकी नाकाच्या शेंड्यावर अडते. ४ अशा प्रकारें दृष्टि आंतल्या आंत कुचंबल्यामुळें आणि पुन्हां बाहेर जातां येत नसल्यामुळे, त्या अर्धवट विकासलेल्या दृष्टीला नाकाच्या शेंड्यावरच स्थिर होणें प्राप्त होतें. ५ मग, दिशा न्याहाळाव्या किंवा कशाचे तरी आकाररूप पहावें, ही इच्छा आपोआपच जिरून जाते. ६ मग मान आंखडून बसते, आणि हनुवटी गळ्याखालच्या खळगींत भरते, आणि मान गच्च होऊन छातीला रेहूं लागते. ७ यामुळें कंठनाळ तिच्यांत गुरफटून जातो. अशा प्रकारचा जो बंध होतो, त्याला 'जाळंघर' हें नांव आहे. ८ बेंबी वर येते, पोट सपाट होतें, परंतु हृदयकोश विस्तार पावतो. ९ अशा रीतीनें लिंगमूलाच्या वर आणि नाभिस्थानाच्या खालीं जो बंध होतो त्याला 'बोढियाणा बंध' ही संज्ञा आहे. २१० अशा बंधमुद्रांनी शरीराच्या बाहेरच्या अंगावर योगाभ्यासाचा ठसा उठतो आहे, तो शरीराच्या आंतही मनोवृत्तींचें ठाणें उध्वस्त होतें. ११ कल्पना लुली पडते, प्रवृत्ति शांत होते. आणि मन आपसूकच शरीरभावांना जाणत नाहींसें होतें. १२ भूक काय झाली, झोप कोठें गेली, याची त्याला यत्किंचितही शुद्धि राहात नाहीं. १३ १ विस्तृत होतात. २ अर्धवट उघडले आहेत अशी. ३ थबकते. ४ रेटते, ठासून बसते. ५ नरडीचे हाड ६ फुगते. • सपाट ८ आच्छादन ९ आश्रयस्थान.