पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६६ सार्थ श्रीज्ञानेश्वरी मुद्रेची प्रौढी ऐशी । तेचि सांगिजेल आतां परियेसीं । तरी ऊरु या जघनासी । जडोनि घालीं ॥ ९२ ॥ चरणतळें देव्हेडीं । आधार डुमाच्या बुडीं । संघटितें गाढीं । संचरीं पां ॥ ९३ ॥ सव्य तो तळीं ठेविजे । तेणें सिवणीमध्यें पीडिजे । वरी बैसे तो सहजें । वाम चरणु ॥ ९४ ॥ गुदद्राआंतोतीं । चारी अंगुळे निगुतीं । तेथ सांधे साधे प्रांतीं । सांडूनियां ॥ ९५ ॥ माजी अंगुळ एक निगे । तेथ टांचेचेनि उत्तरभागें । नेहेटिजें वरि आंगें । पेललेनी ॥ ९६ ॥ उचलिलें कां नेणिजे । तैसें पृष्ठांत उचलिजे । गुल्फदय धरिजे । तेणेंचि मानें ॥ ९७ ॥ मग शरीरसंच पार्था । अशेपही सर्वथा । पाष्णीचां माथां । स्वयंभु होय ॥ ९८ ॥ अर्जुना हें जाण । मूळबंधाचें लक्षण । वज्रासन गौण । नाम यासी ॥ ९९ ॥ ऐसी आधारीं मुद्रा पडे । आणि आधींचां मार्ग मोडे । तेथ अपानु आंतुलेकडे । 'वोहोटों लागे ॥ २०० ॥ समं कायशिरोग्रीवं धारयन्नचलं स्थिरः । संप्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन् ॥ १३ ॥ सम० - माजपाठ शिर ग्रीवा नीट हे धरुनी स्थिर । ठेवूनि दृष्टि नासाग्र ने पहाव्या दिशा दश ॥ १३ ॥ आर्या - काय शिर-ग्रीवांतें सम अचळ करूनि नासाग्र । पाहुनि दिशा न पाहुनि करुनी ब्रह्मीं मनास एकाम ॥ १३ ॥ ओवी - काया सम करोनि कटि हनुवटी । दृष्टि दीजे नासापुटीं । स्थिर कीजे श्वासाची परिपाटी । दिशां अवलोकन न करावें ॥ १३ ॥ तंव करसंपुट आपैसें । वाम चरणीं वैसे । तंव बाहुमूळीं दिसे । थोरींव आली ॥ १ ॥ माजी उभारलेनि दंडें । शिरकमळ होय गाढें । नेत्रद्वारींचीं या वेळीं मुद्रेची म्हणजे कंबरेपासून वरील भागाची घाटी कशी असावी, तें सांगतों, ऐक. मांडी पोटरीला खेटून, पायाचे तळवे वांकडे म्हणजे उताणे करून गुदस्थानाच्या बुडाशीं घट्ट रेटावे. ९३ उजवा तळवा तळाला ठेवून त्यानें गुदस्थानाची शिवण मधोमध दाबावी, मग डावा तळवा सहजच त्याच्यावर भिडेल. ९४ गुद व वृषण यांच्यामध्यें चार आंगळं अंतर आहे, त्यापैकी दीड ais अंगूळ प्रत्येक बाजूला सोडलें म्हणजे मध्यंतरीं एक अंगुळ राहते, तेथें टांचेचा मागला भाग, वरचें सर्व शरीर नीट तोलांत सांवरून, नेटानें रेटावा. ९५,९६ वरचें शरीर उचलून धरलें आहे कीं काय, हंसुद्धां उमगून येणार नाहीं, अशा हळुवारपणानें पाठीच्या कण्याचें खालचें टोंक उचलावें, आणि दोन्ही घोंटेही तसेच तरते धरावे. ९७ अर्जुना, या व्यवस्थेनें हा सर्व शरीराचा डोलारा अलगपणं नुसत्या ढांचेच्या खोटेवर सांवरला जाईल. ९८ पार्था, हें 'मूळबंध' नामक आसनाचें वर्णन आहे. यालाच 'वज्रासन' असेंही टोपण नांव आहे. ९९ अशा रीतीनें गुद व वृषण यांच्या मधोमध असणाऱ्या 'आधारचक्रावर ' जेव्हां वरच्या शरीराचा भार तोलला जातो, आणि शरीराचा खालचा भाग दाबला जातो, तेव्हां आंतड्यांत संचार करणारा अपानवायु उलटा शरीराच्या आंतल्या भागाकडे मार्गे सरूं लागतो. २०० मग द्रोणाकार होऊन हातांचे तळवे आपसूक डाव्या पायांवर टेंकतात, आणि खांदे उंचावलेले दिसतात. १ उंच झालेल्या दंडांमध्ये मस्तक बुडाल्यासारखं होतें, आणि डोळ्यांवर आपोआप १ एकावर एक आडवीं. २ एकाला एक भिडती. ३ दीड ४ रेटावें. ५ पाठीच्या कण्याचे शेवटचें टोंक. ६ दोन्ही गोफे. ७ शरीराचा सांगाडा, ८ पायाच्या घोट्याच्या ९ अधोभागाचा, १० मार्गे सरूं लागतो. ११ फुगीरपणा, फुगवटी १२ मध्यन्तरी, १३ संपलें, बुडलें,