पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सहावा १६५ वरी चोखट र्मृगमेवडी । माजीं धूतवस्त्राची घडी । तळवटीं अँमोडी । कुशांकुर ॥ ८२ ॥ सकोमळ सरिसे । सुबद्ध राहती आपैसे । एकपाडें तैसे । बोजा घालीं ॥ ८३ ॥ परि सावियाचि उंच होईल । तरि आंग हन डोलेल | नीच तरी पावेल । भूमिदोषु ॥ ८४ ॥ म्हणोनि तैसें न करावें । समभावें धरावें । हें बहु असो होआवें । आसन ऐसें ॥ ८५ ॥ तत्रैकाग्रं मनः कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रियः । उपविश्यासने युञ्ज्याद्योगमात्मविशुद्धये ॥ १२ ॥ सम० - करूनि मन एकाग्र स्थिरचित्तेंद्रियक्रियें । चित्तशुद्धयर्थ योजावा योग वैसोनि आसनीं ॥ १२ ॥ आर्या-त्या आसनिं बैसोनी करुनी एकाग्रधीर-चित्त मुनीं । आत्मविशुद्धीसाठीं योजावा योग इंद्रियें दमुनी ॥ १२ ॥ ओवी - मन इंद्रिये चित्त नेमुनी । बैसावें तये आसनीं । आत्मशुद्धि व्हावयालागोनी । योग करावा ॥ १२ ॥ मग तेथ आपण । एकाग्र अंतःकरण | करूनि सद्गुरुस्मरण । अनुभविजे ॥ ८६ ॥ जेथ स्मरतेनि आदरें । सवाह्य सात्विकें भरे । जंव काठिण्य विरे । अहंभावाचें ॥ ८७ ॥ विषयांचा विसरु पडे । इंद्रियांची कसमंस मोडे । मनाची घडी घडे | हृदयामाजी ॥ ८८ ॥ ऐसें ऐक्य हें सहजें । फावे तंव राहिजे । मग तेणेंचि बोधें वैसिजे । आसनावरी ।। ८९ ।। आतां आंगातें आंग वरी । पवनातें पवनु धरी । ऐसी अनुभवाची उँजरी । होंचि लागे ॥ १९० ॥ प्रवृत्ति माघौति मोहरे । समाधि ऐलाडी उतरे । आघवें अभ्यासूं मेरे । वैसतखेवो ॥९१॥ करून, तेथें पुढें सांगितल्याप्रमाणे आसन मांडावे. ८१ वरच्या अंगाला स्वच्छ मृगचर्म हांतरावें, मध्यें म्हणजे या मृगचर्माच्या आंत धुतलेल्या निर्मळ वस्त्राची घडी असावी, आणि त्याच्या खालीं म्हणजे तळाला सरळ व अखंड दर्भाकुर पसरलेले असावे. ८२ हे दर्भाकुर मऊ व सारख्या लांबीजाडीचे असावे, आणि ते एकमेकांना लागून घट्ट व ठास राहतील असे काळजीपूर्वक व्यवस्थित मांडावे. ८३ हें आसन जर कदाचित् अतिउंच झालें, तर शरीर डळमळेल. आणि तें जर अति नीच झालें, तर जमिनीला स्पर्श होण्याचा संभव राहील. ८४ म्हणून त्याची उंची सोइस्कर असावी. परंतु याची फारशी चर्चा करण्याचें कारण नाहीं. आसन ठाम व सुखाचें होईल असें असावें, इतकाच याचा भावार्थ. ८५ मग त्या आसनावर बसून अंतःकरणाला एकवट करावें आणि श्रीसद्गुरूचें स्मरण अनुभवाला आणावें. ८६ मग आतबाहेर सात्विकवृत्तीनें ओतप्रोत भरून अहंकाराची कठोरता विरून गेली आहे, विषयांचा विसर पडला आहे, इंद्रियांची चुळबूळ थंडावली आहे, मन हृदयामध्ये एकाग्रपणे बिंबलें आहे, अशी स्वाभाविक ऐक्याची अवस्था साध्य होईपर्यंत, हें सद्गुरुस्मरण मोठ्या आदराने चालविलें पाहिजे. मग त्याच आत्मबोधावस्थेत आसनावर बसून राहावें. ८७,८८,८९. अशा स्थितींत शरीर आपोआपच सांवरत आहे आणि शरीरांतील वायु एकवट होत आहेत असा अनुभव येऊं लागेल. १९० अशा अवस्थेत बसल्याबरोबर प्रवृत्ति पराङ्मुख होऊन जाते, चित्ताची समाधि म्हणजे एकाग्र समस्थिति अलिकडे येते, आणि योगाभ्यासाचें साधन घडतें. ९१ १ हरिणाजिन, मृगचर्म. २ साम्र, अखंड ३ नीट काळजीने ४ सहजगत्या ५ खडबडीतपणा, दमटपणा, इत्यादि भूगत दोष, ६ रुखरुख, चुकवूळ. ७ उत्कर्ष. ८ तोंड फिरवते, मुरडते. ९ साधतें, येर्ते,