पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६४ सार्थ श्रीज्ञानेश्वरी ऐसें शृंगारियांहि उपजे । देखते वो ॥ १७० ॥ जें येणेंमानें वैरवंट । आणि तैसेंचि अति चोखट । जेथ अधिष्ठौन प्रगट । डोळां दिसे ॥ ७१ ॥ आणिकही एक पहावें । जें साधकीं वसतें होआवें । आणि जनाचेनि पॉयरवें । रुळेचिना ॥ ७२ ॥ जेथ अमृताचेनि पाडें । मूळाहीसकट गोडें । जोडती दाटें झाडें । सदाफळतीं ॥ ७३ ॥ पाउला पाउला उदकें । वर्षाकाळेंवीण अति चोखें । निर्झरें कां विशेखें । सुलमें जेथ ॥ ७४ ॥ हा आतपुही अळुमाळु । जाणिजे तरी शीतळु । पवनु अति निश्चळु । मंद झुळके ॥ ७५ ॥ बहुत करूनि निःशब्द | दाट न रिघे श्वापद । शुक हन पट्पद । तेउतें नाहीं ॥ ७६ ॥ पाणिलगे हंसें | दोनीचारी सारसें । कवणें एके वेळे वैसे | तरी कोकिळही हो कां ॥ ७७ ॥ निरंतर नाहीं । तरि आलींगेलीं कांहीं । होतु कां मयूरही । आम्ही ना न म्हणों ॥ ७८ ॥ परि आवश्यक पांडवा । ऐसा ठाव जोडावा । तेथ निगृढ़ मठ होआवा । कां शिवालय ॥ ७९ ॥ दोहींमाजी आवडे तें । जें मानलें होय चित्तें । बहुतकरूनि एकांतें । वैसिजे गा ॥ १८० ॥ म्हणोनि तैसें तें जाणावें । मन राहतें पाहावें । राहेल तेथ रचावें । आसन ऐसें ॥ ८१ ॥ सुंदर राज्य सोडून देऊन येथेच निवांत पडून राहावें. १७० तें स्थान अशा प्रकारचें रमणीय असावे. शिवाय तें इतकें शुद्ध असावें, कीं तेथें साक्षात् ब्रह्मस्वरूपच डोळयाला दिसावें. ७१ त्या स्थळांत आणखीही विशेष गुण हा असावा, कीं, तेथें योगाभ्यास करणाऱ्या साधकांचीच वस्ती असावी, इतर लोकांची पायचाल नसावी. ७२ तेथें मून्कंड्यांपासूनही अमृतासारखीं गोड लागणारी झाडे दाट वाढलेली आढळावी व त्यांवर बारमास फळें यावीं. ७३ तसेंच त्या स्थळीं वर्षाकाळाशिवाय इतर ऋतूंतही प्रत्येक पावलावर पाणी आढळावें, विशेषतः तेथें पाण्याचे वाहते झरे विपुल असावेत. ७४ तेथे ऊन अगदीं बेताचं असून, शीतळ व शांत वारा मंद झुळकीनें वाहावा. ७५ तें स्थान बहुतेक निःशब्द असून, सावज तर काय, पण पोपट किंवा भुंगा याचाही प्रवेश होऊ शकणार नाहीं, इतकें तें गर्द असावें. ७६ पाण्याच्या आसन्याला राहणारे हंसपक्षी, व दोन चार पाणकोंबड्यांसारखे इतर पक्षी इतकेच जेथें आढळतात, आणि एकादे क्वचित् काळी एकादा कोकिळ जेथे बसत आहे, असें तं स्थळ असावं. ७७ त्याप्रमाणेच जरी नेहमीं नाहीं, तरी मधून मधून कांहीं मोरही त्या स्थळीं येते जाते राहाण्याचा संभव असला तरी चालेल. ७८ परंतु, अर्जुना, असं स्थान मोठ्या साक्षेपानं शोधून काढावें, आणि मग तेथे एकादा मठ अथवा शिवमंदिर पाहावें. ७९ या दोहोंपैकीं आपल्यास मानेल तें निवडावें आणि तेथे अगदीं एकांतांत बसावें. १८० आपल्याला कोणतं ठिकाण योग्य आहे हे पाहण्याची रीत अशी आहे कीं, आपलं मन कोणत्या जागीं शांत व निश्चळ राहातें यात्रा अनुभव घ्यावा, आणि तें जेथें असें राहील, त्या जागेची निवड १ देखतां क्षणी. २ उत्तम, श्रेष्ठ ३ ब्रह्मानंद. ४ पायचालीनें. ५ नाजूक ( पाण्याच्या आसपास राहणारी ७ रमतें.