पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सहावा १६३ हें सांगों काय सहजें । जाणसी तूं ॥ १६० ॥ तेथ पार्थे म्हणितलें देवा । तरि तेंचि मग केव्हां । कां आर्तिसमुद्रौनि न काढावा | बुडतु जी मी ॥ ६१ ॥ तंव कृष्ण म्हणती ऐसें । हें उत्संखळ बोलणें कायसें । आम्ही सांगतसों आपैसे । वरि पुशिलें तुवां ॥ ६२ ॥ शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः । नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजिनकुशोत्तरम् ॥ ११ ॥ सम० - स्थापूनियां शुद्ध देश स्थिर आसन आपुलें । न बहु उंच ना नीच कुशचर्मावरी पट ॥ ११ ॥ आर्या-शुद्ध स्थान अपुर्ले स्थिर आसन घालुनी सुयोगरतें । अत्युच्च नीचहि न जें वस्त्राजिन दर्भ ज्यांत उत्तर तें ॥ ११॥ ओंवी - पवित्र शुद्ध देशीं जाण । स्थिर करावें आसन । उंचनीच नसावें जाण । कुशचर्म वस्त्र आंथरोनी ॥ ११ ॥ तरी विशेषं आतां वोलिजेल । परि तें अनुभवें उपेगा जाईल । म्हणोनि तैसें एक लागेल | स्थान पाहावें ॥ ६३ ॥ जेथ आराणुकेचेनि कोडें । वैसलिया उठों नावडे । वैराग्यासी देणीव चढे । देखिलिया जें ॥ ६४ ॥ जो संत वसविला ठाव | संतोपासि सवावो । मना होय उत्सावो । धैर्याचा ॥ ६५ ॥ अभ्यासुचि आपणयातें करी । हृदयातें अनुभव वरी । ऐसी रम्यपणाची थोरी । अखंड जेथ ॥ ६६ ॥ जया औड जातां पार्थी । तपश्चर्या मनोरथा । पाखांडियाही आस्था | समूळ होय ॥ ६७ ॥ स्वभावें वाटे येतां । 'जरी वरपंडा जाहला अवचितां । तरि सामुही परि माघौता । निधों विसरे ॥ ६८ ॥ ऐसेनि न राहतयातें राहवी । भ्रमतयातें वैसवी । थापटूनि चेववी । विरक्तीतें ॥ ६९ ॥ हें राज्य वर सांडिजे । मग निवांता एथेंचि असिजे । तुला मग आपोआप स्वानुभवानें कळेल. " १६० तेव्हां अर्जुन म्हणाला, “ देवा, तें ' मग ' म्हणजे केव्हां, हेंच मला पाहिजे आहे. मी तर या उत्कंठेच्या सागरांत बुडत आहे, आणि तुम्हीं मला यांतून बाहेर काढू नये ? " ६९ तेव्हां श्रीकृष्ण म्हणाले, "पार्था, हें तुझें बोलणें अतिशय उतावीळपणाचें आहे ! अरे, मी आपण होऊनच तुला सांगत होतों, तों, मध्येच तोंड घालून तूं हा प्रश्न केलास ! ६२ असो, आतां सांगोपांग वर्णन सांगतों, परंतु याचा अनुभव घेतला, तरच खरा उपयोग होणार आहे. योगाभ्यास करावयाचा म्हणजे पहिल्या प्रथम एक योग्य स्थान पाहिलें पाहिजे. ६३ तें असें असावें, कीं, जेथें विश्रांतीच्या इच्छेनें बसलें असतां, येथून हालूंच नये, असें वाटावें; ज्याच्या 'देखाव्यानें वैराग्याला दुप्पट जोर यावा; ६४ जेथे संतजनाची वसति असल्यामुळे संतोषाची पुष्टि होते आणि मनाला धैर्याचा पाठिंबा मिळतो; ६५ जेथें योगाभ्यास आपोआप घडावा, आणि जेथील रमणीयतेनें हृदयाला आत्मानंदाचा अनुभव यावा; ६६ अर्जुना, ज्या स्थानाच्या नुसतें समोर गेलें असतांही पाखंड्याला तपश्चर्या करण्याची बुद्धि व्हावी; ६७ अरे, जेथें एकादा सहज वाटेने जाणारा अवचित आला तरीही तो सकाम असतांही तेथून परत जाण्याचें विसरावा ! ६८ असे स्थळ न राहणारालाही डांबून टाकतें, भटकणाराला स्थिर करितें, आणि वैराग्याला थापटी मारून जागे करतें. ६९ तें पाहताक्षणीच विषयसुखलंपटालाही असे वाटावें, कीं, आपले संसाराचें १ आपण होऊनच. २ स्वस्थतेच्या ३ दुप्पटपण येतें, ४ विस्तार, ५ पुढे, समोर. ६ सहज प्राप्त झाला,