पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६२ सार्थ श्रीज्ञानेश्वरी होय विरक्तु ऐसा अनंता । भरंवसा जाहला ॥ १५०॥ म्हणे जें जें हा अधिष्टील । 'तैं आरंभींच यया फळेल । म्हणोनि सांगितला न वचेल | अभ्यासु वायां ॥ ५१ ॥ ऐसें विवरोनियां श्रीहरी । म्हणितलें तिये अवसरीं । अर्जुना हा अवधारीं । पंथराजु ।। ५२ ।। तेथ प्रवृत्तितरूच्या वुडीं । दिसती निवृत्ति- फळाचिया कोडी । जिये मार्गांचा कापडी । महेशु आझुनी ॥ ५३ ॥ पैल योगिवृंदें वहिलीं । आडवीं आकाशीं निघालीं । कीं तेथ अनुभवाच्या पाउलीं । धोरं पडिला ॥ ५४ ॥ तिहीं आत्मवोधाचेनि उर्जुकारें । धांव घेतली एकसरें । कीं येर सकळ मार्ग निर्देसुरे । सांडूनियां ॥ ५५ ॥ पाठीं महर्षि येणें आले । साधकांचे सिद्ध जाहाले । आत्मविद थोरोवले । येणेंचि पंथें ॥ ५६ ॥ हा मार्ग जैं देखिजे । तैं तहान भूक विसरजे । रात्रिदिवस aणजे | वाटे इये ॥ ५७ ॥ चालतां पाउल जेथ पडे । तेथ अपवर्गाची खाणी उघडे | आव्हांटलिया तरी जोडे । स्वर्गसुख ॥ ५८ ॥ निगिजे पूर्वीलिया मोहरा । कीं येजे पश्चिमेचिया घरा । निश्चळपणें धनुर्धरा । चालणें एथींचें ॥ ५९ ॥ येणें मार्गे जया ठाया जाइजे । तो गांवो आपणचि होइजे । आतां अर्जुनाविषयीं विश्वास वाटू लागला. १५० ते मनांत म्हणाले, " आतां हा जें जें करण्याचें मनांत आणील, त्याचें याला आगाऊच फळ मिळेल, असा हा सिद्ध झाला आहे. म्हणून जर याला आतां योगाभ्यासाचा उपदेश केला, तर तो निष्फळ होणार नाहीं. " ५१ अशी मनांत चाळणा करून श्रीकृष्ण अर्जुनास म्हणाले, “पार्था, आतां मी हा योगाभ्यासाचा राजमार्ग सांगतों, तो ऐक. ५२ या मार्गात वरवर प्रवृत्तिरूप वृक्षाच्या बुडाला निवृत्तीच्या फळाचे घड लागलेले आहेत. श्रीशंकर अजूनही याच मार्गानं प्रवास करीत असतात. ५३ इतर योगीजन पहिल्यापहिल्यांदा कांहीं दुसऱ्याच आडव्यातिडव्या मार्गानीं भरकटत गेले, पण शेवटीं अनुभवाच्या पायरवाने हाच राजमार्ग त्यांनीं स्वीकारला. ५४ त्यांनीं दुसरे सगळे अज्ञानाचे आडमार्ग सोडून आत्मबोधाच्या या सरळ वाटेनें एकसारखा पल्ला खेटला. ५५ योग्यांनंतर महान् महान ऋषीही याच मार्गाने चालून आले, आणि साधकांच्या अवस्थेतून निघून सिद्धपणाला पोचले. मोठमोठे आत्मवेत्ते याच वाटेनें प्रतिष्ठेला चढले. ५६ हा योगाचा राजमार्ग एकदां दिसला, कीं तहानभूक हारपते. या वाटेवर रात्री आणि दिवस असा कालभेदच नाहीं. ५७ ही वाट चालत असतां जेथें पाऊल पडतें, तेथें तेथें मोक्षाची खाणच उघडते, किंवा मध्येच कांहीं आडफांटा आला, तरी स्वर्गसुख हें रोकडें ठेवलेलेच असते. ५८ पूर्वेकडे जा, की पश्चिमेकडे जा, या मार्गातला प्रवास अगदी शांतपणें व अचूक होत असतो. ५९ या वाटेनें ज्या गांवाला आपण जावें, तो गांव आपणच स्वतः होतों, हें मी आतां सांगितलें पाहिजे, असें नाहीं, तें १ प्रवासी, २ वाट ३ सरळ दिशेने. ४ भलतीचकडे नेऊन भूल पाडणारे. ५ श्रेष्ठ पदास पावले. ६ मोक्षाची ७ दिशाभूल होऊन आडवाटेस लागल्यास. ८ पूर्वेच्या वाटेला.