पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२० 深 प्रस्तावना ज्ञानदेवीची रचना सामान्य लोकांना परमार्थाची ओळख करून देऊन खऱ्या भक्तिमार्गाला लावण्याकरितां झाली, हे स्वयंसिद्धच आहे. परंतु श्रोत्यांना हें परमार्थाचं विवेचन रूक्ष व शुष्क वाटू नये, म्हणून तें रसाळ काव्यमय करण्याचाही त्यांनी चंग बांधला होता. काव्यांत शृंगाररसाला बहुशः प्राधान्य असतें, परंतु शृंगारावरही शांतरस ताण करील असें सोज्वळ काव्य रचण्याची आकांक्षा ज्ञानदेवांनी मनांत धरली होती. संस्कृताला ते बहुमान देतच असत, पण प्राकृत मराठीही गीर्वाणवाणीच्या पोटीं बसण्याच्या योग्यतेची आहे, हेंही त्यांस प्रत्यक्ष कृतीने दाखवावयाचे होतें. ते म्हणतात--- देशियेचेनि नागरपणें शांतु शृंगारातें जिणे, तरि ओंविया होती लेणें साहित्यासी. ४२ मूळग्रंथींचिया संस्कृता वरि मन्हाठी नीट पढतां, अभिप्राय मानलिया चित्ता, कवणभूमी ? हं न चोजवे. ४३. जैसें आंगाचेनि सुंदरपणें लेणिया आंगचि होय लेणें, तेथ अळंकारिलें कवण कवणें ? हें निर्वचेना. ४४ तैसी देशी आणि संस्कृत वाणी एका भावार्थाच्या सुखासनीं शोभती आयणी चोखट, आइका. ४५ उठावलिया भावा रूप करितां रसवृत्तीचे लागे वडप, चातुर्य म्हणे, पडप जोडिलें आम्हां. ४६ तैसें देशियेचं लावण्य हिरोनि, आणिलें तारुण्य, मग रचिलें अगण्य गीतातत्त्व. ४७ अध्याय १०. अशा प्रकारचे मराठीच्या पुरस्काराचे व काव्यपरिपोषासंबंधीचे उद्गार ज्ञानदेवींत वाचकांना ठिकठिकाणीं, विशेषतः अध्यायांच्या प्रस्तावनांत व उपसंहारांत, मुबलक आढळतील. ज्ञानदेवीची भाषा फारच कोमल, मधुर, प्रौढ, व वेचक आहे. वसंताच्या घरीं जशी दलकुसुम संपत्ति लोळत असावी, त्याचप्रमाणे ज्ञानदेवांच्या संग्रहीं शब्दसंपत्ति व कल्पनासंपत्ति अलोट असलेली आढळांत येते. त्यांच्या उपमा व रूपकें प्रसंगोचित असतात इतकेंच नव्हे, तर त्यांत कल्पनेची भरारी व प्रतिभेची प्रभा या दोन्ही प्रत्ययास येतात. सारांश तत्त्वज्ञानी, पंडित, कवि व भक्त, या चारी भूमिका ज्ञानदेवांत एकवटलेल्या आहेत. दाखल्यांच्या निमित्तानें ज्ञानदेवांनी आपल्या वेळच्या लोकांचे व्यवसाय, व्यवहार, आचार, कलाकौशल्य, कल्पना, समजुती, वगैरेंचे इतके विपुल उल्लेख केले आहेत कीं, त्यांचा संग्रह केल्यास एक मोठा ग्रंथच होईल. कै. राजारामशास्त्री भागवत यांनी अशा प्रकारचा थोडासा प्रयत्न केलाही होता. असो. ज्ञानदेवीच्या रचनेनंतर ज्ञानदेव वारकरी संप्रदायांत नामदेवांच्या संगतीनें समाविष्ट झाले, आणि लवकरच त्याचें अध्वर्युत्व त्यांच्या गळीं पडलें. यानंतर ज्ञानदेवांनी आत्मरंजनाकरितां व विठ्ठलसंप्रदायाकरितां अमृतानुभव, अभंग व पर्दे यांची रचना केली. ही रचना परमार्थपर व भक्तिपर आहे, व ती सर्व वारकरी संप्रदायांतील भजनी मंडळीच्या जिव्हाग्री अजूनही खेळत असते. यानंतर नामदेवांना व इतर वैष्णव संतांना बरोबर घेऊन ज्ञानदेव उत्तर हिंदुस्थानांत तीर्थयात्रा करण्यास गेले. याच तीर्थाटनांत त्यांनी वैष्णव पंथाचा प्रसार पंजाबसारख्या दूरच्या प्रांतांतही केला. तीर्थाटनाहून परत स्वदेशी आल्यावर शा. श. १२१८ कार्तिक वद्य त्रयोदशीस ज्ञानदेव महाराजांनी आळंदीस आपल्या भावंडांच्या व नामदेवादि संतमंडळीच्या समक्ष जीवत्समाधि घेतली. ज्ञानदेवांनंतर त्यांची तीन्ही भावंडे एकदीड वर्षाच्या आंत एकामागून एक परंधामास गेली. ज्ञानदेवांनी समाधि घेतल्यावर अगदीच अल्प काळानें महाराष्ट्रावर मुसलमानांच्या स्वायांची आपत्ति कोसळण्यास आरंभ झाला. मराठ्यांचे राज्य गेलें व अविधशाही सर्वत्र सुरू झाली. या स्थितीत हिंदु समाजाची देना उडाली.. जिकडेतिकडे तारांबळ उडून समाजसंस्थांची पांगापांग झाली. यांत वैष्णव संप्रदाय निस्तेज होऊन गेला, तर त्यांत आश्चर्य कसले ? हा संप्रदाय राजकीय उचापचीत कधींच पडला नाहीं, तरी पण मुसलमानांचा धार्मिक कडवेपणा त्याला जाचक झालाच. तीर्थयात्रा, भजनें, वाप्या, यांना धक्का बसला, व संतकवींच्या ग्रंथरचनेलाही माघार आली. प्रत्यक्ष ज्ञानदेवांच्या समाधिस्थानाभोंवतीं रान माजून तिच्या ठावठिकाणाचाही कोणास मागमूस 涼涼涼涼涼涼涼涼涼涼涼涼涼涼涼涼涼涼涼涼沖神沖