पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

涼 ज्ञानदेवीचे शुद्धीकरण २१ राहिला नाही, अशी स्थिति उत्पन्न झाली. तरी अशा स्थितीतही लोकांनी ज्ञानदेवीच्या प्रती आदराने बाळगून ठेवल्या, व तिर्चे नित्यपठण करण्याचा क्रमही पुष्कळांनी चालू ठेवेला. ज्ञानदेवांच्या काळानंतर सुमारे तीनशे वर्षांनी म्हणजे शा. श. १५०६ मध्ये एकनाथमहाराजांनी ज्ञानदेवीचे संस्करण केलें. एकनाथांचे गुरु जनार्दनस्वामी है ज्ञानदेवीचा नित्यपाठ करीत असत, आणि एकनाथांचे या ग्रंथावर लहानपणापासूनच प्रेम जडलें. त्यांनी या ग्रंथाच्या पुष्कळ प्रती पाहिल्या, पण अपपाठांमुळे मूळच्या शुद्ध ग्रंथाची फार घाण झाली आहे, असें त्यांच्या ध्यानीं आलें. तेव्हां एकनाथांनी अनेक प्रती जुळवून ज्ञानदेवीची एक शुद्ध प्रत तयार केली. एकनाथस्वामी सांगतात- श्रीशके पंधराशें साहोत्तरी, तारणनामसंवत्सरीं, एका जनार्दनें अत्यादरीं, गीता - ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली. ग्रंथ पूर्वीच अतिशुद्ध, परि पाठांतरीं शुद्ध अबद्ध, शोधूनियां एवंविध, प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी. यावरून एकनाथांच्या पूर्वीच ज्ञानदेवी ग्रंथाचा प्रसार पुष्कळ झाला होता व त्यांत लेखकांच्या चुकीनें, निष्काळजीपणानें, किंवा धाष्टर्थ्यानें, अनेक अपपाठ घुसून अर्थाचा खेळखंडोबा उडाला होता, हें उघड आहे. एकनाथांनी ज्ञानदेवीचा जीर्णोद्धार केला, याचा अर्थ ज्ञानदेवी ग्रंथ कोठें कोनाकोपऱ्यांत अंधारांत गुडूप झाला होता, तो पुन्हा एकनाथांनी लोकांच्या नजरेस आणला असा नव्हे, तर लोकांत प्रचलित असलेल्या प्रतीतील अपपाठ त्यांच्या लक्षांत आल्यावरून त्यांनी त्या ग्रंथांची एक शुद्ध प्रत तयार केली, व तिचा वारकरी पंथांत प्रसार केला, इतकाच आहे. एकनार्थानीं ज्ञानदेवांच्या समाधीचा शोध लाविला, व आळंदीच्या यात्रेची प्रथा सुरू केली, ती अद्याप चालू आहे. मुरूड-जंजिरा, वैशाख, शु० १२, शके १८५०. } बा. अ. भिडे १. कै. वि. ल. भावे म्हणतात कीं, "ज्ञानेश्वरांनंतर लौकरच त्यांचे ग्रंथाचा लोप झाला होता, एकनाथासारख्यालाही त्यांचा तो अद्वितीय ग्रंथ मिळविण्याला फार खटपट करावी लागली. " ( महाराष्ट्र सारस्वत, भाग १ ला, आवृत्ति ३ री, पृ. १४२ ) परंतु हे खरे नाही असे वरील विवेचनावरून वाचकांच्या ध्यानी येईल. 冰涼涼涼涼涼涼涼涼涼涼涼涼涼涼涼涼涼涼涼涼涼涼涼