पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

安 विठ्ठल संप्रदाय १९ दैवताचा प्रत्यक्ष उघड उल्लेख कोठेही केला नाहीं. तरी पण विठ्ठलाचा मुग्ध उल्लेख एका ठिकाणी आढळतो पंढरिनाथाच्या मूर्तीचा विशेष हा आहे की, मूर्तीच्या मस्तकीं मुकुट नसून शंकराची पिंडी आहे. विठ्ठलमूर्तीच्या या अनन्यसामान्य लक्षणाचा ज्ञानदेवांनीं आपल्या भावार्थदीपिकेत एके ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलेला आहे - मग याहीवरी पार्था माझ्या भजनीं आस्था, तरि तयातें मी माथां मुकुट करी. २१४ उत्तमासि मस्तक खालविजे हैं काय कौतुक ? परी मानु करिती तिन्ही लोक पायवणियां. ११५ तरि श्रद्धावस्तूसी आदरु करितां जाणिजे प्रकारु, जरी होय श्रीगुरु सदाशिवु. ९१६. अध्याय १२. इतके शब्द कृष्णांचे तोंडी घालून, भाष्यकार ज्ञानदेव म्हणतात कीं, कृष्णांच्या मनांत असें सांगावयाचें होतें कीं, " माझा एकनिष्ठ भक्त शंकर याला मी आपल्या मस्तकावर धारण केले आहे की नाहीं, हें तोच सांगेल. " परंतु यांत आत्मस्तुति होऊन विषयांतर होते म्हणून श्रीकृष्णांनी हें सांगण्याचे टाळलें, तेंच मी श्रोत्यांना स्पष्ट करून सांगत आहे !'- परि हें असो आतां महेशातें वानितां आत्मस्तुति तत्त्वता संचारु असे. २१७ यालागीं हैं नोहे म्हणितलं रमानाहें, 'अर्जुना, मी वाहें शिरीं तयांतं. २१८. अध्याय १२. हा विठ्ठलाविषयींचा मुग्ध पण निःसंदेह उल्लेख सर्व ज्ञानदेवत एकमेवाद्वितीय आहे. आतां ज्या भावार्थदीपिकाकारांना पांचसात ठिकाणची मंगलाचरणें, गुरुभक्ति, योगसाधन, श्रोत्यांना उद्देशून लडिवाळपणाचीं भाषणे, इत्यादिकांचा विस्तार करण्यास प्रसंग व सवड सांपडली, त्यांनी मनांत आणले असतें तर पंढरिनाथाचाही उल्लेख कोठे ना कोठें तरी त्यांनी खास केला असता, आणि त्या वेळी जर ते पंढरीच्या विठ्ठलसंप्रदायाला मिळालेले असते, तर त्यांनी असा उल्लेख करण्याचें खास मनांत आणलें असतें. परंतु ज्या अर्थी या दोन्ही गोष्टी घडलेल्या आढळत नाहींत, त्या अर्थी भावार्थदीपिका रचीत असतां ज्ञानदेवांचा विठ्ठल संप्रदायाशी संबंध जडलेला नव्हता, हें सरळ अनुमान गळी पडते. नेवाश्यास ज्ञानदेव आपलें भाष्य संतमंडळीपुढे निवृत्तिनाथांसमक्ष करीत असत, असे त्यांनीच वारंवार सांगितलें आहे. या श्रोतृमंडळांत नाथपंथीयांचा बराच भरणा होता, असें वर एका उताऱ्यावरून दाखविलेंच आहे. पण या श्रोतृवर्गात पंढरीचे वैष्णववीर नामदेवही होते, असें दिसतें. ज्ञानदेवांचे भक्तीवरील व्याख्यान ऐकून नामदेव अगदी तल्लीन झाले, व ते ज्ञानदेवांचे प्रेमांकित होऊन त्यांचे शब्द परमानंदानें झेलूं लागले. ज्ञानदेवांवरही नामदेवांच्या पुंडलीकवरद हरिविठ्ठलाविषयीं असलेल्या निरतिशय एकनिष्ठ सख्यभक्तांचा खोल परिणाम झाला. एवंच या दोन्ही प्रेमळ महात्म्यांची अंतःकरणे अत्यंत दृढ स्नेहग्रंथीने एकत्र जडलीं, आणि ही गांठ ज्ञानदेवांच्या समाधिकाळापर्यंत अखंड राहिली, इतकेंच नव्हे, तर विठ्ठलसंप्रदायानें ज्ञानदेवीला आपल्या पंथाची ' आदि ' ग्रंथमाता ठरवून, ज्ञानदेवांचा पंढरीच्या वैष्णव संप्रदायाबरोबरचा जिव्हाळ्याचा संबंध अद्यापपर्यंत अबाधित राखला आहे, व पुढेही तो तसाच चिरकाल राखला जाईल, यांत शंका नाहीं. ज्ञानदेवांची छाप विठ्ठल संप्रदायावर इतकी बसली की, त्याचे आद्यवीर भक्तशिरोमणि नामदेव यांचाही ज्ञानदेवांच्या अनुयायांत गणना होऊन विठ्ठलप्रसंदायाचा ' पाया रचण्याचा ' मान ज्ञानदेवांसच देण्यांत येतो. सारांश, विठ्ठल संप्रदायाशी जरी असा जीवभावाचा संबंध ज्ञानदेवांचा आहे, तरी तो भावार्थदीविकेच्या रचनेनंतर जडला, असें सिद्ध होतें. ज्ञानदेवीची रचना शा. श. १२१२ त समाप्त झाली, म्हणजे हें ग्रंथरत्न जन्मास आलें, त्या वेळी त्याचा जनक केवळ पंधरासोळा वर्षांचा होता. ज्ञानदेवांच्या अलौकिक बुद्धिसामर्थ्याची कल्पना होण्याला ही एवढीच साक्ष पुरेशी आहे. १ वारकरी संप्रदायाच्या नित्यपाठांतील एक अभंग असा आहे. - संतकृपा जाली, इमारत फळा आली. ज्ञानदेवें रचिला पाया, उभारिलें देवालया. नामा तयाचा किंकर, तेणें केला हा विस्तार. जनार्दनी एकनाथ ध्वज उभारिला भागवत. भजन करा सावकाश, तुका जालासे कळस.