पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सहावा १६१ परि तुमचेनि बोलें अवधारा । थोरात्रें जरी ॥ १४० ॥ जी तुम्ही चित्त देयाल | तरी ब्रह्म मियां हो जेल | काय जहालें अभ्यासिजेल | सांगाल जें ॥ ४१ ॥ हां हो नेणों कवणाची कहाणी | आईकोनि श्लाघिजत असों अंतःकरणीं । ऐसी जालेपणाची शिरयाणी । कायसी देवा ॥ ४२ ॥ हें आंगें म्यां होइजो कां । येतुले गोसांवी आपुलेपणें कीजो कां । तंव हांसोनि श्रीकृष्ण हो कां । करूं म्हणती ॥ ४३ ॥ देखा संतोषु एक न जोडे । तंवचि सुखाचें घ साँकडें । मग जोडलिया कवणेकडे । अपुरे असे ॥ ४४ ॥ तैसा सर्वेश्वरु बळिया सेवकें । म्हणोनि ब्रह्मही होय तो कौतुकें । परि कैसा भारें आतला पिकेँ । दैवाचेनि ॥ ४५ ॥ जो जन्मसहस्रांचियासाठीं । इंद्रादिकांहीं महागु भेटी । तो आधी तुला किरीटी । जे वोलुही न साहे ॥ ४६ ॥ मग ऐका जें पांडवें । म्हणितलें म्यां ब्रह्म होआवें । तें अशेपही देवें । अवधारिलें ॥ ४७ ॥ तेथ ऐसेंचि एक विचारिलें । जे या ब्रह्मत्वाचे डोहळे जाहले । परि उदरा वैराग्य आहे आलें । बुद्धीचिया ॥ ४८ ॥ न्हवीं दिवस तरी अपुरे | परी वैराग्यवसंताचेनि भरें । जे सोहंभाव महुरे । मोडोनि आला ॥ ४९ ॥ म्हणोनि प्राप्तिफळी फळतां । ययासि वेळु न लगेल आतां । योग्यता नाहीं, परंतु तुमच्या उपदेशानें हीं लक्षणें साधण्याइतका मी मोठा व समर्थ होईन. १४० तेव्हां तुम्हीं जर हे मनास आणाल, तर मी निःसंशय ब्रह्मच होईन. तुम्ही मला जें कांहीं करण्यास सांगाल, तें मी साक्षेपानें करीन. ४१ अहो, तुम्हीं ही कोणाची गोष्ट सांगितलीत, हें न समजतांही मी तिला इतकें नांवाजावें, मग मी जर प्रत्यक्ष तसाच झालों, तर, देवा, माझ्या सुखास पारावारच राहाणार नाहीं ! ४२ तेव्हां या सिद्ध पुरुषाच्या स्थितीला मी स्वतःच पोचावें, इतकें कार्य, हे सद्गुरो, आपण कराच कीं ! " तेव्हां 'वरें, तर, तुझ्या इच्छेप्रमाणेंच करतों, ' असें श्रीकृष्ण किंचित् हंसून म्हणाले. ४३ अहो, जोंपर्यंत संतोषाची जोड लाभली नाहीं, तोंपर्यंत 'सुख कसे मिळेल ? ' ही काळजी मनाला लागून राहते; पण त्या संतोषाचा एकदां लाभ झाला, म्हणजे इच्छेचें अपुरेपण कोठेही उरत नाहीं. ४४ तसाच, ज्यानें परमात्म्याची सेवा केली आहे, तो सहजच ब्रह्मस्वरूपाला पावतो; पण अर्जुनाच्या सुदैवाला कसा ओथंबून फलभार आला तो पहा ! ४५ अहो, जो हजारों जन्म घेतले तरी इंद्रादिकांनाही भेटणे कठीण, तोच परमेश्वर अर्जुनाला किती वश झाला, तें शब्दांनीं वर्णितांही येत नाहीं. ४६ मग ' मला ब्रह्म व्हावयास पाहिजे,' असें जें अर्जुन म्हणाला, तें सर्व श्रीकृष्णांनी नीट ऐकून घेतलें. ४७ तेव्हां श्रीकृष्णांनी मनांत असा विचार केला, कीं, "बुद्धीच्या पोटांत वैराग्याचा गर्भसंभव झाल्यामुळे याला ब्रह्मस्थितीचे डोहाळे होऊं लागले आहेत. ४८ पण हा वैराग्यगर्भ अजून अपुऱ्या दिवसांचा आहे, तरीही या वैराग्यवसंताच्या बहराने हा 'सोऽहमस्मि ' या मनोभावाच्या मोहरानें डवरून अगदीं ओथंबला आहे ! ४९ म्हणून ब्रह्मप्राप्तीचं फळ निपजण्याला आतां याला फारसा वेळ लागणार नाहीं, इतका हा विरक्त झाला आहे. " अशा प्रकारें श्रीकृष्णांना १ समर्थ. २१