पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६० सार्थ श्रीज्ञानेश्वरी आवडीचेनि पांगें। अमूर्तुही मूर्ति आंगे। पूर्णाहि परी लागे । अवस्था जयाची ॥ ३१ ॥ तंव श्रोते म्हणती दैवें । कैसी बोलाची हवावे । काय नादातें हन बरव । जिणोनि आली ॥ ३२ ॥ हां हो नवल नोहे देशी । महाटी बोलिजे तरी ऐशी । वाणें उमटताहे आकाशीं । साहित्य रंगाचें ॥ ३३ ॥ कैसें उन्मेख- चांदिणें तौर । आणि भावार्थ पडे गार । हेचि श्लोकार्थकुमुदिनी फार । सावियाँ होती ॥ ३४ ॥ चाडचि निचाडां करी । ऐसी मनोरथीं ये थोरी । तेणें विवळले अंतरीं । तेथ डोलु आला ||३५|| तें निवृत्तिदासें जाणितलें । मग अवधान द्या म्हणितलें । नवल पांडवकुळीं पहिलें । कृष्णदिवसें ॥ ३६ ॥ देवकीया उदरीं वाहिला । यशोदा सायासें पाळिला । शेखीं उपेगा गेला । पांडवांसी ॥ ३७ ॥ म्हणऊनि बहूदिवस वोळगांवा । कां अवसरु पाहोनि विनवावा । हाही सोद्धुं तया सदैवा । पडेचिना ॥ ३८ ॥ हें असो कथा सांगें वेगीं । मग अर्जुन म्हणे सलगी । देवा इयें संतचिन्हें आंगीं । न ठकती माझ्या ॥ ३९ ॥ एन्हवीं या लक्षणांचिया निजसारा । मी अपाडें कीर अपुरा । साकार व्हावें लागलें, आणि त्या पूर्णकामालाही उत्कंठेचा झांजरा लागला. ३१ हें ऐकून श्रोते म्हणाले, "केवढें हैं आमचें सुदैव ! या शब्दांत काय विलक्षण शोभा सांठविली आहे ! ही भाषेची गोडी जणूं काय गायनाच्या सप्तसुरांवर मात करून आली आहे ! ३२ अहो, काय ही नवलाची गोष्ट ? ही भाषा सामान्य प्राकृतांची असणेंच शक्य नाहीं. या भाषेला साधी 'मराठी' भाषा म्हणावें, तर ती साहित्यकलेंतील नानाप्रकारच्या अलंकाररसांच्या रंगांचें जाळें अद्वैतप्रतिपादनांतही कसें उठावाने पसरीत आहे, पहा ! ३३ या मराठी भाषेतही ज्ञानाचें चांदणें कसें पिठासारखं पडलें आहे, आणि गूढ भावार्थाची शीतलाई सर्वत्र सारखी पसरली आहे. म्हणूनच हिच्या प्रकाशानें गीतेचीं श्लोकार्थरूपी कुमुदं आपोआपच विकास पावत आहेत. " ३४ या सुंदर व्याख्यानानें मनाच्या उत्कंठेला विलक्षण भरतं येऊन निष्काम श्रोतेही सकाम झाले, आणि अंतरींच्या आनंदाने त्यांचीं मस्तकें डोलूं लागलीं. ३५ ही श्रोत्यांची अवस्था ध्यानीं घेऊन निवृत्तिदासाने म्हटले, 'बाप हो, सावधान व्हा. श्रीकृष्णाच्या प्रसादप्रकाशानें पांडवांच्या कुळांत नवलाची प्रभात उजाडली यांत शंका नाहीं. ३६ या श्रीकृष्णांना देवकीनं उदरीं वाढविलें, यशोदेनं खस्ता खाऊन त्यांचें लालनपालन केलें, पण अखेर ते या पांडवांच्या उपयोगाला आले ! ३७ याच कारणास्तव या अर्जुनाला पुण्याईचं बळ अपार होते व श्रीकृष्णांची कृपा संपादन करण्याकरितां त्याला त्यांची दीर्घ काळ सेवा करावी लागली माहीं, कीं योग्य संधीची वाट पाहून प्रसादाची याचनाही करावी लागली नाहीं. ३८ परंतु हा विस्तार पुरा करून आतां ही मूळ कथाच त्वरेनें सांगतों. श्रीकृष्णांचें हें भाषण ऐकून अर्जुन जरा लडिवाळपणेच म्हणाला, "देवा, तुम्हीं कथन केलेलीं संतांची लक्षणे माझ्या अंगीं कांहीं दिसून येत माहींत. ३९ खरं पाहिलें असतां, ह्या लक्षणांचा सारांश आपल्या अंगी आणण्याला माझ्याजवळ पुरेशी १ पुरविण्याच्या इच्छेनें २ धारण करतो. ३ हांव, उत्कंठा ४ काय हे सुदैव. ५ कसब, हातोटी ६ उत्तम, स्वच्छ. ७ विकसित. ८ तल्लीन झाले, दंगले. ९ उजाडलें, उदयास आलें. १० सेवावा, सेवा करावी. ११ तिष्ठत राहाणे, वाट पाहात असणें.