पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सहावा १५९ हें असो वयसेचिये शेवटीं । जैसें एकचि विये वांझोटी । मग ते मोहाची त्रिपुटी | नाचों लागे ॥ २१ ॥ तैसें जाहलें श्री अनंता । ऐसें तरि मी न म्हणता । जरी तयाचा न देखता । अतिशयो एथं ॥ २२ ॥ पाहा पां नवल कैसें चोज । के उपदेशु केउतें झुंज । परि पुढे वाले भाचें भोजे । नाचत असे ॥ २३ ॥ आवडी आणि लाजवी । व्यसन आणि शिणवी । पिसें आणि न भुलवी । तरी तें काई ॥ २४ ॥ म्हणऊनि भावार्थ तो ऐसा । अर्जुन मैत्रियेचा कुर्वोसा । कीं सुखें शृंगारलिया मानसा । दर्पणु तो ॥ २५ ॥ यापरी वाप पुण्यपवित्र । जगीं भक्तिवीजासि सुक्षेत्र । तो श्रीकृष्णकृपे पात्र । याचिलागीं ॥ २६ ॥ हो कां आत्मनिवेदनातळींची । जे पीठिका होय सख्याची | पार्थ अधिष्ठात्री तेथींची | मातृका गा ॥ २७ ॥ पासींचि गोसावी न वर्णिजे । मग पाकाचा गुण घेईजे । ऐसा अर्जुन तो सहजें । पढिये हरी ॥ २८ ॥ पाहा पां अनुरागें भजे । जे प्रियोत्तमें मानिजे । ते पतीहूनि काय न वानिजे । पतिव्रता ॥ २९ ॥ तैसा अर्जुनचि विशेष स्तवावा । ऐसें आवडलें मज जीवा । जे तो त्रिभुवनींचिया दैवीं । एकायँतनु जाहला ॥ १३० ॥ जयाचिया 4 " इतकेंच काय; पण ज्याप्रमाणें म्हातारपणीं एकाद्या वांझेला एकच मूल व्हावें, म्हणजे ती पुत्रप्रेमाची पुतळी जशी नाचू लागते, २१ तशीच अवस्था या प्रसंगीं श्रीकृष्णांची झाली ! श्रीकृष्णांच्या या अर्जुनविषयक प्रेमाचा अतिरेक जर येथें दिसला नसता, तर मीही असें वर्णन केलें नसतें. २२ पण हें केवढे आश्चर्य पहा ! केवढा अद्वैताचा उपदेश, केवढी समरांगणावरील हाणामार, आणि येथें तर आपल्या समक्ष प्रेमाचं बाहुलें नाचत आहे ! २३ आणि खरें पाहिलें तर आवड आणि लाज, , व्यसन आणि तिटकारा, ' आणि 'पिसाट व शुद्धि,' या जोड्या एकत्र कशा आढळणार ? ' आवड म्हटली कीं 'लाज' सुटली, 'व्यसन' म्हटलें कीं ' तिटकारा ' लोपला, आणि 'पिसें ' म्हटलें कीं, 'शुद्धि' संपलीच ! २४ म्हणून सांगण्याचा भावार्थ हाच कीं अर्जुन हे भगवंतांच्या मैत्रीचें आश्रयस्थान, किंवा सुखानें फुललेल्या श्रीकृष्णांच्या अंतरंगाचा आरसाच होता. २५ अशा प्रकारें अर्जुनाची पुण्याई फारच थोर व पवित्र होती म्हणूनच श्रीकृष्णांच्या कृपेनें तो भक्तिवीज ग्रहण करण्याला सुपीक शेताप्रमाणें पात्र झाला. २६ किंवा नवविधा भक्तींतील शेवटची जी आत्मनिवेदन- भक्ति तिच्या पायथ्याशी असणारी जी आठवी सख्यभक्ति, त्या भक्तीची अर्जुन हा अधिदेवताच समजावी. २७ जवळच प्रत्यक्ष श्रीकृष्णस्वामी असतां त्यांचें वर्णन न करितां, त्यांचा दास जो अर्जुन त्याचेच गुण गात सुटावें, इतका अर्जुन श्रीकृष्णांचा लाडका होता ! २८ असें पहा, जी एकनिष्ठ प्रेमाने पतीची सेवा करिते आणि पति जिचा नेहमीं बहुमान ठेवितो, त्या पतिव्रतेची पतीपेक्षांही अधिक वाखाणणी होत नाहीं का ? २९ त्याप्रमाणेच अर्जुनाचीच विशेष स्तुति करावी असें माझ्या जीवाला वाटलें, कां कीं सगळ्या त्रिभुवनाची पुण्याई त्याच्या एकट्याच्या अंगीं होती; १३० कारण, या अर्जुनाच्या प्रेमाला वश होऊन त्या श्रीकृष्णपरमात्म्यांना अमूर्त असतांही १ प्रेमाची मूर्ति. २ प्रेमाचें. ३ बाहुलें. ४ आश्रयाचे स्थान. ५ चाकराचा. ६ पुण्याईला. ७ एकस्थान.