पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५८ सार्थ श्रीज्ञानेश्वरी हां गा नामचि एक जयाचें । पाहतां गगनही दिसे टांचें । गुण एकैक काय तयाचे । आकळशील तूं ।। ११ ।। म्हणोनि असो हें वानणें । सांगों नेणों कवणाचीं लक्षणें । दावावीं मिषें येणें । कां वोलिलों तें ॥ १२ ॥ ऐकें द्वैताचा ठावोचि फेडी । ते ब्रह्मविद्या किजेल उघडी । तरि ' अर्जुन पढिये ' हे गोडी । नासेल हन ॥ १३ ॥ म्हणोनि तें तैसें बोलणें । नव्हे सपातळ आईलावणें । केलें मनचि वेगळवाणें । भोगावया ॥ १४ ॥ जया सोहंभाव अटक | मोक्षसुखालागोनि रंकुँ । तयाचिये दिटीचा झणें कळंकु । लागेल तुझिया प्रेमा ॥ १५ ॥ विपायें अहंभाव ययाचा जाईल । मी तेंचि हा जरी होईल । तरि मग काय कीजेल । एकलेया ।। १६ ।। दिठीचि पाहतां निविजे । कां तोंड भरोनि बोलिजे । ना तरी दाटूनि खेव दीजे । ऐसें कवण आहे ॥ १७ ॥ आपुलिया मना वरवी । असमाई गोठी जीवीं । ते कवणेंसि चावळावी । जरी ऐक्य जाहलें ॥ १८ ॥ इया काकुळती जनार्दनें । अन्योपदेशाचेनि हातासनें । वोलामाजीं मन मनें । आलिंगूं सरलें ॥ १९ ॥ हें परिसतां जरी कानडें । तरी जाण पां पार्थ उघडें । कृष्णसुखाचेंचि रूपडें । वोतलें गा ॥ १२० ॥ इतकेंच नव्हे, तर, अर्जुना, ज्या योग्याच्या नुसत्या नांवाचाच विचार केला, तर त्याच्या मोठेपणापुढें हें अफाट आकाशही टांचं दिसतें, त्याचा एकेक अस्सल गुण तूं कसा ग्रहण करूं शकशील? १९ तेव्हां आतां हें वर्णन पुरे. खरोखर पाहिलें तर कोणाचीं लक्षणें सांगावयाचीं आणि मी हीं लक्षणें या निमित्तानें कां सांगितली, हेंच मला समजत नाहीं. १२ अर्जुना, वाचा, जी द्वैताचा ठावच निःशेष पुसून टाकते, ती ब्रह्मविद्या जर मी स्वच्छ उघडी केली, तर मग 'अर्जुन माझा लाडका आहे, ' या कल्पनेत जो मधुर रस आहे, तो नाहीं का नासून जाणार ? १३ म्हणून हें खऱ्या अद्वैताचें बोलणें नाहीं, तर यांत थोडीशी आडपडदणी आहे, हेतु हा कीं हें तुझ्या स्नेहाचें सुख भोगावयाला मन जरासे वेगळेपणाने राहावें ! १४ 'अहं ब्रह्मास्मि' या भावनेत गुरफटून जे मोक्षसुखाच्या लाभासाठीं जिकजिक करतात, त्यांची दृष्ट मात्र तुझ्या माझ्या प्रेमाला लागली नाहीं म्हणजे पुरे ! " १५ श्रीकृष्णांनीं मनांत विचार केला, कीं, "अद्वैतप्रतिपादन ऐकून जर या अर्जुनाचा अहंभावच नट झाला, आणि हा जर माझ्या रूपांतच समरसून गेला, तर मग मीं एकट्यानेच काय करावें ? १६ मग ज्याला पाहून मनाची शांति व्हावी, किंवा ज्याच्याबरोबर मोकळ्या भावानें तोंडभर बोलावें, किंवा ज्याला प्रेमभराने बळकट गळामिठी मारावी, असें मला कोण उरणार ? १७ जर अर्जुन माझ्या स्वरूप मिसळून लीन होऊन गेला, तर मग अंतरंगाला भरून उतू जाणारी अशी एकादी मनांतली चांगली गोष्ट कोणाजवळ बोलावी बरें ? " १८ अशा भावनेनें आतुर झालेल्या श्रीकृष्णांनी अद्वैतामध्येच द्वैताच्या उपदेशाचे निमित्त करून अर्जुनाचें मन आपल्या मनाकडे ओढून घेतले. १९ श्रोत्यांच्या कानाला कदाचित् हें वर्णन जरा अवघड लागेल, परंतु अर्जुन म्हणजे श्रीकृष्णांच्या सुखाची प्रत्यक्ष ओतीव मूर्तीच होती, हे लक्ष्यांत ठेवावें. १२० १ आडवस्त्र, आडपडदणी, २ गुंता ३ दीन, झुरणारा. ४ मळ,