पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सहावा १५७ अनारिसें । नव्हे जाणें ॥ १ ॥ जयाचें नांव तीर्थरावो । दर्शनें प्रशस्तीसि ठावो । जयाचेनि संगें ब्रह्मभावो । भ्रांतासही ॥ २ ॥ जयाचेनि वोलें धर्म जिये । दिठी महासिद्धींतें विये । देखें स्वर्गसुखादि इयें । खेळु जयाचा ॥ ३ ॥ विषयें जरी आठवला चित्ता । तरी दे आपुली योग्यता । हें असो तयातें प्रशंसितां । लाभु आथी ॥ ४ ॥ योगी युञ्जीत सततमात्मानं रहसि स्थितः । एकाकी यतचित्तात्मा निराशीरपरिग्रहः ॥ १० ॥ सम० - कर्मयोगीं चित्त योजी सदा एकांत सेवुनी । स्थिरचित्तें तनू एक टाकी आशापरिग्रह ॥ १० ॥ आर्या- जो संयम चित्तात्मा पार्था निष्काम संचयत्यागी । एकांतीं एकाकी ब्रह्मीं योजी मनास जो योगी ॥ १० ॥ ओंवी -- योगी एकांती बैसोनी । असावें रहस्य ध्यानीं । चित्त आत्मा जिंतोनी । टाकी आशा परिग्रह ॥ १० ॥ पुढती अस्तवेना ऐसें । जया पाहलें अद्वैतदिवसें । मग आपणपांचि आपणु असे । अखंडित ॥ ५ ॥ ऐसिया दृष्टी जो विवेकी । पार्था तो एकाकी | सहजें अपरिग्रही जे तिहीं लोकीं । तोचि म्हणऊनि ॥ ६ ॥ ऐसियें असाधारणें । निष्पन्नाचीं लक्षणें । अपुलेनि बहुवपणें । श्रीकृष्ण बोले ॥ ७ ॥ जो ज्ञानियांचा बापु | देखणेयांचे दिठीचा दीपु । जया दादुल्याचा संकल्पु । विश्व रची ॥ ८ ॥ प्रणवाचिये पेठे । जाहलें शब्दब्रह्म माजिठें । तें जयाचिये यशा धाकुटें । वेढूं न पुरे ॥ ९ ॥ जयाचेनि आंगिकें तेजें । आंवो रविशशीचिये वणिजे । म्हणऊनि जग हैं वेसेंजें - वीण असे तया ॥ ११० ॥ नाहीं. १००,१ ज्याला पवित्र वस्तूंचा राजा म्हणतात, ज्याचें दर्शन झालें असतां पूज्यबुद्धि उत्पन्न होते, ज्याच्या संगतीनें मोहमस्तालाही आत्मबोध होतो, ज्याच्या शब्दानें धार्मिकतेचें जीवन होतें, ज्याच्या दृष्टींत अष्ट महासिद्धि जन्म घेतात, स्वर्गसुखें इत्यादि ज्याला केवळ खेळणीं होतात, २, ३ त्याचें सहजी नुसतें स्मरण झालें, तरीसुद्धां त्या स्मरणानेंच तो स्मरणकर्त्याला आपल्यासारखा करतो; इतकेंच नव्हे, तर त्याची स्तुति केल्यानें मोठें कल्याण होतें. ४ ज्याचा पुढें कधींही अस्त घडत नाहीं, असा अद्वैतभावाचा दिवस ज्याला उजाडला, तो पुरुष आपल्या आत्मस्वरूपांत निरंतर स्थिर राहतो. ५ अर्जुना, अशा अद्वैतदृष्टीनें जो विचार करतो, तो अद्वितीय होतो, कारण तीन्ही लोकांत आत्मस्वरूपानें तोच ओतप्रोत भरला असल्यामुळें तो सहजच अपरिग्रही म्हणजे परिवारहीन राहतो. " ६ अशा रीतीनें श्रीकृष्णांनीं सिद्ध पुरुषाची ओळख पटण्यासारखीं विशेष लक्षणें अर्जुनाला सांगितलीं आणि असें करितांना त्यांनीं त्या सिद्ध पुरुषाचा गौरव आपल्या स्वतांपेक्षांही अधिक केला. ७ श्रीकृष्ण पुढें म्हणाले, “ जो योगी ज्ञानिजनांचा केवळ मुकुटमणि, किंबहुना जो ज्ञानिजनांच्या दृष्टीचा प्रत्यक्ष प्रकाश, ज्या समर्थाच्या संकल्पानेंच हें विश्व घडलें जातें, ८ ओंकाराच्या पेठेंत विणलेलें वेदरूपी उत्कृष्ट वाङ्मयवस्त्रही ज्याच्या यशाला वेढण्याला अपुरें होतें, ९ ज्याच्या अंगच्या तेजानें सूर्यचंद्रांचे व्यापार चालतात आणि म्हणून हैं ( सूर्यचंद्रांच्या प्रकाशांत वावरणारें ) जग ज्याच्या त्या तेजावांचून कर्महीन बनेल, ११० १ अकस्मात्, सहज. २ एकटा, अद्वितीय ३ परिवाररहित. ४ सिद्धाची, योग्याचीं. ५ आपल्या स्वतांपेक्षां अधिक गौरवाने. ६. समर्थांचा. ७ वाड्मय ८ उत्कृष्ट ९ प्रतिष्ठा, महत्व. १० कर्मद्दीन,