पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५६ सार्थ श्रीज्ञानेश्वरी मातियेचें डिखळ | सरिसेंचि मानी ॥ ९२ ॥ पाहतां पृथ्वीचें मोल थोडें । ऐसें अनर्घ्य रत्न चोखडें । देखे दगडाचेनि पाडें । निचांडु ऐसा ॥ ९३ ॥ सुहृन्मित्रार्युदासीनमध्यस्थद्वेष्यबन्धुषु । साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते ॥ ९ ॥ सम० - मित्र शत्रु उदासीन मध्यस्थ असखे सखे । साधु पापी अशां सर्वी समबुद्धि विशेष तो ॥ ९ ॥ आर्या-द्वेष्य उदासीन रिपू बंधू मध्यस्थ सुहृद अणि भित्र । साधू पापी यांला पाहे सम तो विशिष्ट सर्वत्र ॥ ९ ॥ ओवी - सोयरे बंधु मित्रजन । वैरी सखा उदासीन । यांतें मानी समान । तो समबुद्धि ॥ ९ ॥ तेथ सुहृदू आणि शत्रु । कां उदासु आणि मित्रु । हा भावभेदु विचित्रु | कल्पू कैंचा ॥ ९४ ॥ तया बंधु कोण काह्याचा | पिया कवणु तयाचा । मीचि विश्व ऐसा जयाचा । वोधु जाहला ॥ ९५ ॥ मग तयाचिये दिठी | अधमोत्तम असे किरीटी । काय पैरिसाचिया कंसवटी । बाँनिया कीजे ॥ ९६ ॥ ते जैसी निर्वाण वर्णुचि करी । तैसी जयाचि बुद्धि चराचरीं । होय साम्याची उजरी | निरंतर ॥ ९७ ॥ जे ते विवाळंकाराचे विसुंरे । जरी आहाती आनानें आकारें । तरी घडलें एकचि भांगारें । परवों ॥ ९८ ॥ ऐसें जाणणें जें बरवें । तें फावलें तया आघवें । म्हणोनि आहाचवाहाचे न झकवे । येणें आकारचित्रें ॥ ९९ ॥ घापे पटामाजि दृष्टी । दिसे तंतूंची घसृष्टी । परी तो एकवांचूनि गोठी । दुजी नाहीं ॥ १०० ॥ ऐसेनि प्रतीती हैं गवसे । ऐसा अनुभव जयातें असे । तोचि समबुद्धि हैं हीं दोन्हीं सारखींच समजतो. ९२ पृथ्वीच्या मोलाचें अपार किंमतीचें तेजस्वी रत्नही तो दगडासारखें मानण्याइतका निरिच्छ व समबुद्धि होऊन राहातो. ९३ मग अशा पुरुषाच्या ठिकाणीं स्नेही व शत्रु, परका व परिचित, अशा प्रकारच्या भेदभावांची विचित्र कल्पना करावी तरी कशी ? ९४ त्याच्या आत्मस्वरूप दृष्टीला कोण कोणाचा आप्त आणि कोण कोणाचा शत्रु ? 'मीच हे सर्व विश्व आहें,' असें निश्चित ज्ञान त्याला झालेलें असतें. ९५ मग त्याच्या दृष्टीला ' हें अधम, हें उत्तम, असें उरणार कोटोन ? अरे, परिसाचीच जर कसोटी केली, तर तिच्यावर सोन्याचे निरनिराळे कस लागतील का ? जें जें त्या कसोटीवर घांसावें तें तें निर्मळ सोनेच होऊन जाणार ! ९६ त्याप्रमाणेंच ज्याच्या निर्मळ बुद्धीच्या समत्वाचा असा गुण येतो की तिला सर्व स्थावरजंगम विश्व एक आत्मस्वरूपच दिसतें. ९७ हे विश्वरूपी अलंकार जरी निरनिराळ्या आकाराचे व घडणीचे भासले, तरी ते सर्व एकाच निर्मळ ब्रह्मरूप सोन्याचेच बनले • आहेत, हैं तो जाणतो. ९८ हें जें उत्तम प्रकारचं ज्ञान तें ज्याला पूर्णपणे प्राप्त झालें तो बाहेरच्या दिखाऊ आकाररूपानें चकत नाहीं. ९९ वस्त्राचा खोल विचार केला म्हणजे हा सर्व तंतूंचाच पसारा आहे, असें कळते त्याप्रमाणेंच तो, या विश्वांत एका परब्रह्मावांचून दुसरें कांहींच नाहीं, असें निश्चयेंकरून पाहतो. अशा प्रकारचा अनुभव ज्याला आला, तोच 'समबुद्धि' होय. समबुद्धिपण याहून कांहीं वेगळें आहे असें १ निरिच्छ व भेदभावहीन २ परिसाच्या धोंड्याच्या कसोटीवर ३ कस. ४ एकाच कसाचा. ५ व्यक्तिता, स्पष्टपणा, ६ विस्तार, पसारे. ७ सोन्याने ८ वरवरच्या, दिखाऊ, ९ घातल्यानें. १० सैंघ = एकत्र गुंफण.