पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सहावा १५५ तया स्वांतःकरणजिता । सकळकामोपशांता । परमात्मा परौता । दूर नाहीं ॥ ८१ ॥ जैसा किंडाळाचा दोषु जाये । तरी पंधरें तेंचि होये । तैसें जीवा ब्रह्मत्व आहे | संकल्पलोपीं ॥ ८२ ॥ हा घटाकारु जैसा । निमालिया तया अवकाशा । नलगे मिळों जाणें आकाशा | आना ठाया ।। ८३ ।। तैसा देहाहंकारु नाथिला । हा समूळ जयाचा नाशिला । तोचि प्रमात्मा संचला। आधींचि आहे ॥ ८४ ॥ आतां शीतोष्णाचिया वाहणी । तेथ सुखदुःखाची कर्डसणी । इयें न समाती कांहीं बोलणीं । मानापमानाची ॥ ८५ ॥ जे जिये वाटा सूर्य जाये । तेउतें तेजाचें विश्व होये । तैसें तया पावे तें आहे । तोचि म्हणउनी ॥ ८६ ॥ देखें मेघौनि सुटती धारा । तिया न रुपती जैसिया सागरा । तैसीं शुभाशुभ योगीश्वरा । नव्हती आनें ॥ ८७ ॥ जो हा विज्ञानात्मकु भावो। तया विवरितां जाहला वावो । मग लागला जंब पाहों । तंव ज्ञान तें तोचि ॥ ८८ ॥ आतां व्यापक की एकदेशी । हे ऊहापोही जे ऐसी । ते करावी ठेली पैशी । दुजेनवीण ॥ ८९ ॥ ऐसा शरीरीचि परि कौतुकें । परब्रह्माचेनि पाडें तुके । जेणें जिंतली एकें । इंद्रियें गा ॥ ९० ॥ तो जितेंद्रियु सहजें । तोचि योगयुक्त म्हणिजे । जेणें सानें थोर नेणिजे | कवणे काळीं ॥ ९१ ॥ देखें सोनयाचें निखेळ | मेरुयेसणें ढिसाळ । आणि 1 ज्यानें आपलें मन जिंकिलें आहे आणि ज्याच्या सर्व वांच्छा शांत झाल्या आहेत, अशा त्या पुरुषाला परमात्मा आपल्या स्वतःपासून कांहीं वेगळा व दूर आहे असें वाटत नाहीं. ८१ हिणकट भेसळ नाहींशी झाली म्हणजे जसें निर्दोष सोनें बाकी राहतें, तसेंच संकल्पाचें लिगाड नाहींसं झालें, म्हणजे जीवच परमात्मा होऊन राहातो. ८२ जसा घटाकार नाहींसा झाला कीं आकाशांत अवकाशाला मिळून जाण्याला स्थानांतर करावें लागत नाहीं, ८३ तसाच ज्याचा खोटा देहाभिमान समूळ गळून गेला, त्याला परमात्मरूप होण्याला दुसरें कांहींच करावें लागत नाहीं, कारण तो मूळचाच परमात्म्याने ओतप्रोत भरलेला आहे. ८४ मग अशा पुरुषाच्या ठिकाणीं शीतोष्णादि सुखदुःखांचा विचार व मानापमानाची भाषा, हीं संभवतच नाहींत. ८५ अरे, ज्या ज्या वाटेला सूर्य जातो, तेथें तेथें जसें सर्व प्रकाशमय होतें, तसेंच अशा पुरुषाला जें जें कांहीं भेटतें, तें तप म्हणजे त्या पुरुषाच्या स्वरूपाशी समरस होऊन जाते. ८६ जशा ढगापासून पडणाऱ्या पाण्याच्या धारा समुद्राला कधींही वांचत नाहींत, तशाच या योगिनेवाला शुभाशुभ गोष्टी आत्मस्वरूपच झाल्यामुळे कधींही क्लेशकारक होत नाहींत. ८७ या संसारविषयक भावनेचा विचार करून ती भावना मायिक आहे असें निश्चित झाले, म्हणजे मग जों खोल पाहावें, तों तें ज्ञान, आत्मस्वरूपत्र होते. ८८ असे घडून आले, कीं, दुजेपणा हरपल्या कारणानें हें आत्मस्वरूपाचे तत्त्व व्यापक आहे कीं स्थलकालादिकांनी मर्यादित आहे हा ऊहापोह आपोआप जागचे जागींच जिरतो. ८९ अशा प्रकारें ज्याने इंद्रियांवर जय मिळविला, तो शरीर धारण करीत असतांच परब्रह्माच्या तोडीला येऊन पोचतो. ९० तोच खरा जितेंद्रिय; त्यालाच योगी म्हणावें; कां कीं, ज्याला कधींही लहानथोर हा भेदभाव स्पर्श करीत नाहीं, ९१ तो मेरूएवढा सोन्याचा डोंगर आणि लहानसे मातीचें ढेकूळ, १ हिणकदाचा, २ चोख सोनें. ३ पोकळीला. ४ दुसऱ्या ५ विचार, ६ चोख. ७ मेरु पर्वताएवढें. ८ मोठें देंकाड,