पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५४ सार्थ श्रीज्ञानेश्वरी आपण झांकी ॥ ७३ ॥ कां कवण एकु भ्रमलेपणें । मी तो नव्हें गा चोरलों म्हणे । ऐसा नाथिला छंद अंतःकरणें । घेऊनि ठाके ॥ ७४ ॥ एरवीं होय तें तोचि आहे । परि काई कीजे बुद्धि तैसी नोहे । देखा स्वप्नींचेनि घायें । की मरे साचें ॥ ७५ ॥ जैसी ते शुकाचेनि आंगभारें । नळिका भोविन्नली ऐरी मोहरे । तेणें उडावें परि न पुरे | मनशंका ॥ ७६ ॥ वायांचि मान पिळी | अंटुवे हियें आंवळी । टिटींतु नळी । धरूनि ठाके ॥ ७७ ॥ म्हणे बांधला मी फॅडा । ऐसिया भावनेचिया पडे खोडां । कीं मोकळिया पायांचा चवडा | गोंवी अधिकें ॥ ७८ ॥ ऐसा काजेंवीण आंतुडला । तो सांग पां काय आणि बांधला । मग न सोडीच जन्ही नेला । तोडूनि अर्धा ॥ ७९॥ म्हणऊनि आपणयां आपणचि रिपु । जेणें वाढविला हा संकल्प | येर स्वैयंबुद्धि म्हणे वपु । जो नाथिलें नेघे ॥ ८० ॥ जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः । शीतोष्णसुखदुःखेषु तथा मानापमानयोः ॥ ७ ॥ ज्ञानविज्ञानतृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः । युक्त इत्युच्यते यांगी समलोष्टाश्मकाञ्चनः ॥ ८ ॥ सम०-- शांताचें जितचित्ताचे थोर चित्त बरें स्थिर । मानापमानीं शीतोष्णीं सुखदुःखांत जें सम ॥ ७ ॥ ज्ञानें अनुभवें तृप्त जो कूटस्थ जितेंद्रिय । तो योगारूढ की हेम भेंडा धोंडा जया सम ॥ ८ ॥ आर्या - जितमन शांतारमा जो त्याचा आत्मा भवार्णवांत तरे । शीतोष्णीं सुखदुःखीं मानामान असे समाहित रे ॥७॥ जो कूटस्थ जितेंद्रिय विज्ञानज्ञानतृप्तिनें धाला । ढेकुळ धोंडा सोनें ज्या सम तो युक्त मान्य विबुधांला ॥८॥ ओव्या - मन जिणोनि शांति पावे । तया परानिष्ठा जाणावें । ऐसियासि सुखदुःख न पावे । तैसेच मानापमान ॥७॥ ज्ञानविज्ञानतृप्त झाले । अविनाश विषय गेले । जयां सुवर्णमृत्तिका है न कळे । ते योगी जाण तूं ॥ ८ ॥ आणि पुढें धनठेवा उघडला असतां, आपले देखणे डोळे झांकून तो ठेवा ओलांडून जातो ! ७३ कोणा एकाला भ्रम होतो, आणि तो बडबडत सुटतो, कीं, "अरे, हा मी नव्हें ! मी सांडलों आहें ! मला कोणी चोरून नेलें आहे !" असा भलताच छंद तो घेऊन बसतो. ७४ खरं पाहिलें, तर जीव ब्रह्मच आहे, पण काय करावें, त्याची बुद्धि या दिशेला वळतच नाहीं. अरे, स्वप्नांत वसलेल्या शस्त्राच्या घावानें कोणी खरोखर मरतो का ? ७५ पण या पुरुषांची स्थिति नटिकायंत्रावरील पोपटाप्रमाणे होते. पोपट नन्द्रिकायंत्रावर बसतो आणि त्याच्याच वजनानें नही फिरूं लागते. वास्तविक नळीनें उलटी गिरकी घेतांच त्या पोपटाने उडून जावें. पण त्याच्या मनांत भीतीचें वारें भरतें. ७६ उगाच मान मुरडतो, छाती आंखडतो, आणि चांचींत नळी घट्ट धरून राहातो. ७७ मी आतां खरोखरच जखडलों आहें, ' या खोट्याच कल्पनेच्या खोड्यांत तो असा अडकतो, कीं, आपल्या पायांचा मोकळा चघडा तो त्या यंत्रांत अधिकाधिक गुंतवून टाकतो. ७८ असा कांहीं कारण नसतां जो बांधला गेला, त्याला काय दुसऱ्याने जखडलें म्हणावयाचें ? पण अशा भ्रमांत तो एकदां गुंतला, कीं जरी त्याला अर्धा कापला, तरीही तो त्या नळीला सोडणार नाहींच ! ७९ म्हणून हे संकल्पविकल्प ज्यानें वाढविले, तो स्वतःच स्वतःचा शत्रु होतो. पण यावेगळ्या ज्या पुरुषानें 'मी आत्मा आहे,' या बोधाचा अनुभव घेऊन या नसत्याचा-खोट्याचा कधींच अंगीकार केला नाहीं तो श्रेष्ठ आत्मज्ञ असें मी म्हणतो. ८० १ उलट्या गिरकीने. २ वांकड्या छातीने ३ चोचीत. ४ खरोखर. ५ आत्मज्ञानी, ६श्रेष्ठ