पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सहावा १५३ तेथ अर्जुन म्हणे अनंता । हें मज विस्मो बहु आइकतां । सांगें तयाऐसी योग्यता । कवणें दीजे ॥ ६६ ॥ उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् । आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः ॥ ५ ॥ सम॰—उद्धरावें स्वचित्ताला प्रपंचीं बुडवूं नये । मित्र हैं आपुलें चित्त शत्रुही चित्त आपुलें ॥ ५ ॥ आर्या- उद्धरिजे अपअपणां करिजे अपुला न घात आहो तो। मित्रहि अपुला आपण पार्था अपुलाचि शत्रुही होतो ॥ ५ ॥ ओंवी — निज आत्मा उद्धरत । उद्योगावांचूनि मन ठेवित । आपला शत्रू आपण जाणत । मित्र आपुलें चित्त पैं ॥५॥ तंव हांसोनि श्रीकृष्ण म्हणे । तुझें नवल ना हें बोलणें । कवणासि काय दिजेल कवणें । अद्वैतीं इये ॥ ६७ ॥ पैं व्यामोहाचिये शेजे । वळिया अविद्या निद्रितु होइजे । ते वेळीं दुःस्वप्न हा भोगिजे । जन्ममृत्यूंचा ॥ ६८ ॥ पाठीं अवसांत ये चेवो । तें तें अवघेंचि होय वीवो। ऐसा उपजे नित्य सद्भावो । तोहि आपणांचि ।। ६९ ।। म्हणऊनि आपणचि आपणया । धातु कीजतु असे धनंजया । चित्त देऊनि नाथिलिया । देहाभिमाना ॥ ७० ॥ बन्धुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः । अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत् ॥ ६ ॥ सम०—मित्र त्याचेंच तें चित्त जे स्वरूपेंचि जिंकिलें । अनात्मज्ञास शत्रुत्वें वर्ते चित्तचि शत्रुवत् ॥ ६ ॥ आर्या- जिंकी मन जो त्याचें मानस तें आत्मबंधु हितकर तो । मानस अनात्मयाचे होते अपुला रिपूहि तो करतो ॥६॥ ओवी - बंधुरात्मा चित्त जिंतोनी । तें चित्त बंधु जाणोनी । स्वरूपीं वोळखी नाणी । चित्त शत्रुवत् वर्ते ॥ ६॥ हा विचारूनि अहंकार सांडिजे । मग असतीच वस्तु होजे । तरी आपली स्वस्ति सहजें । आपण केली ॥ ७१ ॥ एन्हवीं कोशकीटका चियापरी । तो आपणयां आपण वैरी । जो आत्मबुद्धि शरीरीं । चारुस्थळीं ॥ ७२ ॥ कैसे प्राप्तीचिये वेळे । निंदैवा आंधळेपणाचे डोहळे । कीं असते आपुले डोळे । हे ऐकून अर्जुन म्हणाला, 'देवा, हे श्रवण करून मला फारच नवल वाटत आहे. अशा पुरुषासारखी योग्यता कशी प्राप्त होईल, ते मला सांगा बरें.' ६६ तेव्हां श्रीकृष्ण हंसून म्हणाले, “अर्जुना, तुझेंच बोलणें मोठ्या नवलाचें आहे ! अरे, या अद्वैत अवस्थेत कोणी कोणाला आणि काय देणें शक्य आहे ? ६७ जेव्हां भ्रांतीच्या अंथरुणावर पुरुषाला कठीण मायेची तंद्री लागते, तेव्हांच त्याला जन्ममरणाचीं स्वमें पहूं लागतात. ६८ पण पुढे जेव्हां तो अकस्मात् जागा होतो, तेव्हां तो सर्व स्वप्नविषय खोटा ठरतो. पण पहिल्या भ्रांतीप्रमाणें हा आत्मबोधही त्याच्या स्वतःच्याच ठायीं असतो. ६९ पवंच, अर्जुना, तो नसत्या देहाभिमानाच्या नादी लागून आपणच आपला घात करीत असतो. ७० विचारपूर्वक आपण अहंभाव सोडावा आणि सब्रह्मरूप व्हावें, म्हणजे आपण आपले कल्याण केलें असें सहजच होतें. ७१ नाहींतर, स्वतःला कोशांत गुंडाळून टाकणाऱ्या कोशकिड्याप्रमाणें जो शरीराच्या सौंदर्याला भुलून त्यांतच आपला कोंडमारा करून घेतो, तो पुरुष स्वतःचाच स्वतः वैरी ठरतो. ७२ द्रव्यप्राप्तीची संधी आली असतां, कपाळकरंट्याला आंधळेपणाचे डोहाळे सुचतात ! १ व्यर्थ. २ आत्मबोध. २०