पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५२ सार्थ श्रीज्ञानेश्वरी हटिये सांडिती होडी । कडेलेग ॥ ५६ ॥ तरी अभ्यासाचेनि बळें । प्रत्याहारीं निराळें । नखी लागेल ढाळें | ळें । वैराग्याची ॥ ५७ ॥ ऐसा पवनाचेनि पाठारें । येतां धारणेचेनि पैसारें । क्रमी ध्यानाचे चैवरें । सांपडे तंव ॥ ५८ ॥ मग तया मार्गाची धांव । पुरेल प्रवृत्तीची हांव । जेथ साध्या साधना खेंवें । समरसें होय ॥ ५९ ॥ जेथ पुढील पैसे पोखे । मागील स्मरावें तें ठाके । ऐसिये सैंरिसीये भूमिके । समाधि राहे ॥ ६० ॥ येणें उपायें योगारूढ | जो निरवधि जाहला प्रौढु । तयाचिया चिन्हांचा निवाडु | सांगेन आइकें ॥ ६१ ॥ यदा हि नेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्जते । सर्वसंकल्प संन्यासी योगारूढस्तदोच्यते ॥ ४॥ - सम० – जेव्हां न विषयीं गुंते कर्मीही न रुते मन । भोगसंकल्पही टाकी तेव्हां आरूढ बोलिजे ॥ ४ ॥ आर्या - जेव्हां कुंतीतनया टाकुनि संकल्पजाळ-भारूड । कर्मी आणिक विषयीं उदास जो तोचि योग- आरूढ ॥ ४ ॥ ओवी - इंद्रियार्थी झाला हीन । कर्म निपजों राहे आपण । तयासी संन्यासी म्हणोन । योगारूढ बोलिजे ॥ ४ ॥ तरी जयाचिया इंद्रियांचिया घरा । नाहीं विषयांचिया येरझारा । जो आत्मबोधाच्या बोरां । पहुडला असे ॥ ६२ ॥ जयाचें सुखदुःखाचेनि आंगें । झगटलें मानस वो नेघे । विषय पासींही आलियां से न रिघे । हैं काय म्हणऊनि ॥ ६३ ॥ इंद्रियें कर्माच्या ठायीं । बौढीनलीं परि कहीं। फळ हेतूची चाड नाहीं | अंतःकरणीं ॥ ६४ ॥ असतेनि देहें एतुला । जो चेतुचि दिसे निदेला । तोचि योगारूढ भला । वोळखें तूं ॥ ६५ ॥ हट्टी योग्यांच्याही प्रतिज्ञा लटपटून त्यांचा कडेलोट होतो. ५६ परंतु संवयीनें व निश्चयवृत्तीनें या प्रत्याहाराच्या अधांतरीं मार्गातही हळूहळू वैराग्याची नखी लागू पडते. ५७ अशा रीतीनें वाऱ्याच्या पठारावरून धारणेच्या ऐसपैस प्रांतांत पोचावें. पुढें हाच प्रांत आक्रमीत ध्यानाचें टोंक लागेपर्यंत जावें. ५८ म्हणजे मग ही वाट तेथें संपते व प्रवृत्तीची हांव नाहींशी होते; कारण येथें साध्य आणि साधन यांची गळामिठी पडून, तीं एकरूप होतात. ५९ जेथें पुढें पाऊल टाकण्याची गोष्टच नाहींशी होते आणि गलीही आठवण उरत नाहीं, अशा योगसमाधीच्या नितळ भूमिकेवर तो योगी पुरुष आतां स्थिर राहतो. ६० अशा उपायानें योगसाधन करून जो पुरुष अत्यन्त उच्च अवस्थेला पोहोचतो, त्याच्या लक्षणांचा निर्णय सांगतों, तो श्रवण कर. ६१ ज्याच्या इंद्रियांच्या घरीं विषयांची ये-जा बंद होते आणि जो आत्मज्ञानाच्या खोलींत सुखानें आत्मानंदांत निजलेला असतो, ६२ ज्याच्या मनाला सुखदुःखाच्या आंगलटीस जाऊन झगडण्याचा चेव येत नाहीं, आणि इंद्रियविषय जवळ आले असतांही हे कोण याची ज्यास आठवणही नसते, ६३ इंद्रियें कर्माचरणाच्या मार्गाला लावूनही ज्याच्या अंतःकरणांत कर्मफळाविषयीं यत्किंचितही आसक्ति असत नाहीं, ६४ देहधारणेपुरताच जागा राहून जो आत्मभावनेत गुंगलेला असतो, तोच योगारूढ पुरुष, असें निःसंशय समजावें. ६५ १ प्रतिज्ञा. २ कड्याच्या मेरेवर. ३ निरालंब अधांतरी ४ हळूहळू. ५ पठाराच्या मार्गानें ६ धारणा, साधनयुक्त मनाची स्थिति ७ ऐसपैस प्रति ८ टोंक ९मिटी १० ब्रह्मनंदाचे ऐक्यांत ११ पुढचा प्रांत, पुढे जाण्याची वाट. १२ संपते. १३ नितळ, सपाठ १४ खोलीत. १५ लाविली.