पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८ 涼涼涼涼涼涼涼涼涼涼涼涼涼涼涼涼涼涼涼 प्रस्तावना ज्ञानदेवांना अद्वैतसिद्धांत- माया सिद्धांत मान्य आहे. तरीपण भक्त अद्वैत तत्त्व मनांत वागवूनही द्वैत कल्पितो व भक्तिसुखाचा अपार आनंद भोगतो. आंतुचाहेरी चोखाळु सूर्य जैसा निर्मळु, आणि तत्त्वार्थीचा पायाळू देखणा जो ; १७९ व्यापक आणि उदास जैसें कां आकाश, तैसें जयाचें मानस सर्वत्र, गा; १८० संसारव्यथे फिटला, जो नैराश्यं विनटला, व्याधाहातोनि सुटला विहंगु जैसा, १८१ तैसा सतत जो सुखें कोणीही टवंच न देखे, नेणिजं गतायुषं लज्जा जेवीं ; १८२ आणि कर्मारंभालागीं जया अहंकृति नाहीं आंगीं, जैसे निरिंधन आगी विझांनी जाय, १८३ तैसा उपशमुचि भागा जयासि आला पैं गा, जो मोक्षाचिया आंगा लिहिला असे; १८४ अर्जुना, हा ठावोवरी जो सोहंभावो सरोभरी द्वैताच्या पैलतीरीं निगों सरला; १८५ कीं भक्तिसुखालागीं आपणपंचि दोहीं भागीं वांटोनियां आंगीं सेवकै बाणे. १८६ येरा नाम 'मी' ठेवी, मग भजती वोज बरवी न भजतया दावी, योगिया जो; १८७ तयाचें आम्हां व्यसन, आमुचें तो निजध्यान, किंबहुना समाधान तो मिळे तैं. १८८ तयालागीं मज रूपा येणं, तयाचेनि मज एथे असणें, तया लोण कीजे जीवेंप्राणें ऐसा पढिये. १८९. अध्याय १२ एकंदरीत ज्ञानदेवांचे परमार्थसाधन ज्ञानभक्तीत एकवटलेलें आहे, म्हणजे द्वैत व अद्वैत, किंवा निर्गुण व सगुण, यांचा बेमालूम सांधा त्यांनी बसविला आहे. म्हणूनच ज्ञानदेवीच्या आरंभींच्या रूपकात्मक गणेशस्तवनांत वाङ्मयगणेशाच्या गंडस्थळांचे वर्णन त्यांनी येणेंप्रमाणें केलें आहे.— प्रमेयप्रवालसुप्रभ द्वैताद्वैत तेचि निकुंभ सरिसेपणें एकवटत इभ- मस्तकावरी. १७. अध्याय १ तेव्हां ज्ञानदेव जरी नाथपंथाचे अनुगृहीत होते, तरी ते भक्तिमार्गी होते व वैष्णवही होते. वास्तविक तत्त्वदृष्टया त्यांच्याजवळ शेव व वैष्णव हा भेदच नव्हता. वाङ्मयतपाची फोड करतांना ते म्हणतात-- ऋग्वेदादि तिन्ही प्रतिप्रीजती वाग्भुवनीं; केली जैसी वदनीं ब्रह्मशाळा. २२२ ना तरी एकाचें नांव तेंचि शैव कां वैष्णव वाचे वसे, तें वाग्भव तप जाणावें. २२३. अध्याय १७ तरी या प्रकारें भेदभावातीत असूनही ते वैष्णव होते हें त्यांचें संप्रदायवैशिष्टय होय इतकेंच खन्या भगवद्भक्तांचा निरंतरचा व्यवसाय काय असतो याचें वर्णन करतांना ते सांगतात- कृष्ण, विष्णु, हरि, गोविंद, या नामांचे निखळ प्रबंध, माजी आत्मचर्चा विशद उदंड गाती. २१०. अध्याय ९ परंतु भावार्थदीपिका रचतांना ज्ञानदेव पंढरीच्या वैष्णवपंथांत म्हणजे वारकरी पंथांत सामील झाले नव्हते हेही निःसंशय खरे आहे. याचा अर्थ, त्यांना त्या पंथाची किंवा विठ्ठल देवतेची गंधवार्ताही नव्हती, असा नव्हे. ज्ञानदेवांच्या जन्माच्या सुमारास पंढरीच्या विठ्ठलमंदिराचा जीर्णोद्धार झाला होता. या कामी लहान मोठ्या अठरा पगड जातींच्या लोकांनी देणग्या दिल्या होत्या. देवगिरीचे रामदेवराव जाधव व त्यांचे मंत्री हेमाडपंत यांनीही या कार्यास मदत केली होती, आणि पंढरीच्या वैष्णव पंथाचा बोलबालाही त्या वेळी बराच होऊं लागला होता. मग ज्ञानदेव या चळवळीसंबंधे अज्ञान रहाणें शक्य तरी कसें आहे ? त्यांनी आपल्या ज्ञानदेवींत विठ्ठल १ विठ्ठलमूतांच्या या वैशिष्ट्याचा उल्लेख समर्थांनी आपल्या मनोबोधांत केला आहे, तो असा - " विठोनें शिरीं वाहिला देवराणा, तया अंतरी ध्यास, रे, त्यास नेणा. " ८४. मोरोपंतांनीही या गोष्टीवर एक उत्प्रेक्षात्मक 'विठ्ठलस्तुति' नांवाचे नऊ दोह्यांचे प्रकरण रचिले आहे. त्यांतील तीन दोहे असे आहेत- श्रीमद्विठ्ठलमस्तकीं वसे सर्वदा ध्यक्ष ( = त्रिलोचन शंकर ), जाणों निधिवर जागतो पुंडरिकाच्या यक्ष ! पुंडरिकाचा हेत होता या धर्नी प्रभूत, जाणों ब्राह्मण जाहला उम्र पंचमुख भूत ! पादोदक घे मस्तक शिरीं त्यास [ दें ] ठाव, प्रिय भूषण निज जनचि, हा विठ्ठल कळवी भाव !