पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सहावा १५१ मांडीचि तो ॥ ४८ ॥ जैसा क्षाळूनियां लेपु एकु । सवेंचि लाविजे आणिकु । तैसेनि आग्रहाचा पाइकु । विचंवे' वायां ॥ ४९ ॥ गृहस्थाश्रमाचें वोझें । कपाळीं आधींचि आहे सहजें । कीं तेंचि संन्यासें वाढविजे । सरिसें पुढती ॥ ५० ॥ म्हणूनि अमिसेवा न सांडितां । कर्माची रेखा नोलांडितां । आहे योगसुख स्वभावता | आपणपांचि ॥ ५१ ॥ यं संन्यासमिति प्राहुर्योगं तं विद्धि पाण्डव । न ह्यसंन्यस्तसंकल्पो योगी भवति कश्चन ॥ २ ॥ सम० संन्यास जो म्हणावा तो कर्मयोगचि पांढवा । कीं कामत्याग संन्यास कर्मयोग न त्याविण ॥ २ ॥ आर्या- ज्या संन्यास म्हणावें पार्था त्यालाच योग तूं जाण । संन्यासत्यागाविण कोणी योगी नव्हे तुझी आण ॥ २ ॥ अवी- ज्यात संन्यास म्हणती । तो योग जाणें निश्चितीं । संकल्प न टाकिला किरीटी । तो योगी नव्हे ॥ २॥ ऐकें संन्यासी तोचि योगी । ऐसी एकवाक्यतेची जगीं । गुढी उभविली अनेगीं । शास्त्रांतरीं ॥ ५२ ॥ जेथ संन्यासिला संकल्प तुटे । तेथचि योगाचें सार भेटे । ऐसें हें अनुभवाचेनि घंटें । साचें जया ॥ ५३ ॥ 1 आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्म कारणमुच्यते । योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते ॥ ३ ॥ सम० – योगारुरुक्षु जो ज्ञानी कर्म त्यासहि कारण । तयाच योगारूढासी ध्यान स्थितिस कारण ॥ ३॥ आर्या – योगा रुरुक्षु मुनि जो पार्था कारण तयासि तें कर्म । योगारूढ मुनीला कारण शम तोचि दे महाशर्म ॥३॥ ओवी - योगारूढ जो इच्छित । तया कर्म है निभ्रांत । योग पावल्या शांत । शमबुद्धि तोचि ॥ ३ ॥ आतां योगाचळाचा निमथा । जरी ठाकावा आथी पार्था । तरी सोपाना या कर्मपथा | चुकां झणीं ॥ ५४ ॥ येणें यमनियमांचेनि तळवटें | रिंगें आसनाचिये पाउलवाटे । येईं प्राणायामाचेनि आडकंठें । वरौता गा ॥ ५५ ॥ मग प्रत्याहाराचा औधाडा । जो बुद्धीचियाहि पायां निसरडा । जेथ स्वाभाविक व नैमित्तिक कर्मे बंधनकारक म्हणून सोडतो, तो लागोलाग दुसरींच कर्मै आपल्या पाठीशी लावून घेतो ! ४८ जसा अंगाला लागलेला एक लेप धुऊन पुसून काढावा, आणि मग स्वतःच दुसरा एकादा नवा लेप अंगाला लावून टाकावा, तसाच प्रकार या आग्रहाच्या तंत्रानें वागणाऱ्याचा होऊन, त्याची व्यर्थ कुचंबणा मात्र घडते. ४९ अरे, गृहस्थाश्रमाचा भार हा आधींच स्वभावतःच शिरावर चढला आहे, मग तो भार नीटपणें न वाहतां, घाईघाईनें संन्यासाचें नवेंच ओझें घेऊन भारांत भर कां घालावी ? ५० या कारणास्तव अग्निहोत्रादि नित्य श्रौतस्मार्त कर्मै न सोडतां आणि आचारमर्यादा न ओलांडतां, हा कर्मयोग स्वभावतःच आत्मसुख देणारा आहे. ५१ अर्जुना, 'संन्यासी तोच योगी,' अशी संन्यासयोगांच्या अभेदाची विजयपताका अनेक शास्त्रांनी फडकाविली आहे. ५२ कर्म करीत असतां जेथें संकल्पविकल्पाचें सूत्र सोडून दिल्यामुळें तुटून जातें तेथेंच कर्मयोगाचें तथ्य हातीं येतें, असें या शास्त्रकारांनीं आपल्या अनुभवानें निश्चित केलें आहे. ५३ आतां, अर्जुना, या कर्मयोगरूपी पर्वताचा माथा जर गांठावयाचा असेल, तर ही कर्ममार्गाच्या पायऱ्यांची वाट मुळींच सोडतां कामा नये. ५४ या पायन्यांनीं प्रथमतः यमनियमांच्या पायथ्यानें योगासनांच्या पाऊलवाटेला लागावें. नंतर प्राणायामाच्या कड्यावर चढून यावें. ५५ मग प्रत्याहाराचा अर्धकडा लागतो. येथे बुद्धीचंही पाऊल ठरत नाहीं, इतका तो निसरडा आहे. याच ठिकाणीं मोठ्या १ आरंभितो. २ दास, अंकित. ३ कुचंबत, खितपत पडतो. ४ अभेदाची. ५ ध्वज, पताका. ६ निश्चयानें, निर्णयानें, ७ माथा, ८ गांठावा. ९ जिना, १० बिकट कड्यावरून ११ विषयांपासून इंद्रियांचा आवर. १२ अर्धा तुग्लेला कडा.