पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५० सार्थ श्रीज्ञानेश्वरी श्रीभगवानुवाच— अनाश्रितः कर्मफलं कार्य कर्म करोति यः । स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः ॥ १ ॥ सम॰—कर्मी फळासक्त नव्हे करावें कर्म तें करी । तो संन्यासी तोचि योगी न निरनि न अक्रिय ॥ १ ॥ आर्या - कर्मफळाचा आश्रय न करुनि जो नर करीत निजधर्म । तो संन्यासी योगी मेण अक्रिय अनग्नितं वर्म ॥ १ ॥ ओवी - कर्माचें फळ नापेक्षितां कर्म करी । तोचि संन्यासी योगी अवधारीं । जो सानिक कर्माचा अधिकारी । तो कर्मयोगी नव्हे ॥ १ ॥ आइकें योगी आणि संन्यासी जनीं । एकचि सिनाने झणें मानीं । एन्हवीं विचारिजती जंव दोन्ही । तंव एकचि ते ॥ ३९ ॥ सांडिजे दुजया नामाचा आभासु । तरी योगुं तोचि संन्यासु । पाहतां ब्रह्मीं नाहीं अवकाशु | दोहींमाजीं ॥ ४० ॥ जैसे नामाचेनि अनारिसेपणें । एका पुरुषातें वोलावणें । कां दोहीं मार्गी जाणें । एकाचि ठाया ॥ ४१ ॥ ना तरी एकचि उदक सहजें । परि सिनाना घटीं भरिजे । तैसें भिन्नत्व जाणिजे | योगसंन्यासांचें ॥ ४२ ॥ आइकें सकळ संमतें जगीं । अर्जुना गा तोचि योगी । जो कर्मे करूनि रागी । नोहेचि फळीं ॥ ४३ ॥ जैसी मही हे उद्भिजें । जनी अहंबुद्धीवण सहजें । आणि तेथींचीं तियें वीजें । अपेक्षीना ॥४४॥ तैसा अन्वयाचेनि आधारें । जातीचेनि अनुकारें । जें जेणें अवसरें । करणें पावे ॥४५॥ तें तैसेंचि उचित करी । परी साटोपु नोहे शरीरीं । आणि बुद्धिही करोनि फळवेरीं । जायेचिना ॥ ४६ ॥ ऐसा तोचि संन्यासी । पार्था गा परियेसीं । तोचि भरंवसेनिसीं । योगीश्वरु ॥ ४७ ॥ वांचूनि उचित कर्म प्रासंगिक । तयातें म्हणे हें सांडावें वद्धक । तरी टांकोटांकीं आणिक एक । योगी आणि संन्यासी हे एकच होत. तूं कदाचित् यांना निरनिराळे मानशील, पण जर विचार केला, तर ते एकच, असा निर्णय लागतो. ३९ या नामभेदाची भुलावण दूर केली, तर योग तोच संन्यास ठरतो, आणि ब्रह्मज्ञानाच्या दृष्टीने पाहिलें, तर या दोहोंमध्यें मुळींच अंतर आढळत नाहीं. ४० जसें भिन्न भिन्न नांवांनीं आपण एकाच पुरुषाला संबोधतों, किंवा जसें दोन निरनिराळ्या मार्गानी एकाच स्थळीं जातां येतें, ४१ किंवा स्वभावतः एकरूप असलेलें उदक जसें निरनिराळ्या भांड्यांत भरावं, पण तें एकरूपच असते; तसेंच योग आणि संन्यास यांचे भिन्नत्व केवळ दिखाऊ आहे, खरें नाहीं. ४२ अर्जुना, जगांत बहुमान्य तत्त्व असें आहे, कीं जो कर्म आचरूनही कर्मफलाचा संग ठेवीत नाहीं, तोच योगी समजावा. ४३ जशी ही पृथ्वी वृक्षादिक उद्भिज्जकोटी निर्माण करते, परंतु त्यापासून निपजणाऱ्या फलधान्यांची इच्छा धरीत नाहीं, ४४ त्याप्रमाणेंच जो परब्रह्माच्या व्यापकतेचा आश्रय करून, आपल्या स्वाभाविक स्थितीस अनुरूप असें ज्या वेळीं जें जें करणें प्राप्त होतें, तं उचित कर्तव्य त्या वेळीं करतो, परंतु ज्यांत देहबुद्धीचा अहंकार नसतो, आणि जो आपल्या मनालाही फलाच्या आसक्तीला स्पर्श करूं देत नाहीं, ४५/४६ असा जो पुरुष, तोच संन्यासी जाणावा, आणि तोच खराखरा निःसंशय श्रेष्ठ योगी होय. ४७ ही योगयुक्ति न साधल्यामुळें जो १ लागोलाग, तत्काळ,