पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सहावा १४९ गोडी । नेणती आणिक ॥ २८ ॥ जैसा वायसीं चंद्र नोळखिजे । तैसा प्राकृतीं ग्रंथ हा नेणिजे । आणि तो हिमांशुचि जेविं खाजें । चकोराचें ॥ २९ ॥ तैसा सज्ञानासी तरी हा ठावो । आणि अज्ञानासी आन गांवो । म्हणोनि बोलावया विषय पहा हो । विशेषु नाहीं ||३०|| परि अनुवादलों मी प्रसंगें । तें सज्जनीं उपसाहावें लागे । आतां सांगेन काय श्रीरंगें । निरोपिलें जें ॥३१॥ तें बुद्धीही आकळितां सांकडें । म्हणऊनि बोलीं विपायें सांपडे । परि श्रीनिवृत्तिं- कृपादीपउजियेडें । देखेन मी ॥ ३२ ॥ जें दिठीही न पाविजे । तें दिठीविण देखिजे । जरी अतींद्रिय लाहिजे । ज्ञानवळ ॥ ३३ ॥ ना तरी जें धातुवादियाही न जोडे । तें लोहींचि 'पंधरें सांपडे । जरी दैवयोगें चढे । परिसु हाता ॥ ३४ ॥ तैसी गुरुकृपा होये । तरी करितां काय आपु नोहे । म्हणऊनि अपार मातें आहे । ज्ञानदेवो म्हणे ॥ ३५ ॥ तेणें कारणें मी बोलेन । बोलीं अरूपाचें रूप दावीन । अतींद्रिय परि भोगवीन | इंद्रियांकरवीं ॥ ३६ ॥ आइका यश श्री औदार्य । ज्ञान वैराग्य ऐश्वर्य । हे साही गुणवर्य । वसती जेथ ॥ ३७ ॥ म्हणोनि तो भगवंतु । जो निःसंगाचा सांगतु । तो म्हणे पार्था दत्तचित्तु । होईं आतां ॥ ३८ ॥ त्यांवाचून इतरांना या विषयाची गोडी कळणार नाहीं. २८ जसा कावळ्यांना चंद्र ओळखतां येत नाहीं, तसाच प्राकृत जनांना हा ग्रंथ कळणार नाहीं; आणि जसें चकोरच चंद्रकिरणांचें सेवन करूं शकतात, २९ त्याप्रमाणे केवळ ज्ञानी जनांनाच या ग्रंथांत ठाव लाभेल. अज्ञजनांचा गांव निराळा आहे, या ग्रंथांत नाहीं. म्हणून मी याविषयीं कांहीं विशेष बोलावें असें नाहीं. ३० परंतु सहज प्रसंगाने हे चार शब्द बोललों, याबद्दल साधुश्रोत्यांनीं राग मानूं नये. आतां श्रीकृष्ण अर्जुनाला काय म्हणाले, तें कथन करतो. ३१ तें श्रीकृष्णाचें भाषण बुद्धीलाही समजण्याला कठीण, मग तें शब्दांत गांव बहुतेक अशक्यच आहे; परंतु श्रीसद्गुरु निवृत्तिनाथांच्या कृपा प्रकाशाने मला त्याचें ज्ञान होईल. ३२ जें इस पडत नाहीं, तें दृष्टीवांचून दिसतें, मात्र अतींद्रिय ज्ञानाचें बळ गांठीं असलें पाहिजे. ३३ असें पहा, जें सोनें किमयागारालाही लाभत नाहीं, तें, दैवयोगानें परीस हातीं आला असतां, लोखंडांतच सांपडतें, ३४ त्याप्रमाणेच सद्गुरुकृपेचा लाभ झाला, तर आपल्याला असाध्य असें काय राहणार आहे ? म्हणून तें अमर्याद तत्त्वही मला कळवितां येतें, असें मी ज्ञानदेव म्हणतों. ३५ यामुळे मी निरूपण करीन, निराकार तत्त्वालाही साकारता आणीन, आणि इंद्रियांच्या टप्याबाहेरची वस्तूही इंद्रियांकडूनच अनुभवास आणून देईन ! ३६ आतां, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, व ऐश्वर्य, हें सहा गुणांचें वैभव अंगीं वसत असल्यामुळे ज्यांना 'भगवंत' म्हणतात, आणि वासनासंगहीनांचे जे निरंतरचे सोबती आहेत, ते श्रीकृष्ण अर्जुनास म्हणाले, “पार्था, आतां नीट लक्ष देऊन ऐक. ३८ १ खाऊ, अन्न. २ किमयागाराला ३ सोने. ४ सोबती.