पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४८ सार्थ श्रीज्ञानेश्वरी रूपाची हे ॥ १८ ॥ जेथ संपूर्ण पद उभारे । तेथ मनचि धांवे बाहिरं । बोलु भुजांहीं ओविष्करे । आलिंगावया ||१९|| ऐशी इंद्रियें आपुलालिया भावीं । झोंबती परि तो सैरिसेपणेंचि बुझावी । जैसा एकला जग चेववी | सहस्रकरु ||२०|| तैसें शब्दाचें व्यापकपण । देखिजे असाधारण । पाहातयां भौवज्ञां फॉवती गुण | चिंतामणीचे ||२१|| हें असो तया बोलांची ताटें भलीं । वरी कैवल्यरसें वोगरलीं । ही प्रतिपत्ति मियां केली । निष्कामासी ॥ २२ ॥ आतां आत्मप्रभा नीच नवी । तेचि करून ठाणदिवी । जो इंद्रियांतें चोरूनि जेवी । तयासीचि फांवे ॥ २३ ॥ येथ श्रवणाचेनि पांगें । वीण श्रोतयां व्हावें लागे । हे मनाचेनि निजांगें । भोगिजे गा ॥ २४ ॥ आहाच बोलाची वौलीफ फेडिजे । आणि ब्रह्माचियाचि आंगा घडिजे । मग सुखेसी सुरवाडिजे । सुखाचिमाजि ॥२५॥ ऐसें हळुवारपण जरी येईल । तरीच हें उपेगा जाईल । एन्हवीं आघवी गोष्टी होईल । मुकयावहिरयाची ||२६|| परी तें असो आतां आघवें । नलगे श्रोतयांतें asara | जे अधिकारिये एथ स्वभावें । निष्कामकामु ॥ २७ ॥ जिहीं आत्मबोधाचिया आवडी । केली स्वर्गसंसाराची कुरोंडी । तेवांचूनि एथींची जेव्हां सबंध वाक्य रचिलें जाईल, तेव्हां श्रोत्यांचें मन बाहेर धांव घेऊं लागेल, हेतु हा कीं, या शब्दांना दोन्ही हातांनीं गळामिठी घालावी ! १९ अशा रीतीनें सर्व इंद्रिये आपापल्या वृत्तीनुसार या शब्दांवर झड घालतील, पण हे शब्द सर्वाची समभावानें समजूत करतील. जसा एकटा सूर्य सर्व जगाला चेतना आणतो, २० तसें या शब्दांचेंही व्यापकपण फार विलक्षण आहे; यांच्या भावार्थाचा जे विचार करतील, त्यांना, हे शब्द नव्हत, तर चिंतामणीच आपल्याला आज लाभले, असें वाटेल. २१ पण हें आतां पुरे झालें. या मराठी शब्दांच्या ताटांत ब्रह्मरस वाढून मी हें निष्काम साधुजनांना ग्रंथरूपी भोजन घालीत आहे. २२ कधींही मंद न होणारी जी आत्मज्ञानाची ज्योति, तीच समई ठेवली आहे. जे इंद्रियांना समजूं न देतांच जेवूं शकतात, त्यांनाच हें भोजन घडणार आहे. २३ येथे श्रोत्यांनीं श्रवणेंद्रियाचाही आश्रय सोडून, हें केवळ मनाच्या बळानेच ग्रहण करावें. २४ शब्दाचें दिखाऊ कवच सोलून काढून गाभ्यांतील ब्रह्मभावाशी एकरूप व्हावें, आणि मग अनायासें अखंड सुखानें सुखावून जावें ! २५ असा जर श्रोत्यांच्या अंगीं नाजूकपणा येईल, तरच श्रवणाचे सार्थक होईल, नाहीं तर हें निरूपण म्हणजे बहिऱ्यामुक्यांचाच संवाद म्हणावें लागेल ! २६ परंतु हें व्याख्यान आतां आटोपते घ्यावें, कारण माझ्या श्रोत्यांना इतकें हडसून खडसून बजावण्याचें कांहीं कारण नाहीं, कां कीं, येथील सर्व श्रोते निष्काम असल्यामुळे या श्रवणाचे स्वाभाविकच अधिकारी आहेत. २७ ज्यांनीं आत्मज्ञानाच्या आवडीवरून संसारसुखही आंवाळून टाकलीं आहेत, १ आविर्भाव करतो. २ समतेने ३ विचार करून भावार्थ जाणणान्यांना. ४ सांपडती. ५ ग्रंथरूपी भोजनसमारंभ. ६ नित्य. ७ कळू न देतो. ८ लाभ, ९ आश्रयावांचून १० दिखाऊ ११ कवच, टरफल १२ हळवेपण, नाजुकपण, १३ सावध करावें. १४ ओंवाळणी.