पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सहावा १४७ कृष्णार्जुनाचा ॥ ८ ॥ तेणें आनंदाचेनि धालेपणें । साभिप्राय अंतःकरणें । आतां आदरेंसी वोलणें । घडेल तया ॥ ९ ॥ तो गीतेमाजि पष्ठींचा । प्रसंगु असे ओयणीचा । जैसा क्षीरार्णवीं अमृताचा । निवाडु जाहला ॥ १० ॥ तैसें गीतार्थाचें सार । जें विवेकसिंधूचें पार । नानायोगविभव भांडार । उघडलें कां ॥११॥ जें आदिप्रकृतीचें विसंवणें । जें शब्दब्रह्मासि न बोलणें । जेथूनि गीतावल्लीचें ठौंणें । रोहो पावे ॥ १२ ॥ तो अध्याय सहावा । वरि साहित्याचिया वरैवा । सांगिजेल म्हणोनि परिसावा | चित्त देउनी ॥ १३ ॥ माझा मराठाचि बोलू कौतुकें । परि अमृतातेही पैजा जिंके। ऐसी अक्षरें रसिकें । मेळवीन ॥ १४ ॥ जिये कोवळिकेचेनि पाँडे । दिसती नादींचे रंग थोडे | वेधें परिमळाचें वीके मोडे । जयाचेनि ॥ १५ ॥ ऐका रसाळपणाचिया लोभा । कीं श्रवणींचि होती जिभा । बोलें इंद्रियां लागे कभी । एकमेकां ॥ १६॥ सहजें शब्द तरी विपो" श्रवणाचा । परि रसना म्हणे रस हा आमुचा । घ्राणासि भावो जाय परिमळाचा । हा तोचि होईल ॥ १७ ॥ नवल बोलतीये रेखेची वाहणी। देखतां डोळ्यांही पुरों लागे धणी । ते म्हणती उघडली खाणी । मात्र फारच आनंदित झाला होता. ८ आणि मनाला व्यापून टाकणाऱ्या त्या आनंदानं त्याच्या अंतःकरणाला स्फुरण चढून, त्याच्याकडून त्या संवादप्रसंगाचें कथन मोठ्या आदरानें घडून आलें, ९ तो गीताग्रंथांतील सहावा अध्याय म्हणजे तत्त्वनिर्णयाचें स्थान आहे. जसें क्षीरसागराचें मंथन केल्यावर शेवटीं सर्व रत्नांचें सार म्हणून अमृत लाभलें १० तसें जें गीतंतील तत्त्वज्ञानाचें सार, किंवा विवेकसागराचें पैलतीर, किंवा सर्व योगसंपत्तीचा उघडा खजीना, ११ आणि जेथें आदिमाया स्तब्ध बसते, जेथें वेदांची भाषा खुंटते, आणि जेथून या गीतारूपी वेलीच्या माड्याला ताणा फुटतो, १२ तोच हा सहावा अध्याय होय. तशांत हा आतां मी साहित्याचा उजाळा देऊन सांगतों, तो चित्त देऊन श्रवण करावा. १३ मी मराठीच शब्द योजीत आहे, परंतु ते असे रसपूर्ण वेचून योजीन, कीं ते गोडपणांत प्रत्यक्ष अमृतालाही सहजासहजी हारीस आणतील ! १४ या शब्दांच्या कोमल गुणाशीं तुलना केली असतां, गायनांतील सुरांची कोमलताही कोती ठरेल ! यांच्या मोहक गुणापुढे सुगंधाची महतीही फिकी पडेल ! १५ यांच्या रसाळपणाची थोरवी तर अशी आहे, कीं, कानांनाही जिभा फुटतील आणि इंद्रियाइंद्रियांत कलहच माजून राहील ! १६ स्वभावतः ' शब्द ' हा श्रवणेंद्रियाचाच विषय आहे. पण 'जीभ ' म्हणते ' या शब्दांतील रस हा माझा विषय आहे. ' घ्राणेंद्रियाचा 'गंध' हा विषय आहे, पण हे मराठी बोल आपल्या सुगंधगुणानें घ्राणालाही विषय होतील. १७ आणखी नवलाची गोष्ट ही, कीं, उच्चारलेल्या ओंवीची धाटणी पाहून डोळ्यांचे असे समाधान होईल, कीं, ते ' ही लावण्याची खाणच उघडली आहे!' असे उद्गार काढतील. १८ आणि १ तत्त्वनिर्णयाचा. २ विश्रान्तिस्थान, ३ माडा, ४ ताणा. ५ बखेपणाने, ६ कोमलतेचे. ७ तुलनेनें. ८ मोहकतेनें. ९ बळ, १० कलद. ११ विषय,