पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ॐ नमो भगवते वासुदेवाय सार्थ श्रीज्ञानेश्वरी अध्याय सहावा मग रायातें म्हणे संजयो । तोचि अभिप्रावो अवधारिजो । कृष्ण सांगती आतां जो। योगरूप ॥ १ ॥ सहजें ब्रह्मरसाचें पारणें। केलें अर्जुनालागीं नारायणें । कीं तेचि अवसरी पाहुणे । पातलों आम्ही ॥ २ ॥ कैसी दैवाची थोरी नेणिजे । जैसें तान्हेलिया तोय सेविजे । कीं तेंचि चवी करूनी पाहिजे । तंव अमृत आहे ॥ ३ ॥ तैसें आम्हांतुम्हां जाहलें । जे आडमुठी तत्त्व फावलें । तंव धृतराष्ट्रें म्हणितलें । हें न पुसों तूतें ॥ ४ ॥ तया संजया येणें बोलें। रायाचें हृदय चोजवलें । जे अवसरी आहे घेतलें । कुमरांचिया ॥ ५॥ हें जाणोनि मनीं हांसिला । म्हणे म्हातारा मोहें नाशिला । एन्हवीं बोलु तरी भला जाहला । अवसरी इये ॥ ६ ॥ परि तें तैसें कैसेनि होईल । जात्यंधा कैचें पाहेलें । तेवींच येरु से' घेईल । म्हणोनि विहे ॥ ७ ॥ परि आपण चित्तीं आपला । निकियापरी संतोषला । जे तो संवादु फावला । मग संजय जो धृतराष्ट्राला म्हणत आहे कीं, श्रीकृष्णांनी योगरूपाचा जो मार्ग अर्जुनास उपदेशिला, तो ऐक, १ आणि श्रीनारायणांनी अर्जुनाला हे सहज ब्रह्मरसाचें भोजन घालण्याच्या संधीला तुम्हीआम्ही नेमके पाव्हणे आलों ! २ काय आपलें हें थोर दैव, कीं जसें तान्हेल्यानें पाणी म्हणून तोंडाला लावावें तें रुचि घेतांच अमृत ठरावें, ३ तसेंच आज तुमच्याआमच्या संबंधें घडून आले आहे, कारण ब्रह्मज्ञान आज आपल्या मुठींतच सांपडलें आहे. तोंच धृतराष्ट्र म्हणाला, " संजया, या असल्या गोष्टी मी तुला विचारल्या नाहींत ! " ४ या धृतराष्ट्राच्या बोलानें संजयाला त्याचं इंगित कळलें, कीं, या राजाच्या डोक्यांत मुलांचें वारें खेळत आहे. ५ हें लक्षांत येऊन संजयाला हनुं आले, व तो मनांत म्हणाला, ' या म्हाताऱ्याला पुत्रमोहानें आतां चळ लागला आहे; नाहीतर वास्तविक पाहतां या वेळचा कृष्णार्जुनसंवाद किती हृदयंगम आहे बरें ! ६ पण त्याचें या मोहाला काय होय ! जो जन्मांध आहे, त्याला कधीं तरी उजाडते का ? ' असें संजय मनांत म्हणाला पण उघड बोलला नाहीं, कारण त्या म्हातान्याला राग येईल म्हणून संजय भ्याला. ७ परंतु तो कृष्णार्जुनाचा संवाद आपल्याला ऐकण्यास सांपडला म्हणून तो संजय आपल्या मनांत १ मुठीच्या आड, मुठीत. २ पावलें, सांपडलें. ३ समजलें, ४ वान्यानें, कल्पनेनें. ५ उजाडेल. ६ राग, रोष.