पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय पांचवा १४५ परि तें स्नेहरूपा न यैल | बोलवरी ॥ ७३ ॥ म्हणोनि विसुरा काय येणें । तो ईश्वरु कवळावा कवणें । जो आपुलें मान नेणे । आपणचि ॥ ७४ ॥ तरी मागिला ध्वनीआंतु । मज गमला सावियाची मोहितु । जे बलात्कारें असे म्हणतु । परिस वापा ॥ ७५ ॥ अर्जुना जेणें जेणें भेदें । तुझें कां चित्त बोधे। तैसें तैसें विनोदें । निरूपिजेल || ७६ ॥ तो काइसया नांव योगु । तयाचा कवण उपेगु । अथवा अधिकारप्रसंगु । कवणा येथे ॥ ७७ ॥ ऐसें जें जें कांहीं । उक्त असे इये ठाईं । तें आघवेंचि पाहीं । सांगेन आतां ॥ ७८ ॥ तूं चित्त देऊनि अवधारीं । ऐसें म्हणोनि श्रीहरी । बोलिजेल ते पुढारी । कथा आहे ॥ ७९ ॥ श्रीकृष्ण अर्जुनासी संगु । न सांडोनि सांगेल योगु । तो व्यक्त करूं प्रसंगु । म्हणे निवृत्तिदासु ॥ १८० ॥ इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सुब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मसंन्यासयोगो नाम पञ्चमोऽध्यायः ॥ स्नेहभावाचें खरें शब्दचित्र वठणारच नाहीं ! ७३ पण यांत आश्चर्य ते कसलें ? ज्या ईश्वराला स्वतःचें संपूर्ण वर्णन स्वतःलाच करतां येत नाहीं, त्याचं स्वरूप दुसऱ्या कोणी कसें वर्णावें ? ७४. परंतु 'बाबा अर्जुना, ऐक, ऐक, ' असें आग्रह करकरून ज्या अर्थी श्रीकृष्ण म्हणतात, त्या अर्थी से अर्जुनाच्या मोहांत सहज गुंतले होते, असें इंगित त्यांच्या मागें सांगितलेल्या शब्दांत गर्भित आहे, असे मला वाटतें. ७५ आतां श्रीकृष्ण पुन्हां म्हणतील, कीं, " अर्जुना, ज्या ज्या प्रकारें तुला या विषयाचा पक्का उमज पडेल, तसे तसे विवेचन मी आनंदाने करतो. ७६ तो योगमार्ग म्हणजे काय, त्याचा उपयोग कोणता, त्याचे अधिकारी कोण, ७७ अशा प्रकारचे जे जे प्रश्न या विषयासंबंध उद्भवतात, तें सर्व कांहीं मी तुला आतां सांगतों. ७८ असा प्रस्ताव करून श्रीकृष्ण काय बोलले, तें पुढील अध्यायांत आहे. ज्ञानदेव श्रोत्यांस सांगतों, कीं, प्रपंच न सोडतां योग साधण्याचा उपदेश श्रीकृष्ण अर्जुनाला करितील, तो प्रसंग स्पष्ट करून कथन करितां. १८० तूं मात्र लक्ष देऊन ऐक. " ७९ आतां मी निवृत्तिदास १ आश्चर्य. २ सहज १९ 0000000000000