पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४४ 1 सार्थ श्रीज्ञानेश्वरी मानसु माझा ।। ६३ । म्यां जें कांहीं विवरूनि पुसावें । तें आधीचि जाणितलें देवें । तरी बोलिलें तेंचि सांगावें । विवेळ करूनि ॥ ६४ ॥ एन्हवीं तरी अवधारा । जो दाविला तुम्हीं अनुसौरा । तो पव्हण्याहून पायउतारा । सोहपा जैसा ॥ ६५ ॥ तैसा सांख्याहूनि प्रांजळा । आम्हांसारिखिया अवळां । एथ आहाति परि कांहीं काळा । तो साहों ये वर || ६६ || म्हणोनि एक वेळ देवा । तोचि पडताळा घेयावा । विस्तरेल तरी सांगावा | साद्यंतुचि ॥६७॥ तंव श्रीकृष्ण म्हणती हो कां । तुज हा मार्ग गमला निका । तरी काय जाहलें आइकीजो कां । सुखें बोलों ॥ ६८ ॥ अर्जुना तूं परिससी । परिसोनि अनुष्ठिसी । तरी आम्हांसीचि वानी कायसी । सांगावयाची ॥ ६९ ॥ आधींच चित्त मायेचें । वरी मिर्फे जाहलें पंढियंतयाचें । आतां तें अद्भुतपण स्नेहाचें । कवण जाणे ॥ १७० ॥ ते म्हणों कारुण्यरसाची दृष्टि । कीं नवेया स्नेहाची सृष्टि । हें असो नेणिजे दृष्टी । हरीची वानूं ॥ ७१ ॥ जे अमृताची वोतली । कीं प्रेमचि पिऊन मातली । म्हणोनि अर्जुनमोहें गुंतली । निघों नेणे ॥ ७२ ॥ हें बहु जें जें जल्पिजेल । तेथें कथेसि फांकु होईल । इंगित जाणण्यांत अत्यंत प्रवीण आहां, त्यामुळे तुम्हीं माझ्या मनाचा ठाव चांगलाच घेतला खरा ! ६३ माझ्या मनांत जें विचारावयाचें आलें होतें, तें, देवा, तुम्हीं आधींच जाणून सर्व सांगून टाकिलें आहे. तरीपण तेंच पुन्हां एकदां अगदीं स्पष्ट बाळबोध करून मला कथन करावे. ६४ खरा प्रकार असा आहे, कीं, देवा, तुम्ही जो साधनमार्ग आतां उपदेशिला, तो जसा खोल पाण्यांतून पोहून जाण्यापेक्षां पायताऱ्याचा आश्रय सोपा होतो, तसाच आम्हांसारख्या दुर्बळ जीवांना सांख्ययोगापेक्षां ( म्हणजे ज्ञानमार्गापेक्षां ) अधिक सुगम व सुलभ आहे, मग हा मार्ग हुडकून काढण्याला जरा कालावधि लागला, तरी ती कांहीं सहन न होण्यासारखी अडचण नाहीं. ६५, ६६ म्हणून, पुन्हां एकदां सर्व प्रश्नांचा पडताळा पाहण्याकरितां, हाच समग्र विषय विस्ताराने सांगा. " ६७ तेव्हां श्रीकृष्ण म्हणाले, " असं काय ! एकंदरींत तुला हा साधनमार्ग चांगला वाटतो तर ! मग पुन्हां त्याचें विवेचन करायला माझें काय जातें ! ऐक, मी सर्व कांहीं आनंदाने सांगतों. ६८ अर्जुना, तुला ऐकण्याची हौस आहे, ऐकून त्याप्रमाणें आचरण ठेवण्याचाही तुझा मानस आहे, इतकी जर तुझी सिद्धता आहे, तर मग त्या मार्गाचं विवरण पुन्हां करण्याला मीच कां माघार घेऊं ?” ६९ श्रोते हो, आधींच आईचं मन, आणि त्यांत आवडीचं पडलें भरवण, मग प्रेमरसाला जी विलक्षण उकळी येते, तिचं यथार्थ स्वरूप कोणाला बरें समजेल ? १७० श्रीकृष्णांनीं जी प्रेमदृष्टि अर्जुनाकडे वळविली तिला काय अमृताची वृष्टि म्हणूं, कीं अद्भुत स्नेहरसाची सृष्टि म्हणूं, हें मला कांहीं कळत नाहीं ! ७१ ती दृष्टि जणूं काय अमृतरसाची ओतींय पुतळीच होती, किंवा ती प्रेमरसाच्या पानानें तर्र झाली होती, म्हणून ती अर्जुनाच्या मोहांत अशी गुंग झाली, कीं, तेथून ढळणें तिला शक्यच नव्हतें ! ७२ परंतु असें जो जो वर्णन करावें, तों तों त्यानें नुसतें विषयांतर मात्र घडेल, परंतु त्या श्रीकृष्णाच्या १ स्पष्ट, २ मार्ग, ३ सुलभ व स्पष्ट ४ निमित्त ५ आवडत्या मनुष्याचें. ६ फोटा, अनुसंधान सुटणे,