पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय पांचवा १४३ तैसी वासनांतराची विवंचना | मग आपैसी पौरुखे अर्जुना । जे वेळ गगनीं लयो मना । पवनें कीजे ॥ ५५ ॥ जेथ हें संसारचित्र उमटे | तो मनोरूप पटु फाटे । जैसें सरोवर आटे । मग प्रतिभां नाहीं ॥ ५६ ॥ तैसें मन एथ मुद्दल जाये । मग अहंभावादिक के आहे । म्हणोनि शरीरेचि ब्रह्म होये । अनुभवी तो ॥ ५७ ॥ भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरम् । सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति ॥ २९ ॥ सम॰—भोक्ता यज्ञतपांचा मी सर्वलोकमहेश मी । सर्वांचा मी सखा मातें जाणोनी शांति पावतो ॥ २९ ॥ आर्या-भोक्ता यज्ञतपांचा लोकेश्वर मीच वेद वेदांती । भूतांचा सुहृदहि मी मार्ते जाणूनि पावतो अंतीं ॥ २९ ॥ ओवी - जपतपयज्ञांचा भोक्ता । सर्व लोकांत ईश कर्ता । शांति पावे जाणता । सर्वांचा सखा जाण मी ॥ २९ ॥ आम्ही मागां हन सांगितलें । जे देहींचि ब्रह्मत्व पावले । ते येणें मार्गे आले । म्हणऊनियां ॥ ५८ ॥ आणि यमनियमांचे डोंगर | अभ्यासाचे सागर | क्रमोन हैं पार | पातले ते || ५९ || तिहीं आपण करूनि निर्लेप । प्रपंचाचें घेतलें माप । मग साच शांतीचेंचि रूप । होऊनि ठेले ॥ १६० ॥ ऐसा योगयुक्तीचा उद्देशु । जेथ वोलिला हृषीकेशु । तेथ अर्जुनु सुंदंशु । म्हणोनि चमत्कारला ॥ ६१ ॥ तें देखिलिया कृष्णें जाणितलें । मग हांसोनि पार्थातें म्हणितलें । काई पां चित्त उवाइलें । इये बोलीं तुझें ॥ ६२ ॥ तंव अर्जुन म्हणे देवो । परचित्तलक्षणाचा रावो । भला जाणितला जी भावो । आणि अशा मिळणीनंतर त्यांच्यासह ती महानदी समुद्राला मिळते, तेव्हां ते वेगळे निवडतां येत नाहींत, ५४ त्याप्रमाणें अशा समाधिस्थितीत मनाचा चिदाकाशांत प्राणापानांच्या एकवटलेल्या वायुबळाने लय झाला म्हणजे सर्व वासनांचा आपोआप परिहार होतो. ५५ हें संसाररूपी चित्र ज्यावर चितारलें जातें, तें मनोरूपी वस्त्र त्या स्थितीत फाटून जातें. जसें सरोवर आटून जावें म्हणजे प्रतिबिंव आपोआपच नष्ट होतें, ५६ तसें या समाधिस्थितींत मनच मुदलीं नाहींसे झाल्यामुळें अहंभावादि वृत्तींना ठाव कोठें सांपडणार ? म्हणून असें ब्रह्मसारूप्याचें सुख ज्याच्या अनुभवास आलें, तो शरीरधारी असतांही ब्रह्मरूप होतो. ५७ आम्हीं मांगें सांगितलें, कीं, कांहीं पुरुष या देहाला धारण करीत असतांनाच ब्रह्मत्वाला पोचतात, ते याच मार्गानें त्या स्थितीला येतात. ५८ ते यम, नियम, आसन, धारणा, इत्यादि योगसाधनांचे विकट कडे चढून, आणि योगाभ्यासाचे सागर ओलांडून, हा पल्ला गांठतात. ५९ ते आत्मसाक्षात्काराच्या बळाने हा सारा प्रपंच, स्वतः निर्लेप राहून, चालवितात; आणि स्वतः प्रत्यक्ष शांतरसच होऊन राहतात. १६० अशा प्रकारे श्रीकृष्णांनी या भाषणांत कर्मयोगाचा प्रस्ताव केला, आणि अर्जुन हा फार मार्मिक श्रोता असल्यामुळें तो है नवीनच तत्त्व ऐकून चमकून गेला. ६१ श्रीकृष्णांच्या हें सर्व लक्षांत आलें, आणि ते त्याला किंचित् हंसत हंसत म्हणाले, " पार्था, माझ्या या बोलण्यानें तुझ्या चित्ताचें समाधान झाले काय ? ” ६२ तेव्हां अर्जुन म्हणाला, “देवा, तुम्ही दुसऱ्याचें १ आपोआप. २ परतते. ३ प्रतिबिंब ४ मार्गे श्लोक २५. ५ प्रस्ताव, सूचना, ६ मार्मिक, चाणाक्ष ७ चमकला. ८ प्रसन्न झालें, समाधान पावले.