पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४२ सार्थ श्रीज्ञानेश्वरी सुखें । मानूंं येईल ॥ ४५ ॥ जें सांचोकारें परम | ना तें अक्षर निःसीम । जिये गांवींचे निष्काम | अधिकारिये ॥ ४६ ॥ जें महर्षी वाढलें । विरक्तां भाँगा फिटलें । जें निःसंशया पिकलें । निरंतर ॥ ४७ ॥ कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसाम् । अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनाम्॥ ३६॥ सम० — जे कामक्रोधरहित प्रयत्नीं वशचित्त जे । देह वांचो मरो ते तों मुक्त केवळ आत्मवित् ॥ २६ ॥ आर्या - कामक्रोधत्यागी जे यति वशचित्त साधुजनमैत्र । निर्वाणब्रह्म तयां विदितात्म्यांला असेचि सर्वत्र ॥ २६ ॥ ओवी - कामक्रोधविरहित । आत्मा जाणोनि वश करित । तोचि ज्ञानवंत म्हणत । ब्रह्मात्मवित् ॥ २६ ॥ जिहीं विपयापासोनि हिरतलें । चित्त आपुलें आपण जिंतिलें । ते निश्चित जेथ सुतले । चेतीचिना ॥ ४८ ॥ तें परब्रह्मनिर्वाण । जें आत्मविदांचें कारण । तेंचि ते पुरुष जाण । पांडुकुमरा ॥ ४९ ॥ ते ऐसे कैसेनि जहाले । जे देहींचि ब्रह्मत्वा आले । हें पुससी तरी भलें । संक्षेपें सांगों ॥। १५० ।। स्पर्शान्कृत्वा बहिर्ब्राह्यांश्चक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः । प्राणापानी समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ ॥२७॥ यतेन्द्रियमनोबुद्धिर्मुनिमोक्षपरायणः । विगतेच्छा भयक्रोधो यः सदा मुक्त एव सः ॥ २८ ॥ सम० – बाहेर बाह्यविषयां दृष्टीतें भोवयांमधें । नासिकीं वाहती प्राणापानांतें करुनी सम ॥ २७ ॥ बुद्धींद्रिय मनस्थैर्य मुनि मोक्षपरायण । नाहीं इच्छा भय क्रोध शाला मुक्तचि तो सदा ॥ २८ ॥ आर्या - बाह्यस्पर्शत्यागें भ्रमध्यामाजि दृष्टि रोधोनी । नासांतरसंचारी प्राणापानहि समान साधूनी ॥ २७ ॥ इंद्रिय-मन-बुद्धीतें दमुनी धरि मुक्तिची मनीं चोप। तो मुनि मुक्त म्हणावा नाहीं ज्याला भय स्पृहा कोप २८ ओव्या - बाह्यविषय संसार । त्यजोनि दृष्टी भोवयांवर । प्राणायाम सम कर । प्राणअपान सम करूनियां ॥ २७ ॥ इंद्रियबुद्धिमन जिंकिलें । मुक्तीसाठीं मन घातलें । इच्छा भय क्रोध त्यजिले । मुक्तपद पावला ॥ २८ ॥ तरी वैराग्याचेनि आधारें । जिहीं विषय दवडूनि बाहिरें । शरीरीं एकंदरें । केलें मन ॥ ५१ ॥ सहजें तिहीं संधी भेटी । जेथ भ्रूपलवीं पडे गांठी । तेथ पाठिमोरी दिठी । पाँरुखोनियां ॥ ५२ ॥ सांडूनि दक्षिण वाम । प्राणापान सम । चित्तेसीं व्योम- । गामिये करिती ॥५३॥ तेथ जैसी रेश्योदकें सकळें । घेऊनि गंगा समुद्रीं मिळे | मग एकेक वेगळें | निवडूं नये ॥ ५४ ॥ हें परब्रह्म सत्य, सर्वश्रेष्ठ, अविनाशी, व अमर्याद असें आहे. जे निष्काम असतात, तेच या परब्रह्मरूपी वतनाचे अधिकारी होतात. ४६ महर्षींकरितां निराळें ठेवलेलें आहे, हें विरक्तांच्याच वांट्याला येतें, आणि याच्या समृद्धीला खूट म्हणून कधींच येत नाहीं. ४७ 6 ज्यांनी आपले चित्त विषयांतून हिसकून घेतलें आणि तें आपल्या पूर्णपणे कह्यांत ठेविलें आहे ते ज्या ठिकाणी दृढ व शांत होऊन निजले असतां, पुन्हां जागे होतच नाहींत, त्यालाच 'परब्रह्म निर्वाण' म्हणतात. अर्जुना, आत्मज्ञान्यांचे ध्येय जं परब्रह्म तेंच ते पुरुष होत. ४८.४९ पुरुष या स्थितीला कसे पोचले, देहांत असतां ते ब्रह्मस्वरूपाला कसे आले, हें तूं विचारशील, म्हणून ते थोडक्यांत सांगतों, ऐक. १५० विरक्तीच्या बळाने ज्यांनीं सर्व विषय बाहेर घालवून, आपलें शरीर निव्वळ मनोमय करून सोडलें आहे, ५१ ते अशा संधीस भिवयांची टोकं जेथे एकत्र गांठतात, तेथे दृटी माघारी फिरवून, डाव्या व उजव्या नाकपुडीचे मार्ग रोधून, प्राण व अपान वायूंना एकवटतात आणि त्यांना आपल्या चित्ताबरोबर चिदाकाशाकडे वळवितात. ५२, ५३ मग, ज्याप्रमाणे रस्त्यांतील पाण्याचे ओहोळ गंगेला मिळतात, १ सत्य. २ निराळें राखून ठेवले. ३ वांट्याला आलें ४ एकनिष्ट, एकाम ५ संधी साधल्यानें ६ भुवयांच्या ढोंकांना, ७ फिरवून वळवून ८ चिदाकाशी किंवा ब्रह्मरंध्री जाणारे. ९ गांवदरीचें पाणी,