पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

涼涼涼涼涼涼涼冰涼涼冰涼涼涼涼涼涼冰涼涼涼涼涼油源源 भक्तिमार्गाची आवश्यकता १७ आपली श्रीमद्भगवद्गीतेवरील भावार्थदीपिका म्हणजेच प्रस्तुतची ज्ञानदेवी ऊर्फ ज्ञानेश्वरी शा. श. १२१२ मध्ये रचून पुरी केली. ज्ञानदेव महाराज सांगतात- ऐसें युगीं वरि कळीं, आणि महाराष्ट्रमडळीं, श्रीगोदावरीच्या कुळीं दक्षिणिली, १८०२ त्रिभुवनैकपवित्र, अनादि पंचक्रोशक्षेत्र, जेथ जगाचें जीवनसूत्र श्रीमहालया असे, १८०३ तेथ इंदुवंशविलासु, जो सकलकलानिवासु, न्यायातें पोषी क्षितीशु श्रीरामचंद्र, १८०४ तैं माहेशान्वयसंभूतें, श्रीनिवृत्तिनाथसुतें केलें ज्ञानदेवें गीते देशीकार लेणें. १८०५ अध्याय १८ वरील उता-यावरून व मागें केलेल्या इतर उल्लेखांवरून हे स्वयंसिद्धच आहे की, ज्ञानदेवीची रचना होण्या- पूर्वीच ज्ञानदेवांनी आपले वडील बंधु निवृत्तिनाथ यांच्यापासून नाथपंथाची दीक्षा घेतली होती, व ते त्या पंथाचा विशेष जो योगाभ्यास त्यांतही निष्णात झाले होते. परंतु ज्ञानदेवांच्या असें ध्यानीं आलें कीं, पूर्ण चित्तवृत्तिनिरोध करून योगसाधनानें अव्यक्त तत्त्वांत समरस होऊन जाणें, हें सामान्य जनांस शक्य नाहीं, कारण त्यांत क्लेश फार व ऋद्धिसिद्धींच्या मोहनीनें समाधिवृत्ति चळून अधःपात होण्याचा संभवही जबरदस्त. ज्ञानमार्गही पचण्यास कठीण; शिवाय, ज्ञानाचा ठेवा वेदवेदांताच्या कडीकुलपांत मोहरबंद असल्यामुळे स्त्रीशुद्वादिकांना अप्राप्य झालेला. नुसत्या कर्मकांडांत रजोगुणाचा व तमोगुणाचा खेळ मनस्वी. शिवाय, कर्मात ज्ञाताज्ञातपर्णे दोष उत्पन्न होऊन तें वायही जातें. या सर्वांहून अत्यंत सोपें, सर्वांस सहज आचरतां येण्यासारखें, व वर्णादि भेद ज्याच्या आड येऊं शकत नाहींत, असें मोक्षप्राप्तीचें साधन 'भक्ति' हेंच होय, असें त्यांच्या मनानें घेतलें. याच भक्तिमार्गाचा पुरस्कार भगवद्गीतेनें केला असल्यामुळे, ज्ञानदेवांनी गीतेवर मराठी भाष्य करून सर्व जनतेला तो मार्ग सुगम व उघडा केला. कलियुगांतच गीता प्रकट झाली, कलियुगांतच ईश्वराविषयीं प्रेमळ भक्तांचा पंथराज उघडला, म्हणून कलियुगाला ज्ञानदेव वरील उताऱ्यांत, 'युगवर' म्हणजे ' श्रेष्ठ युग' असें म्हणतात. याच कारणास्तव ते गतिला वेदाचें बीज वेदाचे पूरक व वेदाचें निर्दोष स्वरूप समजतात. ते म्हणतात- तरी जयाच्या निःश्वासीं जन्म जालें वेदराशी, तो सत्यप्रतिज्ञ पैजेसीं बोलिला स्वमुखें; १४२८ म्हणौनि वेदां मूळभूत गीता, म्हणों हैं होय उचित, आणिकही येकी येथ उपपत्ति असे. १४९९ जें न नशतु स्वरूपें जयाचा विस्तारु जेथ लोपे, तें तयाचें म्हणिजे 'बीज' जगीं. १४३० तरी कांडत्रयात्मक शब्दराशि अशेखु गीतेमाजीं असे, रुखु बीजीं जैसा. १४३१ म्हणोनि वेदांचें बीज श्रीगीता होय, हें मज गमे, आणि सहज दिसतही आहे, १४३२ वेदु संपन्न होय ठाई, परी कृपणु ऐसा आनु नाहीं, जे कानीं लागला तिहीं वर्णाच्याची. १४५७ येरां भवव्यथा ठेलियां स्त्रीशूद्रादिकां प्राणियां अनवसरू मांडूनियां राहिला आहे. १४५८ तरी मज पाहतां, तें मागील उणें फेडावया, गीतापर्णे वेदु वेठला भलतेणें सेव्य होआवया. १४५९. अध्याय १८ अर्थात् ज्ञानदेवांचा हा भक्तिमार्ग ज्ञानयुक्त भक्तीचा आहे. ज्ञानदेवांनी ही भावार्थदीपिका रचतांना गीतार्थाचा सांगोपांग विचार केलेला आहे, मग तत्त्वविचाराची सांगड भक्तियोगाशी घालण्यास ते चुकणार तरी कसे ? ते विचारतात- यालागीं आम्हां प्राकृतां देशिकारें बंधे गीता म्हणणें, हें अनुचिता कारण नोहे. १७२१ आणि बापु पुढां जाये, ते घेत पाउलांची सोये, बाळ तें, तरी न लाहे पावों कायी ? १७२२ तैसा व्यासाचा मागोवा घेतु, भाष्यकारांतें बाट पुसतु, अयोग्यही मी न पवतु, कें जाईन ? १७२३. अध्याय १८ ईश्वराची खरी भक्ति म्हणजेच ज्ञान. ज्ञानदेव म्हणतात--- ज्ञानी इयेतें 'स्वसंविति, ' शैव म्हणती 'शक्ति, ' आम्ही 'परम भक्ति' आपुली म्हणों. ११३३ हे मज मिळतिये वेळे तयां कर्मयोगियां फळे, मग समस्तही निखिळें मियांचि भरे. ११३४ अध्याय १८ १ पाठभेद-यदु० २ देवगिरिकर रामदेवराव जाधव (इ. स. १२७१-१३०९ ) 涼涼涼