पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय पांचवा १४१ योऽन्तःसुखोऽन्तरारामस्तथान्तज्योतिरेव यः । स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति ॥२४॥ लभन्ते ब्रह्मनिर्वाणमृषयः क्षीणकल्मषाः । छिन्नद्वैधा यतात्मानः सर्वभूतहिते रताः ॥ २५ ॥ सम० - सुखी आंत रमे आंत अंतर्ज्योतीच जो स्वयें । झाला ब्रह्मचि तो योगी ब्रह्मनिर्वाण पावतो ॥ २४ ॥ पावती ब्रह्मनिर्वाण जे ज्ञानी क्षीणपातक । द्वैतनारों स्थिरमती सर्वभूतहित रत ॥ २५ ॥ आर्या - अंतः प्रकाशमय जो अंतः सुखयुक्त अंतराराम । तो ब्रह्मयुक्त योगी पावे निर्वाण पांडवा ब्रह्म ॥ २४ ॥ निर्वाणब्रह्मा पावति ऋषिवर्य जाण निष्पापा। छिन्नद्वैत यतात्मे करणारे सर्व भूतहित बापा ॥ २५ ॥ ओव्या- ज्याचे हृदय प्रकाशे । अंतरसुख आराम भासे । तोचि योगी असे । ब्रह्मीं निर्वाण पावतो ॥ २४ ॥ प्राणी पाप टाकीत । ब्रह्मीं जे लीन होत । त्यांचे सुख त्यांचे हृदयांत । सर्वभूतहितरत असे ॥ २५ ॥ जे ऐसेनि सुखें मातले । आपणपांचि आपण गुंतले । ते मी जाणें निखिल वोतले । सामरस्याचे ॥ ३७ ॥ ते आनंदाचे अनुकार । सुखाचे अंकुर । कीं महावोघें विहार | केले जैसे ॥ ३८ ॥ ते विवेकाचे गांव । कीं परब्रह्मींचे स्वभाव । ना तरी अळंकारले अवयव | ब्रह्मविद्येचे ॥ ३९ ॥ ते सत्त्वाचे सात्त्विक । कीं चैतन्याचे आंगिक । हें वह असो एकैक । वानिसी काई ॥ १४० ॥ तूं संतस्तवनीं रतसी । तरी कथेची से न करिसी । कीं निराळीं बोल देखसी । सनांगर ॥ ४१ ॥ परि तो रसातिशयो मुकुळीं । मग ग्रंथार्थदीपु उजळीं । करीं साधुहृदयराउळीं । मंगळ उखौ ॥ ५२ ॥ ऐसा श्रीगुरूचा उवयिला । निवृत्तिदा सासी पातला । मग तो म्हणे श्रीकृष्ण वोलिला । तेंचि आइका ॥ ४३ ॥ अर्जुना अनंत सुखाच्या डोहीं । एकँसरां तळुचि घेतला जिहीं । मग स्थिराऊनि तेही । तेंचि जाहले ॥४४॥ अथवा आत्मप्रकाशें चोखें । जो आपणपेंचि विश्व देखे । तो देहेंचि परब्रह्म जे या आत्मसुखानं तर्र झाले व आत्मरूप होऊन राहिले त्यांना मी समरसपणाचे व्रह्मैकरसाचे ओतीव पुतळेच समजतों; ३७ ते आनंदाची मूर्ति, सुखाचे धुमारे, किंवा आत्मबोधानें केलेलं आरामात्रें स्थानच होत. ३८ ते विवेकाची जन्मभूमि, किंवा ब्रह्मतत्त्वाचें केवलस्वरूप, किंवा ब्रह्मविद्येचे शृंगारलेले अवयव समजावे ! ३९ ते सत्वगुणाचें सात्विकपण, किंवा चैतन्याचें चलनवलन जाणावे. ” ( पण व्याख्यान असें चढत्या भरांत आलें, तोंच श्रोते म्हणतात ) हा विस्तार पुरे कर. अरे, आतां एकेक कल्पना तूं किती परोपरींनीं रंगविणार ? १४० तूं संतांच्या स्तुतींत तल्लीन होऊन जातोस, आणि मग तुला चालू कथेची आठवणही रहात नाहीं, आणि निर्गुण विषयप्रतिपादनांत सुंदर सुंदर घोंसदार शब्द योजण्याची तुला स्फूर्ति होते. ४१ परंतु हा स्फुरणाचा आवेग आवरून घे, आणि ग्रंथार्थाचा दिवा पाजळ, आणि सज्जनांच्या अंतरंगरूपी घरांत कल्याणकारक प्रभातकाळ कर. " ४२ अशा प्रकारे श्रीनिवृत्तिनाथ गुरुराजांचा अभिप्राय मला ज्ञानदेवाला कळल्यावरून, मी म्हणतों, कीं, " मग श्रीकृष्ण अर्जुनाला काय म्हणाले, तेंच ऐका. " ४३ श्रीकृष्ण म्हणतात, “अर्जुना, ज्यांनी आत्मानंदाच्या अगाध डोहाचा तळ एकदम गांठला, ते नंतर तेथेच स्थिर होऊन तद्रूपच होतात. ४४ किंवा जो आत्मज्ञानाच्या निर्मट प्रकाशानें सर्व विश्व आपल्या ठायीं पाहतो, त्याला देहधारी परब्रह्म म्हणण्यास कोणतीही आडकाठी नाहीं. ४५ १ निर्गुण ब्रह्माच्या प्रतिपादनांत. २ सुंदर व घोंसदार. ३ आवर, आटोप. ४ साधुंच्या हृदयमंदिरांत ५ प्रभात. ६ अभिप्राय ७ एकदम.