पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४० सार्थ श्रीज्ञानेश्वरी वोखा | तूं झणें कहीं या वाटा । विसरोनि जाशी ॥ २७ ॥ पैं यातें विरक्त पुरुष । त्यजिती कां जैसें विप । निराशा तयां दुःख | दोविलें नांवडे ॥ २८ ॥ शक्नोतीहैव यः सोढुं प्राक्शरीरविमोक्षणात् । कामक्रोधोद्भवं वेगं स युक्तः स सुखी नरः ॥ २३ ॥ सम० - जो जितां शके सोसूं पूर्वीच मरणाहुनी । कामक्रोधादि वेगांतें तो योगी तो सुखी नर ॥ २३ ॥ आर्या - निजमरणाहुनि पूर्वी कामक्रोधादिवेग जो साहे । तो योगी तोचि सुखी तो ज्ञानी योग्य मुक्तिला लाहे ॥२३॥ ओंवी — योगियातें हा योग । कामक्रोधांचा वेग । साहूं शके सांग । तो योगी सुखी असे ॥ २३ ॥ ज्ञानियांच्या हन ठायीं । याची मातुही कीर नाहीं । देहीं देहभावो जिहीं । स्ववश केले ॥ २९ ॥ जयांतें बाह्याची भाख । नेणिजेचि निःशेख | अंतरीं सुख । एक आथी ॥ १३० ॥ परि तें वेगळेपणें भोगिजे । जैसें पक्षियें फळ चुंविजे । तैसें नव्हे तेथ विसरिजे । भोगितेपणही ॥ ३१ ॥ भोगी अवस्था एक उठी । ते अहंकाराचा अंचळु लोटी । मग सुखसि घे औंटी । गाढेपणें ।। ३२ ।। तिये आलिंगनमेळीं । होय आपेंआप केवळी । तेथ जळ जैसें जळीं । वेगळें न दिसे ॥ ३३ ॥ कां आकाशीं वायु हारपे । तेथ दोन्ही हे भाप लोपे । तैसें सुखचि उरे स्वरूपें । सुरंतीं तिये ॥ ३४ ॥ ऐशी द्वैताची भाप जाये । मग म्हणों जरी एकचि होये । तरी तेथ साक्षी कवणु आहे । जाणतें जें ॥ ३५ ॥ म्हणोनि असो हें आघवें । एथ न बोलणें काय बोलावें । ते खुणचि पावेल स्वभावें । आत्माराम ।। ३६ ।। वाईट आहे. बाबा, तूं चुकूनसुद्धां कधींही या विषयाच्या वाटेला जाऊं नकोस बरें ! २७ जे पुरुष विरक्त असतात, ते विषयाला विषाप्रमाणें टाळतात, आणि पुढें आलेलें दुःखही त्यांच्या निरिच्छपणामुळें त्यांना भासत नाहीं. २८ ज्यांनीं देहाचे सर्व विकार सर्वस्वी आपल्या कह्यांत आणले आहेत, अशा ज्ञानी पुरुषांना विषयजन्य दुःखाची वार्ताही नसते. २९ ज्यांना वाह्य विषयांची भाषा मुळींच कळत नाहीं, त्यांच्या अंतरंगांत एक अखंड सुख नांदत असतें. १३० परंतु हें सुख भोगण्याची त्यांची रीति कांहीं निराळीच आहे ! पक्षी जसे फळाचा आस्वाद घेतात, तसे कांहीं ते सुखास्वाद घेत नाहींत, तर सुख भोगीत असतां, ते आपला भोक्तेपणाही विसरतात ! ३१ हा आत्मसुखाचा उपभोग घेत असतां, त्यांची अशी तन्मय अवस्था होते, कीं अहंभावाचा म्हणजे मीपणाचा पडदा ती दूर सारते आणि मग ती तन्मयता त्यांना असें गाढालिंगन देते, कीं, तें आलिंगन पडतांच, जसें पाणी पाण्याशीं समरस होऊन जातें, तद्वत् जीवात्मा परमात्म्याशीं अगदीं एकरूप होऊन जातो. ३२, ३३ अथवा वारा आकाशांत लोपून गेला, म्हणजे ' हा वारा आणि हें आकाश,' अशी द्वैताची भाषाही उरत नाहीं, त्याप्रमाणें जीवाचा या तन्मयावस्थेशीं योग झाला, कीं, केवळ सुखच आत्मस्वरूपानें उरतें. ३४ अशा रीतीनें भेदाची गोष्ट संपते, मग तेथें एकपण उरतें असें म्हटलें, तरी त्याचें ज्ञान करून घेण्याला द्रष्टा तरी कोठचा असणार ? ३५ म्हणून हें व्याख्यान आतां पुरे करतों. जें बोलतांच येत नाहीं, त्याच्याविषयीं काय बोलावें ? ज्याला आत्मस्वरूपाचा अनुभव आला असेल, तो या अस्पष्ट सूचनेनंच सर्व कांहीं समजेल. ३६ १ ओढवलेलें, २ भासत नाहीं. ३ वस्त्र, पडदा. ४ आलिंगन, मिठी . ५ एकवटलेली स्थिति ६ संमेलनांत,