पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय पांचवा १३९ ते शीतल होईल केतुली । मूषकासी ॥ १७ ॥ जैसा आमिपकवळु पांडवा । मीनु न सेवी तंवचि वरवा । तैसा विपयसंगु आघवा । निभ्रांत जाणें ॥ १८ ॥ हे विरक्तांचिये दिठी | जैं न्याहाळिजे किरीटी । तैं पांडुरोगाचिये पुष्टी – । सारिखें दिसे ॥ १९ ॥ म्हणोनि विषयभोगीं जें सुख । तें साद्यंतचि जाण दुःख । परि काय कीजे मूर्ख । न सेवितां न सरे ॥ १२० ॥ ते अंतर नेणती बापुडे | म्हणोनि अगत्य सेवणें घडे । सांगें पूयपंकींचे किडे । काय चिळसी घेती ॥ २१ ॥ तया दुःखियां दुःखचि जिव्हार । ते विपयकर्दमींचे दर्दर | ते भोगजळींचे जलचर । सांडिती केवीं ॥ २२ ॥ आणि दुःखयोनि जिया आहाती । तिया निरर्थका तरी नव्हती । जरी विषयांवरी विरक्ती । धरिती जीव || २३ || ना तरी गर्भवासादि संकट । कां जन्ममरणींचे कष्ट | हे विसांवेंवीण वाट । वाहवी कवणें ॥ २४ ॥ जरी विषयी विषयो सांडिजेल । तरी महादोपीं कें वसिजेल।आणि संसारु हा शब्द नव्हेल । लटिका जगीं ॥ २५ ॥ म्हणोनि अविद्याजात नाथिलें । तें तिहींचि साच दाविलें । जिहीं सुखबुद्धी घेतलें । विपयदुःख ।। २६ ।। या कारणें गा सुभटा । हा विचारितां विषय हें असो, मला इतकेंच सांग, कीं, सापाच्या फडेची सावली उंदराला कितीशी सुखकारक होईल ? १७ अर्जुना, गळाला लावलेला मांसाचा तुकडा जोपर्यंत माशानें गिळला नाहीं, तोपर्यंतच मोहक वाटतो, तसाच खरोखर या विषयसंगाचा प्रकार आहे, हें तूं निःसंदेह समज. १८ अर्जुना, विरक्तांच्या दृष्टीनं या विषयांकडे पाहिलें, म्हणजे ते फोफशे दिसणाऱ्या पांडुरोग्यांप्रमाणेच भासतात. १९ म्हणून विषयोपभोगांत जं सुख भासतें तें खरोखर मूळापासून शेवटपर्यंत नुसतें दुःखच आहे. पण अज्ञानी लोकांनीं तरी काय करावे? त्यांना तें विषयसेवन केल्यावांचून राह्यतच नाहीं ! १२० त्यांना आंतलें वर्म ठाउक नसल्यामुळे ते बापडे मोठ्या आवडीने विषयांचे सेवन करतात. अरे, पुवाच्या चिखलांतले किडे कधीं पुवाची शिसारी घेतात का ? २१ अरे, त्या दुःखी जीवांना दुःखच जिव्हाळा - जीवन - होते. विषयांच्या चिखलांतले बेडूक, ते उपभोगांच्या पाण्यांतले मासे, त्या चिखलाला आणि त्या पाण्याला कसे सोडणार ? २२ आणि हे विषय दुःखयोनि म्हणजे दुःख उत्पन्न करणारे आहेत, परंतु जर है जीव या विषयभोगांविषयीं निःस्पृह व उदास राहतील, तर हे वांझोटे विषयभोग नष्ट होऊन जातील. २३ कोठेही यत्किंचित् विश्रांति न लाभतां, ही गर्भवासादि संकटांची आणि जन्ममरणांच्या यातनांची विकट वाट खेटायला कोण बरें सज्ज झाला असता ! २४ आणखी असें कीं, जर या विषयासक्त जीवांनीं विषय सोडून दिले, तर बिचाऱ्या महादोषाला तरी कोठें ठाव मिळणार ? आणि मग 'संसार' हा शब्दही जगांत खोटा ठरून नाहींसा होईल ! २५ या कारणास्तव ज्या सुखाला लांचावलेल्या लोकांनी विषयांपासून होणाऱ्या दुःखाचा अंगीकार केला आहे, त्यांनीच या नसत्या मायिक भ्रमाला खरेपणा लाभून दिला आहे. २६ म्हणून, हे वीरश्रेष्ठा अर्जुना, हा विषय फारच १ पुरे पडतें, चालतें २ चालावी,