पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३८ सार्थ श्रीज्ञानेश्वरी कई वादें | चुंब असे ॥ ७ ॥ तैसें आत्मसुख उपाइलें । जयासि आपणपेंचि फावलें । तया विषयो सहज सांडवले | म्हणों काई ॥ ८ ॥ ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते । आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः ॥ २२ ॥ सम० - जे भोग विषयस्पर्शे ते दुःखाचेंचि कारण। आद्यंतवंत कँतिया रमे ज्ञानी न त्या सुखीं ॥ २२ ॥ आर्या - जे विषयभोग पार्था ते दुःखाचे प्रतिक्षणी दाते । उत्पत्तिनाशवंत स्ववशं रमविति बुधासि न कदा ते ॥ २२ ॥ ओंवी - स्पर्शे संसार गरलसार । तें दुःखाचें मूळ निरंतर । नाश होत अपार । कौंतेया ज्ञानी सुखी ॥ २२ ॥ एहवीं तरी कौतुकें | विचारूनि पाहें पां निकें । या विषयांचेनि सुखें । झकविजी कवण ॥ ९ ॥ जिही आपणपें नाहीं देखिलें । तेचि इहीं इंद्रियार्थी रंजले । जैसें रंकु कां आंळुकैलें । तुपातें सेवी ॥ ११० ॥ ना तरी मृगें तृपापीडितें । संभ्रमें विसरोनि जळातें । मग तोयबुद्धी बैरडीतें । ठाकूनि येती ॥ ११ ॥ तैसें आपणपें नाहीं दिठें । जयातें स्वसुखाचें सदा खराटें । तयासीचि विषय हे गोमटे | आवडती ॥ १२ ॥ न्हवीं विपयीं सुख आहे | हें बोलणेंचिंसारिखें नोहे । तरी विद्युत्स्फुरणें कां न पाहे । जगामाजीं ॥ १३ ॥ सांगें वात वर्ष आतपु धरे । ऐसे अभ्रच्छायाचि जरी सँरे । तरी त्रिमाळिकें धवळारें । करावीं कां ॥ १४ ॥ म्हणोनि विषयसुख जें बोलिजे । तें नेणतां गा वायां जल्पिजे । जैसें महर कां म्हणिजे | विपकंदातें ॥ १५ ॥ ना तरी भौमा नाम मंगळु । रोहिणीतें म्हणती जळु । तैसा सुखप्रवादु बरेछु । विपयिकु हा ॥ १६॥ हे असो आघवी बोली । सांग पां सर्पफणीची साउली । त्याप्रमाणेंच ज्याला आत्मसुखाचा लाभ होऊन ब्रह्मस्वरूप प्राप्त झालें, तो विषयांतून आपोआपच निसटला, हें सांगणेंच नको ! ८ आतां, या विषयसुखाच्या फसवणुकीला कोण बळी पडतात याचा नीट विचार करून पहा बरं, अर्जुना, ९ ज्यांना आत्मस्वरूपाचें दर्शन घडलें नाहीं, तेच या इंद्रियविषयांना भुलतात. ज्याप्रमाणे भुकेनें आळलेला माणूस कोंडाही खातो, ११० किंवा तहानेनें कासावीस झालेली हरणें खन्या पाण्याचें स्वरूप भ्रमानें विसरून माळ जमिनीलाच पाणी मानून तिच्याकडे धूम ठोकीत येतात, ११ त्याप्रमाणेंच ज्यांनीं आत्मस्वरूप देखिलें नाहीं, व ज्यांच्या पदरीं आत्मसुखाचा केवळ ठंठणाट आहे, त्यांनाच हीं विषयसुखे मोठी गोड वाटतात. १२ खरें पाहिलें तर या विषयोपभोगांत सांगण्यासारखें मुळींच मुख नाहीं, जर या विषयांत सुख आहे असें म्हणतां येईल, तर मग विजेच्या चमकेंतही जगाचे व्यवहार कां चालू नयेत ? १३ अरे, आकाशांतील ढगांच्या छायेनेंच जर वारा, पाऊस' व ऊन्ह, यांच निवारण होऊ शकेल, तर मग तिमजली चुनेगच्ची वाडे तरी कशाला बांधावे ? १४ म्हणून 'विषयसुख' हा शब्दप्रयोगच अर्थहीन आहे. जसें एका प्रकारच्या विषारी कांद्याला 'महुर' म्हणजे 'मधुर' असें नांव आहे, १५ किंवा जसे भौम या पापग्रहाला 'मंगळ' म्हणतात, अथवा मृगजळाच्या भ्रमाला 'जळ' म्हणतात, त्याप्रमाणेच विषयांस उद्देशून 'सुख' शब्द योजणे ही वायफळ बडबड आहे. १६ पण १ फसविले जातात. २ भुकेनें आळलेले ३ माळ जमिनीला ४ वाण, ठंठणा. ५ वाटतात. ६ पुरी पडते, चालते. ७ मधुर. ८ भूमीपासून उत्पन्न झालेला पापग्रह ९ मृगजळाला. १० म्यर्थ, अर्थद्दीन,