पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय पांचवा १३७ लौकिकेंचि व्यापारें । परि सांडिलें निदसुरें । लौकिक हैं ॥ ९८ ॥ जैसा जनामाजीं खेचरु | असतुचि जना नोहे गोचरु | तैसा शरीरीं तो परि संसारु । नोळखे तयातें ॥ ९९ ॥ हें असो पवनाचेनि मेळें । जैसे जळींचि जळ लोळे | तें आणिकें म्हणती वेगळें । कल्लोळ हें ।। १०० ।। तैसें नामरूप तयाचें । हीं ब्रह्मचि तो साचें । मन साम्या आलें जयाचें । सर्वत्र गा ॥ १ ॥ ऐसेनि समदृष्टि जो होये । तया पुरुषा लक्षणही आहे । अर्जुना संक्षेपें सांगेन पाहें | अच्युत म्हणे २॥ न प्रहृष्येत्प्रियं प्राप्य नोद्विजेत् प्राप्य चाप्रियम् । स्थिरबुद्धिरसंमूढो ब्रह्मविद्ब्रह्मणि स्थितः॥२०॥ सम० न हर्षे प्रिय होतां जो अप्रिये घाबरा नव्हे । स्थिरबुद्धि न जो मूढ ब्रह्मीं ब्रह्मज्ञ जो स्थिर ॥ २० ॥ आर्या - प्रिय होतां हर्पेना अप्रिय होतांचि दुःख जो साहे । स्थिरबुद्धि न जो मूढ ब्रह्मीं ब्रह्मज्ञ पांडवा राहे ॥ २० ॥ ओंवी—सुख झालिया हर्ष नाहीं । दुःख झालिया क्रोध नाहीं । बुद्धि करूनि स्थिर तेही । ते ब्रह्मीं पावती ॥ २० ॥ तरी मृगजळाचेनि पूरें। जैसें न लोटिजे कां गिरिवरें । तैसा शुभाशुभ न विकरे । पातलिया जो ॥ ३ ॥ तोचि तो निरुता । समदृष्टि तत्त्वतां । हरि म्हणे पांडुसुता । तोचि ब्रह्म ॥ ४ ॥ बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत्सुखम् । स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षय्यमश्नुते ॥ २१ ॥ सम०—-स्पृहा न बाह्यविषयीं स्वरूपीं पावतो सुख । ब्रह्मयोगीं युक्तचित्त तो भोगी सुख अक्षय ॥ २१ ॥ आर्या – बाह्यस्पर्श त्यागी पावे अंतःसुखासि जो योगी । तो ब्रह्मयोगयुक्त ज्ञानी अक्षय्य पूर्ण सुख भोगी ॥ २१ ॥ अवी-बाह्य सुखार्ते त्यजी । हृदयीं आत्मसुख जाणोन जी । ब्रह्मसुखीं निरंतर जीं । अक्षय सुख भोगी ॥ २१ ॥ जो आपण सांडूनि कांहीं । इंद्रियग्रामावरी येणेंचि नाहीं । तो विषय न सेवी हैं काई । विचित्र येथ ॥ ५ ॥ सहजें स्वसुखाचेनि अपारें । सुरंवाडलेन अंतरें । रचिला म्हणऊनि वाहिरें । पाऊल न घली ॥ ६ ॥ सांगें कुमुददळाचेनि ताटें । जो जेविला चंद्रकिरणें चोखटें । तो चकोरु केले, पण लौकिक वस्तूंचा अज्ञानजन्य मोह सोडला, ९८ जसें झाडाला भूत पछाडतें पण पाहणारांस ते दिसत नाहीं, तसाच जो शरीरांत राहतो, पण संसाराला ज्याची ओळख होत नाहीं, ९९ किंवा वाऱ्याच्या संगतीने पाणीच पाण्यावर लोळतं, लोक मात्र त्याला 'लाटा ' हें निराळेंच नांव देतात, १०० त्याप्रमाणं ज्याला नांवरूप मात्र निराळें आहे, परंतु जो निव्वळ ब्रह्मच आहे, आणि ज्याचे मन सर्वत्र समभावानेच वावर करितें, १ अशा प्रकारें जो 'समदृष्टि ' झाला, त्या पुरुषाचें एक विशेष लक्षणही आहे; अर्जुना, तें मी तुला थोडक्यांत सांगतों. २ जमा मृगजळाच्या लढ्यानें पर्वतराज लोटला जात नाहीं, तसाच शुभाशुभाच्या प्राप्तीनें योगीही विकार पावत नाहीं. ३ असा जो असेल, तोच खराखरा संपूर्ण समटि समजावा. तोच प्रत्यक्ष ब्रह्म होय " असें श्रीकृष्ण अर्जुनास म्हणाले. ४ जो आत्मस्वरूपाला सोडून कधीही इंद्रियांच्या स्वाधीन होत नाहीं, तो विषयसेवन करीत नाहीं, यांत आश्चर्य कसलें ? ५ स्वाभाविक व अमर्याद आत्मानंदानें त्याचें अंतरंग पूर्ण सुखावलें असल्यामुळे, तो त्या आनंदांतून बाहेर मुळींच पडत नाहीं. ६ अरे, ज्या चकोराने कुमुदाच्या पाकळीच्या ताटांतून चंद्रकिरणांचा सुग्रास सेवन केला, तो चकोर वाळवंटाची चव घेईल काय ? ७ १ अज्ञानमय. २ आत्मस्वरूपाला ३ सुखावलेल्या. १८