पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३६ सार्थ श्रीज्ञानेश्वरी एक आपणपांचि जैसें । ते देखती विश्व तैसें । हें बोलणें कायसें । नवलु एथ ॥ ८९ ॥ परी दैव जैसें कवतिकें | कहींचि दैन्य न देखे । कां विवेक हा नोळखे । भ्रांतीतें जेवीं ॥ ९० ॥ ना तरी अंधकाराची वानी जैसा सूर्यो न देखे स्वप्नीं । अमृत नायके कानीं । मृत्युकथा ॥ ९१॥ हें असो संतापु कैसा । चंद्र न स्मरे जैसा । भूतीं भेदु नेणती तैसा । ज्ञानिये ते ॥ ९२ ॥ विद्याविनयसंपन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि । शुनि चैव श्वपाके च पण्डिताः समदर्शिनः ॥ १८ ॥ सम० - विद्या सद्गुणसंपन्नी ब्राह्मणीं धेनुहीमधें । जगीं श्वानांत चांडाळीं पाहती सम पंडित ॥ १८ ॥ आर्या- विद्याविनयी ब्राह्मण गाय गज श्वपच आणि तीं श्वानें । पाहति समदृष्टी जे पंडित ते वंदिजेत विश्वानें ॥ १८ ॥ ओवी - विद्याविनयसंपन्न । गाय गज सूकर श्वान । हे जयासि सम जाण । तोचि ज्ञानी पंडित ॥ १८ ॥ मग हा मशकु हा गजु । कीं वपचु हा द्विजु । पैल इतरु हा आत्मजु । हें उरलें कें ॥ ९३ ॥ ना तरी हे धेनु हें श्वान । एक गुरु एक हीन । हें असो कैंचें स्वप्न । जागतया ॥ ९४ ॥ एथ भेदु तरी कीं देखावा । जरी अहंभाव उरला होआवा । तो आधचि नाहीं आघवा । आतां विमुकाई ॥ ९५ ॥ इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः । निर्दोषं हि समं ब्रह्म तस्माद्ब्रह्मणि ते स्थिताः ॥ १९ ॥ सम० - सम मन स्थिर तिहीं जितांच भव जिंकिला । सम तें ब्रह्म निर्दोष तस्माद् ब्रह्मींच ते समी ॥ १९ ॥ आर्या - स्थिर मन समीं जयांचें जितांचि भव जिंकिला तिहीं पार्था । समतें ब्रह्म सुनिर्मळ तस्माद् ब्रह्मींच ते समीं समता ॥ १९ ॥ ओवी - सम ज्यांचे जीवीं वसे । त्यांहीं संसार जिंकिलासे । निर्दोषही वसतसे । ब्रह्मीं तो सम ॥ १९ ॥ म्हणोनि सर्वत्र सदा सम । तें आपणचि अद्रय ब्रह्म । हैं संपूर्ण जाणें वर्म । समदृष्टीचें ॥ ९६ ॥ जिहीं विषयसंगु न सांडितां । इंद्रियांतें न दंडितां । परि भोगिली निःसंगता | कामनेविण ॥ ९७ ॥ जिहीं लोकांचेनि आधारें । ते विश्वाला आत्मस्वरूप समजतात, असें म्हटलें, तर त्यांत आश्चर्य कसलें ? ८९ पण, दैवाला जसें नुसते विनोदासाठीसुद्धां दीनपण दृष्टीला पडत नाहीं, किंवा विवेकाला जशी कधीं भ्रांतीची ओळखही घडत नाहीं, ९० किंवा सूर्याला जसा अंधकाराचा नमुनाही स्वप्नांतसुद्धां पाहण्यास मिळत नाहीं, किंवा अमृताच्या कानीं 'मृत्यु' हें नांवही कधीं येत नाहीं, ९१ किंवा चंद्राला उष्म्याचें स्मरण जसें कधींच होत नाहीं, तसाच त्या ज्ञानी पुरुषांना भूतमात्रांत कोणताही भेदभाव आढळत नाहीं. ९२ मग, हें चिलट, हा हत्ती, हा चांडाळ, हा ब्राह्मण, तो परका, हा माझा, इत्यादि भेदभाव कसले उरतात ! ९३ किंवा ही गाय, हें कुत्रे; ही श्रेष्ठ, हें हलकें, ह्या सर्वच कल्पना मावळल्या, कारण जो जागा आहे, त्याला स्वप्न कोठून दिसणार ? ९४ हे सर्व भेद दिसतात, पण केव्हां ? तर अहंभाव शिल्लक राहील तेव्हां. तो अहंभावच मुदलांत गेल्यामुळें विषमतेला वावच उरत नाहीं. ९५ म्हणून, 'सर्व ठिकाणी निरंतर समत्वाने राहाणारें जें एकमेवाद्वितीय ब्रह्म तें मीच, ' हें तत्त्व ' समदृष्टीचं ' रहस्य आहे, असें समज. ९६ ज्यानें विषयांची संगति न सोडतां, आणि इंद्रियदंडन न करितां निष्काम होऊन निःसंगस्थिति कवटाळली, ९७ ज्यानें सामान्य लोकांप्रमाणेंच व्यवहार