पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय पांचवा १३५ पापपुण्यें अशेषें । पासींचि असतु न देखे । आणि साक्षीही होऊं न टके | येरी गोठी कायसी ॥ ८० ॥ पें मूर्तीचेनि मेळें । तो मूर्तचि होऊनि खेळे । परि अमूर्तपण न मैळे | दादुलयाचें ॥ ८१ ॥ तो सृजी पाळी संहारी । ऐसें बोलती जें चराचरीं । तें अज्ञान गा अवधारीं । पांडुकुमरा ॥ ८२ ॥ ज्ञानेन तु तदज्ञानं येषां नाशितमात्मनः । तेषामादित्यवज्ज्ञानं प्रकाशयति तत्परम् ॥ १६ ॥ सम० - अज्ञान बुद्धि ज्यांचें तें ज्या ज्ञानेंचि नाशिलें । परा जडातें तें त्यांचे प्रकाशी ज्ञान सूर्यवत् ॥ १६ ॥ आर्या - आत्मज्ञाने ज्याचें अज्ञान समूळ पावलें नाश । सूर्यापरि दावी तें ज्ञान प्रगटोनि आत्मरूपास ॥ १६ ॥ ओवी - - अज्ञान गेलियावरी । ज्ञान प्रगटवी अंतरीं । तो ईश्वररूप निर्धारीं । ज्ञानवंत जाण तूं ॥ १६ ॥ तें अज्ञान जैं समूळ तुटे । तैं भ्रांतीचें मेसेर फिटे । मग अकर्तृत्व प्रगटे | मज ईश्वराचें ॥। ८३ ।। एथ ईश्वरु एक अकर्ता । ऐसें मानलें जरी चित्ता । तरी तोचि मी हैं स्वभावतां । आदीच आहे ॥ ८४ ॥ ऐसेनि विवेकें उँदो चित्तीं । तयासि भेदु कैंचा त्रिजगतीं । देखे आपुलिया प्रतीति । जगचि मुक्त ॥ ८५ ॥ जैशी पूर्वदिशेच्या राउळीं । उदया येतांच सूर्य दिवाळी । कीं येही दिशां तियेचि काळीं । काळिमा नाहीं ॥ ८६ ॥ तद्बुद्धयस्तदात्मानस्तन्निप्रास्तत्परायणाः । गच्छन्त्यपुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषाः ॥ १७ ॥ सम० – त्याचि ज्ञान बुद्धि चित्त निष्ठा ते परमाश्रय । असे ते पावती मोक्ष ज्ञान जाळूनि संचित ॥ १७ ॥ आर्या--तनिष्ठ तत्परायण अर्पुनि मन बुद्धि ईश्वरी सारी । न पवति पुनरावृत्ति ज्ञानें नाशोनि कम भारी ॥ १७ ॥ ओंवी -- जो मन आणि बुद्धीतें । ईश्वरी स्थापी निश्चितें । भय नाहीं तयातें । मुक्त होय ॥ १७ ॥ बुद्धिनिश्रयें आत्मज्ञान । ब्रह्मरूप भावी आपणा आपण । ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण । तत्परायण अहर्निश ॥ ८७ ॥ ऐसें व्यापक ज्ञान भलें । जयांचिया हृदयाविसित आलें । तयांचि समतादृष्टि वोलें । विशेषं काई ॥ ८८ ॥ अखिल पापपुण्यें त्याला अगदीं खेटून राहात असली, तरी तो त्यांच्याकडे नुसता ढुंकूनही पहात नाहीं; अरे, तो या पापपुण्यांना केवळ तटस्थपणे पहाणारा साक्षीदारही होत नाहीं, मग दुसरी गोष्ट कशाला पाहिजे ? ८० तो देहाच्या संगतीनें देही होऊन अवतारलीला करतो, परंतु त्या अचिंत्य प्रभूचें अमूर्तपण - निर्गुणपण कधींही नाश पावत नाहीं. ८१ तो विश्व निर्माण करतो, सांभाळतो व शेव संहारतो, असें जें कांहीं म्हणतात, तें, गा अर्जुना, केवळ अज्ञान समज. ८२ तें अज्ञान जेव्हां निःशेष नाहींसें होईल, तेव्हांच भ्रांतीची काजळी पुसून जाईल, आणि मग मनुष्याला " मी ईश्वर आहे आणि अकर्ता आहे" असा अनुभव येईल. ८३ आतां ईश्वर हा एकटाच अकर्ता आहे, असें जर मनाला पटलें, तर 'मीच ईश्वर आहे' हें तत्त्व मूळचेंच सिद्ध आहे ! ८४ या समजुतीचा एकदा चित्तांत प्रकाश पडला, म्हणजे मग या त्रिभुवनांत भेदभाव कोठें उरला ? या स्थितीत मनुष्य स्वानुभवानें सर्व जगाला मुक्त स्थितींत - आत्मस्वरूपांतच पाहतो; कारण पूर्व दिशेच्या घरीं सूर्य उगवला म्हणजे तेथें मात्र प्रकाशाची दिवाळी होते, आणि दुसऱ्या दिशांची काळिमा जशीच्या तशीचं उरते, असें कधीं झालें आहे काय ? ८५, ८६ बुद्धीला स्थिरता येऊन आत्मज्ञान झालें, 'आपण ब्रह्मरूप आहों, ' हें पकेँ उसलें, ब्रह्मतत्त्वांत अवचटपणे राहून रात्रंदिवस तन्मयत्व साधलें, ८७ असें सर्वव्यापी ज्ञान ज्याच्या हृदयांत ओतप्रोत भरून राहिलें, त्याला 'समदृष्टि म्हणावें. याहून अधिक आतां काय सांगावें ! ८८ आपल्याप्रमाणेंच १ संगतीने. २ मशेरी, मस, काजळी. ३ धुऊन जाते. ४ मूळचेंच, ५ उदय ६ घरी.