पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३४ सार्थ श्रीज्ञानेश्वरी सर्वकर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी । नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन् ॥ १३ ॥ सम० - करूनि कर्मे संन्यासी मनें होऊनियां सुखें । असे नवद्वारपुरी कांहीं न करवी करी ॥ १३ ॥ आर्या -- करुनी कर्मैहि मर्ने संन्यासी होउनी असे स्वसुखं । देहनवद्वारपुरी कांहीं न करी स्वयं न करवि सुखें ॥ १३ ॥ ओंवी - मनेंकरूनि कर्मे जो स्यजी । ज्ञानी त्यास म्हणिजे जी । देहीं नवद्वारपुरी जी न करी, न करवी ॥ १३ ॥ जैसा फळाचिये हांवें । तैसें कर्म करी आघवें । मग न कीजेचि येणें भावें । उपेक्षी जो ॥ ७३ ॥ तो जयाकडे वासु पाहे । तेउती सुखाची सृष्टि होये । तो म्हणे तेथ राहे । महावोधु ॥ ७४ ॥ नवद्वारे देहीं । तो असतुचि परि नाहीं । करितुचि न करी कांहीं । फलत्यागी ॥ ७५ ॥ न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः । न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते ॥ १४ ॥ सम - कर्तृत्व कमैं लोकांचीं न ईश्वरहि निर्मितो । न कर्मफलभोगातें वर्ते संचारचक्र है ॥ १४ ॥ आर्या - कर्तृत्व कर्म यांत लोकांचें निर्मितो न ईश्वर तें । तेविं न कर्मफळाच्या भोगा संसारचक्र हैं वर्ते ॥ १४ ॥ ओंवी – ईश्वर नाहीं कर्म करित । कर्तृत्व या लोकांत । न कर्मफलभोगातें । संसारचक्र असे || १४ || - जैसा कां सर्वेश्वर । पाहिजे तंव निर्व्यापारु । परि तोचि रची विस्तारु । त्रिभुवनाचा ॥ ७६ ॥ आणि कर्ता ऐसें म्हणिपे । तरी कवणें कम न शिंपे। जे हातुपावो न लिंपे । उदासवृत्तीचा ॥ ७७ ॥ योगनिद्रा तरी न मोडे । अकर्तेपणा सळु न पडे । परि महाभूतांचें दळवाडें । उभारी भलें ॥७८॥ जगाच्या जीवीं आहे । परी कवणाचा कहीं नोहे । जगचि हैं होय जाये । तो शुद्धीही नेणे ॥ ७९ ॥ नादत्ते कस्यचित्पापं न चैव सुकृतं विभुः । अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः ॥ १५ ॥ सम० – कोणाचें पापही नेघे नेघे पुण्यहि ईश्वर । अज्ञाने वेष्टिले ज्ञान त्याणें करिति भोगिती ॥ १५ ॥ आर्या-कोणाचें अघ नेघे नेघे पुण्यासही विभु परंतू । अज्ञान ज्ञानातें अवरी तेणेंचि मोहती जंतू ॥ १५ ॥ ओंवी - कोणाचें पाप न घे जाण । पुण्याचें नलगे कारण । अज्ञानें वेष्टिले जन । त्यार्णे भोग भोगिती ॥ १५ ॥ जसें इतर लोक फलाशेनें कर्म आचरतात, तसाच योगीही कर्म आचरतो, पण मग, तें आपण केलेंच नाहीं, अशा भावनेनें त्या कर्माविषयीं तो उदास राहतो. ७३ मग तो ज्या ज्या दिशेस पाहतो, त्या त्या दिशेस सुखाचाच वर्षाव होतो. तो जेथें राहतो तेथें आत्मबोधाचाही रहिवास असतो. ७४ तो या नऊ छिद्रांच्या शरीरांत राहून देहभावहीन असतो, आणि फळाशा सोडल्यामुळें कर्म आचरूनही अकर्ता होतो. ७५ जर का जगदादिवीज परमेश्वराचा विचार केला, तर तो अकर्ताच ठरतो, परंतु त्यानेंच मायोपाधीनें हा त्रिभुवनाचा पसारा विस्तारला आहे. ७६ आणि, जर त्याला 'कर्ता' असें म्हणावें, तर त्याला कर्माचा संपर्कही होत नाहीं, कारण त्याच्या तटस्थ वृत्तीच्या हातपायाला कधींच मळ लागत नाहीं, ७७ त्याची योगनिद्रा कधींच चाळवत नाहीं, व अकर्तेपणाचीही डळमळ होत नाहीं, तरीपण तोच या पंच महाभूतांचा हा डौलदार व्यूह रचतो ! ७८ तो जगाचा जीवच आहे, तरीपण कोणाच्याही कह्यांत कधींही नाहीं. हें जग होतेंजाते, पण त्याची वार्ता त्याच्या गांवींही नसते ! ७९ १ वाद, दिशा, २ डळमळ. ३ समुदाय ४ वार्ता,