पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय पांचवा १३३ कर्म । तेंचि तें नैष्कर्म्य । हें जाणती सुवर्म । गुरुगम्य जें ॥ ६३ ॥ आतां शांतरसाचें भरितें । सांडीत आहे पात्रातें । जें बोलणं बोलापरौतें । बोलवलें ॥ ६४ ॥ एथ इंद्रियांचा पांगु । जया फिटला आहे चांगु । तयासीचि आथि लागु । परिसावया ।। ६५ ।। हा असो अतिप्रसंगु । न संडीं पां कथाली । होईल श्लोकसंगतिभंगु । म्हणऊनियां ॥ ६६ ॥ जें मना आकळितां कुवाडें । घाघुसितां बुद्धी नातुडे । तें दैवाचेनि सुखाडें । सांगवलें तुज ॥ ६७ ॥ जें शब्दातीत स्वभावें । तें बोलींचि जरी फावे | तरी आणि काय करावें । कथा सांगें ॥ ६८ ॥ हा आर्तिविशेषु श्रोतयांचा । जाणोनि दास निवृत्तीचा । म्हणे संवादु दोघांचा । परिसोनि परिसा ॥ ६९ ॥ मग श्रीकृष्ण म्हणे पार्थातें । आतां प्राप्ताचें चिन्ह पुरतें । सांगेन तुज निरुतें । चित्त देई ॥ ७० ॥ युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैनिकीम् । अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबद्धयते॥१२॥ सम० - योगी कर्मफळत्यार्गे स्थितीची शांति पावतो । सकाम कामसंकल्पें बद्ध होतो फळीं रत ।। १२ ॥ आर्या-त्यागुनि कर्मफळातें पावे तो मुक्त नैष्ठिकी शांती । कामें अयुक्त बंधा कर्मफळासक्त पावतो अंतीं ॥ १२ ॥ ओंवी - ज्ञानी मुक्तीतें पावती । कर्म करूनि फलेच्छा टाकिती । कामनाबंधें पडती । ते बद्ध होत ॥ १२ ॥ तरी आत्मयोगें आथिला । जो कर्मफळाशीं विटला । तो घर रिघोनि वरिला । शांती जगीं ॥ ७९ ॥ येरु कर्मबंध किरीटी । अभिलापाचिया गांठी । कळार्सला खुंटी | फळभोगाच्या ॥ ७२ ॥ अर्जुना, कर्तेपणाच्या अहंभावनेवांचून कर्म करणें म्हणजेच निष्कर्म, हें सद्गुरूपासून प्राप्त होणारें रहस्यज्ञान त्यांस झालेलें असतें. ६३ अशी स्थिति झाली म्हणजे शांतिनदीच्या लोंढ्याचा, पात्र तुडुंब भरून, उथाव जातो; अर्जुना, वाचेनें जें तत्त्व बरोबर सांगतां येत नाहीं, तें मी तुला येथें कथन केलें आहे. " ६४ श्रोते हो, ज्याची इंद्रियांची खसमस साफ नाहींशी झाली आहे, तोच या ज्ञानाचा खरा अधिकारी होतो. ६५ पण हा व्याख्यानविस्तार ऐकून श्रोते म्हणतात, हा पाल्हाळ आतां पुरे झाला. कथासूत्र असें सोडल्यास मूळ श्लोकाची संगति राहणार नाहीं. ६६ ज्या तत्त्वाचें आकलन करतांना मनाला कोडे पडते व ज्याचा शोध लावतांना बुद्धीला यश येत नाहीं, तें सुदैवानें तुला शब्दांनीं सांगतां आलें आहे. ६७ अरे, जें तत्त्वज्ञान बोलापलीकडचें आहे, तेंच जर तुला वाणीनें वर्जून सांगण्याचं कसब साधलें, तर मग आणखी काय करायचे राहिलें ? तेव्हां आतां हें पुरे करून, मूळ कथा पुढे चालवावी.” ६८ ही श्रोत्यांची श्रवणाविषयीं हौस पाहून मी श्रीनिवृत्तिनाथांचा दास ज्ञानदेव म्हणतों, कीं, श्रोते हो, आतां श्रीकृष्णार्जुनाचा संवाद सावधानपणे ऐकावा. ६९ मग श्रीकृष्ण पार्थाला म्हणाले, "अरे, आतां मी सिद्धीस पांचलेल्या योगी पुरुषाचें संपूर्ण लक्षण स्पष्ट सांगतों, तें ऐक. ७० ज्याने हा आत्मयोग संपादन केला व कर्मफळाची आशा निःशंक सोडली, त्याला या जगांत शांतीने आपण होऊनच माळ घातली, असें होतें. ७१ आणि, अर्जुना, जे दुसरे योगहीन असतात, ते कर्माच्या दांव्याने आणि वासनेच्या गांठीनें फळभोगाच्या खुंट्याला खडसून बांधले जातात. ७२ १ पाल्हाळ. २ कथासूत्र. ३ कोर्डे. ४ शोधितां ५ सांपडत नाहीं. ६ अनुकूलतेनें. ७ सिद्धार्चे, योगी पुरुषाचें. ८ खिळिला, बळकट बांधला.