पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३२ सार्थ श्रीज्ञानेश्वरी देखें बुद्धीची भाप नेणिजे | मनाचा अंकुर नुदैजे । ऐसा व्यापारु तो बोलिजे । शारीरु गा ।। ५१ ।। हेंचि मराठें परियेसीं । तरी बाळकाची चेष्टा जैशी । योगिये कर्मै करिती तैशीं । केवळा तनु ॥ ५२ ॥ मग पांचभौतिक संचलें । जेव्हां शरीर असे निदेलें । तेथें मनचि राहाटे एकलें । स्वमीं जेवीं ॥ ५३ ॥ नवल ऐकें धनुर्धरा । कैसा वासनेचा संसोरा । देहा होऊं नेदी उजंगरा । परी सुखदुःखें भोगी ॥ ५४ ॥ इंद्रियांच्या गांवीं नेणिजे । ऐसा व्यापारु जो निपजे । तो केवळु गा म्हणिजे । मानसाचा ॥ ५५ ॥ योगिये तोही करिती । परी कर्मे ते न वंधिजती । जे सांडिली आहे संगति । अहंभावाची ॥ ५६ ॥ आतां जाहालिया भ्रमहत । जैसें पिशाचाचें चित्त । मग इंद्रियांचे चेष्टित । विकळ दिसे ॥ ५७ ॥ स्वरूप तरी देखे । आळविलें आइके । शब्द बोले मुखें । परी ज्ञान नाहीं ॥ ५८ ॥ हें असो काजेंविण । जें जें कांहीं करण । तें केवळ कर्म जाण । इंद्रियांचें ॥ ५९ ॥ मग सर्वत्र जें जाणतें । तें बुद्धीचें कर्म निरुतें । वोळख अर्जुनातें । म्हणे हरि ॥ ६० ॥ ते बुद्धि धैरे करूँनी । कर्म करिती चित्त देउनी । परी ते नैष्कर्म्यापासुनी । मुक्त दिसती ॥ ६१ ॥ जें बुद्धीचिये ठावूनि देहीं । तयां अहंकाराची सेचि नाहीं । म्हणोनि कर्म करितां पाहीं | चोखाळले || ६२ ॥ अगा करितेनवीण मानस , ज्या कर्मात बुद्धीची गोष्टही काढावयास नको आणि मनाचे फांटेही फुटत नाहींत, तें कर्म ' शारीर ' म्हणावें. ५१ हीच गोष्ट सोप्या शब्दांत सांगतों, ऐक. ज्याप्रमाणें लहान बालक निर्हेतुक चलनवलन करितें, त्याप्रमाणें योगिजन कोणतीही वासना न धरितां केवळ शरीरानें कर्म आचरतात. ५२ मग पंचमहाभूतांचे बनलेलें हें जड़ शरीर जेव्हां योगनिद्रावश होतें, तेव्हां स्वप्नांतल्याप्रमाणें मन एकांउंच वावर करितें. ५३ अर्जुना, एक नवलाची गोष्ट ही आहे, कीं, या वासनेचें पसारा घालण्याचें कसब असें आहे, कीं, देहाला मुळींच सुगावा लागू न देतां त्याला ती सुखदुःखाच्या भोगांत गुंतविते. ५४ ज्या व्यापाराचा इंद्रियांना गंधही नसतो, अशा व्यापाराला म्हणावे. ५५ योगिजन हीं मानसकमें आचरतात, परंतु अहंभावाचा स्पर्शही यांना नसल्यामुळे हीं कर्मे त्यांना बंधक होत नाहींत. ५६ पिसाटाच्या चित्ताप्रमाणे जेव्हां एकादा माणूस भ्रमिष्ठ होतो, तेव्हां त्याच्या इंद्रियांच्या क्रिया विक्षिप्तपणाच्या दिसूं लागतात. ५७ त्याला भोवतालच्या वस्तूंच्या व माणसांच्या आकृति दिसतात; हांक मारली असतां ऐकूं जाते; तो स्वतः तोंडानें वोलूं शकतो; परंतु त्याला कांहीं कळत आहे, असे दिसून येत नाहीं. ५८ आतां अधिक पाल्हाळ नको. एकंदरीत कोणतंही कारण नसतांना जें कर्म घडून येते, त्याला 'इंद्रियकर्म ' म्हणावे. ५९ समजून उमजून जे जे कर्म केले जाते, तें खरें खरें 'बुद्धीचं कर्म ' होय. " असे श्रीकृष्ण अर्जुनास म्हणाले. ६० नंतर कृष्ण पुढे बोलूं लागले, कीं, " ते बुद्धिपुरःसर मन देऊन कर्म आचरतात, पण आपल्या निष्कर्मवृत्तीमुळे मुक्तच असतात. ६१ कारण बुद्धीच्या ठाण्यापासून या देहाच्या संबंधं त्यांच्या ठायी अहंभावाची आठवणही नसते, आणि तेणेंकरून कर्म करीत असतांच ते शुद्ध होतात. ६२ १ चाल, पसरण्याची क्रिया. २ सुगावा, दाद. ३ निश्चित, खरें. ४ पुढे करून ५ स्थानापासून. ६ स्मृतीच, आठवणसुद्धा. ७ शुद्ध झाले,