पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

XAHA HA :: :: म:म:म: HHHHHHHHHHH १६ प्रस्तावना आश्रम संस्था, वर्णभेद, जातिनिर्बंध, व इतर भेदाभेद झुगारून देता येत नाहीत, असेंच ते मानतात. 'श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्टितात् ' या टोकावर व्याख्यान करतांना ज्ञानदेव म्हणतात- येरू आचारु जो परावा, तो देखतां कीर बरवाः परी आचरतेनी आचरावा आपुलाचि. २१० सांगं, शूद्रघरीं आघवीं पक्वान्नं आहाती वरवीं तीं द्विजें केवीं सेवावीं? दुर्बन्छु जरी जाहला. २२१ अनुचित कैसेनि कीजे? अग्राह्य केवीं इच्छि जे ? अथवा इच्छिलें ही पाविजे ? विचारों पां. २२२ - अध्याय ३ अर्थात् हा उल्लेख इतका स्पष्ट आहे की, त्यावर टीका करण्याचें प्रयोजनच नाहीं. भक्तिमार्गात वर्णभेद व जातिभेद नाहींच ज्ञानदेव कृष्णवचन सांगतात- ऐसा आघांचि परी, पांडवा, जिहीं आपुलिया सर्व भावा जियावयालागीं वालावा मीच केला, ४४८ ते पापयोनीही होतु का, ते श्रुताधीतही न हांतु का, परी मजसीं तुकितां, तुका तुटी नाहीं. ४४९ म्हणोनि कुळ, जाति, वर्ण, हें आघवेंचि, गा, अकारण; एथ अर्जुना, माझपण सार्थक एक. ४५६ जैसे तंवचि वहाळ - वोहळ, जंव न पवती गंगाजळ, मग होऊनि ठाकती केवळ गंगारूप. ४५८ का खैर - चंदन- काष्टें हे विवंचना तंवचि घंटे, जंव न घापती एकवटे अग्निमाजी. ४५९ तैसे क्षत्री, वैश्य स्त्रिया, का शूद्र, अंत्यजादि, इया जाती तंत्रच वेगळालिया, जंव न पवती मातें. ४६० मग जातीं व्यक्तीं पडे बिंदुलं, जेव्हां भावें होती मज मिनले, जैसे लवणकण घातले सागरामाजी. ४६१ अध्याय ९ याचा सरळ अर्थ इतकाच की, अलोट भक्तीनें ईश्वराशी तादात्म्य झालें, म्हणजे जातिव्यक्ति हरपतात, परंतु जगाच्या लौकिक व्यवहारांत हे भेदभाव कायमच असतात. खेरे भगवद्भक्त आपली नित्यनैमित्तिक कर्म समाजनिबंधानुसार करूनही कर्मफळापासून मुक्त व निर्लेप असतात. कर्मेंद्रिये सुखं करिती कर्मे अशेखें, जियें कां वर्णविशे भागा आलीं, ७६. विधीत पाटित, निषेधाते गाटित, मज देऊनि जाळित कर्मफळें. ७७ अध्याय १२ भक्ताला आश्रम - वर्ण जाति इत्यादि लौकिक भेद सोडण्याचे कारणच नाहीं. कां अभ्यासाहीलागीं कसु नाहीं तुझिया आंगीं, तरी आहासी जया भागों तैसाचि असं. १९४ इंद्रिये न कांडी, भोगात न तोडीं, अभिमानु न संडीं स्वजातीचा. कुळधर्मु चाळीं, विधिनिषेध पाळीं, मग सुखें तुज सरळी दिधली आहे. ११६. अध्याय १२ अशा प्रकारें ज्ञानदेवींत वर्णश्रम संस्थेविषयीं गौरवपूर्ण प्रशंसोद्गार सडकून सांपडणार आहेत. ज्ञानदेवादि संतांनी वर्णजातिभेदाविरुद्ध बंडाचे निशाण उभारले, अशी जे आपल्या मनाची किंवा जनाची समजूत करून देतात, त्यांनी सत्याची चाड धरून, ईश्वरभक्तिव्यतिरिक्त लौकिक व्यवहारांत हे संत वर्णाश्रमधर्म व जातिभेद यांचा पुरस्कार करतात ही बाब नजरेआड करूं नये. ज्ञानदेव व पैठणकर ब्राह्मण यांचा शुद्धीकरणाच्या बाबतींत कांहींसा में लढा पडला होता खरा, पण तो उभय पक्षांनी समजूतदारपणे मिटवला आणि ज्ञानदेव ब्राह्मणांना निरंतर मानच देत राहिले. तसे नसेल तर ज्ञानदेवांनी ज्ञानदेवीच्या नवव्या अध्यायांत- 'मग वर्णामाजी छत्रचामर, स्वर्ग जयांचं अग्रहार, मंत्रविद्येसी माहर, ब्राह्मण जे. " ४७५ असे जे ब्राह्मणांचं भरघोस वर्णन आठनऊ ओव्यांत केलें आहे, तें सर्व निव्वळ दिखाऊ, वरवरचें थोतांड आहे असेंच म्हणावे लागणार नाहीं काय ? पण असा दंभ किंवा कपटाचार ज्ञानदेवांच्या ठिकाणीं कल्पिणारा मनुष्य जाणत्यांत कोणी तरी सांपडेल, असे आमच्या मनोदेवतेस क्षणमात्रही वाटत नाही. असो, शा. श. १२०९ मध्ये शुद्धीकरणप्रकरण निकाली लागल्यावर, हीं चारी भावंडे नेवासे येथे येऊन काही वर्ष राहिली. हें गांव नगर जिल्ह्यांत प्रवरेच्या कांठी दोन बाजूस वसलेलें आहे, व गांवाच्या दोन भागांस खंडोबाचें नेवासे व म्हाळसामोहनीराजाचे नेवासे अशी नांव आहेत. पैकीं दक्षिणतीरावरील म्हाळसेच्या देवालयांत ज्ञानदेवांनी