पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय पांचवा १३१ तेथींचा सर्वथा नोहे । नवल देखें ॥ ४१ ॥ स्पर्शासि तरी जाणे । परिमळु सेवी घ्राणें । अवसरोचित बोलणें । तयाहि ओश्री ॥ ४२ ॥ आहारातें स्वीकारी । त्यजावें तें परिहरी । निद्रेचिया अवसरीं । निदिजे सुखें ॥ ४३ ॥ आपुलेनि इच्छावशे । तोही गा चालतु दिसे । पैं सकळ कर्म ऐसें । हाटे किर ॥ ४४ ॥ हें सांगों काई एकैक | देखें श्वासोच्छ्रासादिक । आणि निमि- पोन्निमिष । आदिकरूनि ॥ ४५ ॥ पार्था तयाचे ठायीं । हें आघवेंचि आथी पाहीं । परी तो कर्ता नव्हे कांहीं । प्रतीतिवळें ॥ ४६ ॥ जें भ्रांतिमेजे सुर्तेला । तैं स्वप्नसुखें भूर्तेला । मग तो ज्ञानोदयीं चेईंला । म्हणोनियां ॥ ४७ ॥ ब्रह्मण्याधाय कर्माणि सङ्गं त्यक्त्वा करोति यः । लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा ॥ १० ॥ सम० - ब्रह्म अर्पूनियां कर्मे संग टाकूनि जो करी । पापें न लिंपे तो जैसे जळीं कमळिणीदळ ॥ १० ॥ आर्या-- ब्रह्मीं अर्पुनि कर्मै करि जो होउनि अलिप्त संगमळीं । पापें लिप्त नसे तो कमळदळ जसे न लिप्त होय जळीं ॥ १०॥ ओवी - ब्रह्मार्पण कर्म करी । संग त्यजूनि असे निर्धारीं । पायें न लिंपे ऐशियापरी । पद्मपत्र उदकीं जैसें ॥ १० ॥ आतां अधिष्ठानसंगती । अशेपाही इंद्रियवृत्ति । आपुलालिया अर्थी । वर्तत आहाती ॥ ४८ ॥ दीपाचेनि प्रकारों । गृहींचे व्यापार जैसे । देहीं कर्मजात तैसें । योगयुक्ता ॥ ४९ ॥ तो कर्मों करी सकळें । परी कर्मबंधा नाकळे । जैसें न सिंपे जळीं जळें । पद्मपत्र ॥ ५० ॥ कायेन मनसा बुद्धया केवलैरिन्द्रियैरपि । योगिनः कर्म कुर्वन्ति सङ्गं त्यक्त्वात्मशुद्धये ॥ ११ ॥ सम० -- काया मनें बुद्धिनेही वासनातीत इंद्रियें । चित्तशुद्धयर्थ करिती संग टाकूनियां क्रिया ॥ ११ ॥ आर्या- देह मन बुद्धि यांहीं योगी गतवासनेंद्रियांसहित । निजचित्तशुद्धिसाठीं संग श्यागूनियां क्रिया करित ॥ ११ ॥ ओवी - कर्मफळाची इच्छा त्यजुनी । शांतिनिष्ठा पावे मनीं । कायामनें युक्त आचरोनी । फळ टाकूनी कर्म करी ॥ ११ ॥ परंतु त्याचें नवल हें कीं तो या कर्मात गुरफटून जात नाहीं. ४१ त्याला स्पर्शज्ञान होतें व वासाचें भानही त्याला असतें. प्रसंगाला साजेल असें भाषणही त्याला करितां येतें. ४२ तो अन्नव्यवहार करतो, निषिद्ध वस्तूंना टाळतो, आणि झोपेची वेळ झाली म्हणजे सुखानें झोंपतो. ४३ आपल्या आवडीप्रमाणे तो चलनवलन करतो. अशा प्रकारें तो सर्व तऱ्हेचें कर्म खरोखरच आचरीत असतो. ४४ अर्जुना, आतां अधिक काय सांगावें ? अरे, श्वासोच्छ्रास, पापण्यांची उघडझाप इत्यादि सर्व कांहीं क्रिया तो करतो, परंतु कर्मयोग्यास येणाऱ्या स्वानुभवाच्या बळानें तो ' अकर्ताच ' राहतो ! ४५,४६ कारण तो जोंपर्यंत मायेच्या शेजेवर निजला होता, तोंपर्यंत स्वप्नींच्या खोट्या सुखानें झपाटला होता, पण आतां ज्ञानसूर्याचा उदय झाल्यामुळें तो जागा होऊन शुद्धीवर आलेला असतो. ४७ अशी स्थिति प्राप्त झाली, म्हणजे देहाच्या संगानें इंद्रियें आपापल्या विषयांत वावर करीत राहतात. ४८ जसें दिव्याच्या प्रकाशांत घरांतले व्यापार चालतात, त्याप्रमाणेंच कर्मयोग्याचे संबंधांत देहांतले व्यापार चालू असतात. ४९ तो सर्व कर्मे आचरतो, परंतु पाण्यामध्यें असूनही जसें कमळाचे पान पाण्याने भिजत नाहीं, तसंच कर्म करीत असतांही त्याचा लेप कर्मयोग्यास लागत नाहीं. ५० १ आहे. २ चालते, ३ आत्मज्ञानाच्या अनुभवानें, ४ निजला. ५ झपाटला ६ जागा झाला,