पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३० सार्थ श्रीज्ञानेश्वरी योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेन्द्रियः । सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते ॥ ७ ॥ सम० - कर्मयोगे शुद्धचित्त जिंकिलीं इंद्रियें मन । जो देह जीवभूतात्मा करितांहि अलिप्त तो ॥ ७ ॥ आर्या-- विजितात्मा शुद्धात्मा योगीं रत जो जितेंद्रियग्राम । आत्मा सकळांचा तो कर्मे करुनी अलिप्त निष्काम ॥ ७ ॥ ओवी - योगकर्म केलिया । शुद्धत्व होय आत्मया । जितेंद्रिय विषयां । करूनि अलिप्त जो ॥ ७ ॥ जेणें भ्रांतीपासूनि हिरेतलें । गुरुवाक्यें मन धुतलें । मग आत्मस्व- रूपीं घातलें । हरौनियां ||३४|| जैसें समुद्रीं लवण न पडे । तंव वेगळे अल्प आंवडे । मग होय सिंधूचिएवढें । मिळे तेव्हां ॥ ३५॥ तैसें संकल्पोनि काढिलें । जयाचें मनचि चैतन्य जाहलें । तेणें एकदेशियें परी व्यापिलें । लोकय ॥ ३६ ॥ आतां कर्ता कर्म करावें । हें खुंटलें तया स्वभावें । आणि करी ही आघवें । तही अकर्ता तो ॥ ३७ ॥ जे पार्था तया देहीं । मी ऐसा आटऊ नाहीं । तरी कर्तृत्व कैंचें काई । उरे सांगें ॥ ३८ ॥ नैव किंचित् करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् । पश्यञ्शृण्वन्स्पृशञ्जिघ्रन्नन्भन्गच्छन्स्वपन्श्वसन् ॥८॥ प्रलपन्विसृजन्गृह्णन्नुन्मिषन्निमिषन्नपि । इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् ॥ ९ ॥ सम० न कांहीं करितों ऐसें मानितो नित्य तस्ववित् । विषयीं वर्ततां जातां निजतां श्वास वाहतां ॥ ८ ॥ कर्मेंद्रियक्रिया होतां निमिषादिहि हालतां । इंद्रिये स्वस्वविषयीं वर्तती मानुनी असें ॥ ९॥ आर्या-अशनीं वासग्रहण निद्रा श्रवणहि दर्शनीं गमनीं । स्पशी श्वास कर्ता मी हे तत्वज्ञ युक्त तो न मनी ॥८॥ निपुणहि निमिषोन्मेषीं दानग्रहणींहि भाषणप्रमुख करणें करणार्थी हीं वर्तति भावुनि सदा विदेहि सुखी ९ ओव्या कर्म करूनि म्हणती नाहीं । देखणें आइकर्णे पाहीं। गंध भोजन निद्रा गमन तेंही । श्वास टाकणें पाहीं हीं आठ ८ बोलणे आणि घेणें देणें । पातें पातया लावणें उघडणें । हा इंद्रियें व्यापार करणें । ऐसें मानूनि वर्तती ॥ ९ ॥ ऐसें तनुत्यागेंवीण । अमूर्ताचे गुण दिसती संपूर्ण । योगयुक्ता ॥ ३९ ॥ ए-हवीं आणिकांचिये परी । तोही एक शरीरी । अशेपाही व्यापारीं । वर्ततु दिसे ॥ ४० ॥ तोही नेत्रीं पाहे | श्रवणीं ऐकतु आहे । परि ज्यानें आपलें मन मायामोहापासून हिसकावून घेतलें, आणि गुरूपदेशानें त्याचा मळ सर्वतः धुऊन टाकिला, आणि त्याला आत्मस्वरूपाच्या ठिकाणीं मुरवून ठेविलें ; ३४ आणि ज्याप्रमाणें मीठ, जोपर्यंत समुद्रांत पडलें नाहीं, तोंपर्यंत त्याच्याहून भिन्न व आकारमानाने लहानसें दिसतें, परंतु तेच समुद्रांत पडून त्याच्याशीं एकजीव झाले म्हणजे त्या समुद्राएवढेंच अफाट होतें, त्याप्रमाणें ज्याचें मन संकल्पविकल्पांतून बाहेर निघून चैतन्याशीं समरस होऊन गेलें आहे, तो पुरुष देशकालमर्यादादिकांनी इतरांसारखा एकदेशस्थित भासला, तरी तो आत्मस्वरूपानें त्रिभुवनाला . व्यापून टाकितो. ३५, ३६ अर्थात्, अशा पुरुषासंबंधें 'कर्ता' 'कर्म' इत्यादि प्रकारची भाषा सहजच खुंटते, आणि त्यानें जरी सर्व परींचें कर्म आचरिलें, तरी तो अकर्ताच राहतो. ३७ कारण, अर्जुना, त्या पुरुषाला जर देहभावाची आठवणही नाहीं तर त्याच्या अंगीं कर्तेपण कसें चिकटणार बरें ? ३८ अशा रीतीनें देह न सांडतांच निर्गुण निराकार परब्रह्माचीं लक्षणें कर्मयोग्याच्या अंगीं दिसून येतात. ३९ एन्हवीं पाहतां, इतर सामान्य माणसांप्रमाणें तोही शरीर धारण करून सर्व प्रकारची कमै करतांना दृष्टीस पडतो. ४० कर्मयोगीही इतरांप्रमाणेच डोळ्यांनीं पाहतो आणि कानांनी ऐकतो, १ हिंसकावून घेतलें. २ दिसतें. ३ संकल्पांतून, वासनांमधून, ४ मर्यादित स्थळावकाशावर राहणाऱ्यानें.