पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय पांचवा १२९ सांख्ययोगी पृथग्बालाः प्रवदन्ति न पण्डिताः । एकमप्यास्थितः सम्यगुभयोर्विन्दते फलम् ॥४॥ सम० - बोलती सांख्ययोगातें पृथक् अज्ञ न पंडित । कीं एकाच्या अनुष्ठानें दोहींचें फळ पावतो ॥ ४ ॥ आर्या - सांख्याचे योगाचं मूखां भिन्नत्व पंडितां नाहीं । दोघांचं फळ देतो सम्यक् एकहि अनुष्टितांनाही ॥ ४ ॥ ओवी - सांख्य योग दोन्ही । हे वेगळे म्हणती अज्ञानी । पंडित म्हणती जनीं । दोहींचं फळ एक ॥ ४ ॥ हवीं तरी पार्था । जे मूर्ख होती सर्वथा । ते सांख्ययोगसंस्था । जाणती केवीं ||२६|| सहजें ते अज्ञान । म्हणोनि म्हणती ते भिन्न । एन्हवीं दीपाप्रति काई आना | प्रकाशु आहाती ||२७|| पैं सम्यक एणें अनुभवें । जिहीं देखिलें तत्त्व आघवें । ते दोहींतेंही ऐक्यभावें । मानिती गा ||२८|| यत सांख्यैः प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते । एकं सांख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति ॥५॥ सम० – पावती सांख्य ज्या स्थाना योगीही तेथ पावती । सांख्य योग असे ऐक्यें जो पाहे तोचि डोळस ॥ ५ ॥ आर्या-सांख्य पावे जैसें योगेंही स्थान लब्ध होय तसें । सांख्यातं योगातें पाहे जो एक तोचि पाहतसे ॥ ५ ॥ ओंवी -- सांख्यें जें स्थान पाविजे । योगानें तें स्थळीं पाइजे । सांख्य योग जाणिजे । तोचि जाणता ॥ ५ ॥ आणि सांख्यीं जें पाविजे । तेंचि योगीं गमिजे । म्हणोनि ऐक्य दोहींतें सहजें । इयापरी ॥ २९ ॥ देखें आकाशा आणि अवकाशा | भेदु नाहीं जैसा । तैसें ऐक्य योगसंन्यासा । वोळखे जो ||३०|| तयासींचि जगीं पहिलें । आपणपें तेणेंचि देखिलें । जया सांख्य योग जाणवले । भेदेंविण ॥३१॥ संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयोगतः । योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति ॥ ६ ॥ सम० - - संन्यास तो नव्हे ऐसा जो कर्माविण दुर्लभ । कर्मयोगें जो मुनी तो ब्रह्म सत्वर पावतो ॥ ६ ॥ आर्या- संन्यास महाबाहो योगावांचोनि फार दुष्कर तो । योगें युक्तचि मुनि तो ब्रह्मप्राप्तीसि शीघ्र तो करितो ॥६॥ ओवी - - ऐसा संन्यास न जाणिजे । कर्माविण केंवी पाविजे । कर्मयोगें जाइजे । ब्रह्मलोकीं ॥ ६ ॥ जो युक्तिपंथें पार्था । चढे मोक्षपर्वता । तो महासुखाचा निर्मंथा । वहिला पावे ||३२|| येरा योगस्थिति जया सांडे । तो वायांचि गा हव्यॉसी पडे । परि प्राप्ति कहीं न घडे । संन्यासाची ॥ ३३ ॥ अर्जुना, हें तत्त्व ज्यांना कळलें नाहीं, त्या मूढ जनांना ही ज्ञानयोगाची व कर्मयोगाची व्यवस्था कशी उकलणार ? २६ ते आपल्या स्वाभाविक अज्ञानानें या दोहोंना भिन्न समजतात, परंतु, वास्तविक पहातां निरनिराळ्या दिव्यांच्या प्रकाशांत कधीं निरनिराळेपणा असतो का ? २७ ज्यांनीं स्वानुभवानें आत्मरूपाचे तत्त्व बरोबर ओळखिलें आहे, ते संन्यास व योग यांत कोणताही भेद मानीत नाहींत. २८ आणि सांख्यसाधनानें जें मिळायचे, तेंच योगसाधनानेंही मिळते; तेव्हां ते दोन्ही एकरूपच होत. २९ आकाश आणि अवकाश (म्हणजे पोकळी) यांत जसा निराळेपणा निवडतां येत नाहीं, तसेच योग व संन्यास यांचें ऐक्य ओळखावें ३० जो संन्यास व योग यांचा अभेद जाणतो, त्यालाच खरा प्रकाश लाभला, त्यालाच आत्मस्वरूपाचें दर्शन झालें, असें समजावें. ३१ अर्जुना, जो कर्मयोगाच्या पायवाटेनें मोक्षपर्वतावर चढतो, तो आत्मानंदाच्या माथ्याला लवकर पोचतो. ३२ परंतु ज्या कोणाला योगसाधन लाभलें नाहीं, तो निष्फळ आटापेटांत गुंततो, परंतु त्याला खन्या संन्यासाची प्राप्ति कधींच होत नाहीं. ३३ १ निरनिराळे. २ उजाडलें, प्रभात झाली. ३ माथा, पाठार. ४ छंदांत, आटापेठांत. १७